Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 24 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘मामाच्या गोव्याला जाऊया’मध्ये रंगणार दोस्तीचा धम्माल प्रवास; अंकुश चौधरीची एन्ट्री चर्चेत

Mamachya Govyala Jauya या आगामी मराठी चित्रपटाने प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण केली आहे. Viju Mane दिग्दर्शित या चित्रपटात मैत्री, धमाल, नॉस्टॅल्जिया आणि गोवा ट्रिपचा भन्नाट अनुभव पाहायला मिळणार आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: May 12, 2026 | 06:55 PM
‘मामाच्या गोव्याला जाऊया’मध्ये रंगणार दोस्तीचा धम्माल प्रवास; अंकुश चौधरीची एन्ट्री चर्चेत

‘मामाच्या गोव्याला जाऊया’मध्ये रंगणार दोस्तीचा धम्माल प्रवास; अंकुश चौधरीची एन्ट्री चर्चेत

Follow Us
Follow Us:
  • ‘स्ट्रगलर साला’ची तिकडी झळकणार ‘मामाच्या गोव्याला जाऊया’ तून मोठ्या पडद्यावर !
  • अंकुश चौधरीही होणार या गँगमध्ये सामील
  • ३१ जुलैला चित्रपटगृहात पिकनिक !
गोवा… प्रत्येक फ्रेंड सर्कलच्या गप्पांमध्ये हमखास येणारा विषय. ”यार, एकदा तरी गोव्याला जायचंच!” हा प्लॅन प्रत्येक ग्रुपमध्ये बनतो, काहींचा फसतो तर काहींचा आयुष्यभर लक्षात राहाणारा अनुभव ठरतो. अशाच मैत्री, धमाल, वेडेपणा आणि नॉस्टॅल्जियाने भरलेल्या एका भन्नाट ट्रिपची गोष्ट आता मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. विजू माने यांच्या आगामी ‘मामाच्या गोव्याला जाऊया’ या चित्रपटाने प्रेक्षकांची उत्सुकता चांगलीच वाढवली आहे.

‘स्ट्रगलर साला’ या गाजलेल्या सीरिजनंतर विजू माने पुन्हा एकदा मित्रांच्या जगात घेऊन जाणारा, हसवणारा आणि तितकाच रिलेट होणारा चित्रपट घेऊन येत आहेत. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाची घोषणा झाल्यानंतर या गोवा ट्रिपमध्ये नेमकं कोण सहभागी असणार, याची उत्सुकता होती. अखेर या भन्नाट गँगचा खुलासा झाला असून कुशल बद्रिके, अभिजीत चव्हाण आणि संतोष जुवेकर ही ‘स्ट्रगलर साला’मधून लोकप्रिय झालेली तिकडी पुन्हा एकदा एकत्र झळकणार आहे. विशेष म्हणजे या धमाल गँगमध्ये आता अंकुश चौधरीचीही एन्ट्री झाली असून त्यामुळे चित्रपटाची मजा आणखी रंगणार आहे.

Ghabadkund Movie : भल्या-भल्यांना घाम फोडणारी रंगी येतेय! ‘घबाडकुंड’मध्ये स्मिता पायगुडे अंजुटेची काळजाचा ठोका चुकवणारी भूमिका

नुकतंच या चित्रपटाच्या पोस्टरचं अनावरण करण्यात आलं. मराठीत अशा प्रकारचा भवदिव्य सोहळा पहिल्यांदाच रंगला झाला असून या सोहळ्याला महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, चित्रपटाचे संगीत दिग्दर्शक अवधूत गुप्ते उपस्थित होते. पोस्टर प्रदर्शित झाल्यापासून सोशल मीडियावर या पोस्टरची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. पोस्टरमध्ये दिसणारी ऊर्जा, मस्ती आणि मित्रांच्या चेहऱ्यावरची बेफिकीर धमाल अक्षरशः गोवा ट्रिपची फीलिंग देऊन जाते. एका बाजूला बाईकवर वेड्यासारखी एन्जॉय करणारी गँग, हवेत उडणाऱ्या बाटल्या, कॅन्स, रंगीबेरंगी कन्फेटी आणि पार्श्वभूमीतील बीच वाईब… हे सगळं पाहाताना ही फक्त ट्रिप नाही, तर मैत्रीचा जल्लोष असणार आहे, हे स्पष्ट जाणवतं. पोस्टरमधील प्रत्येक कलाकाराचे एक्सप्रेशनच चित्रपटाच्या भन्नाट टोनची झलक देतो. विशेष म्हणजे पोस्टरमध्ये दिसणारी बेधुंद ऊर्जा ही फक्त कॉमेडीपुरती मर्यादित नसून, प्रत्येक मित्रांच्या ग्रुपने अनुभवलेल्या त्या ‘गोवा प्लॅन’च्या आठवणींना छेडणारी आहे. त्यामुळे हा चित्रपट प्रत्येक वयोगटातील मित्रांना रिलेट होणार, अशी चर्चा आहे.

चित्रपटाबद्दल सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार म्हणाले, ‘’या चित्रपटाची जितकी उत्सुकता प्रेक्षकांना आहे, तितकीच मलाही आहे. या संपूर्ण टीमने प्रेक्षकांना दिलेली सर्वात अमूल्य गोष्ट म्हणजे निरागस, मनमोकळं हास्य. मी स्वतः मैत्री जपणारा माणूस आहे. मैत्री ही कोणत्याही चौकटीत न बसणारी भावना आहे. तिची भाषा ही फक्त मैत्रीचीच असते. त्या नात्याला कोणताही रंग, बंधन किंवा अट लागू शकत नाही. गेली दहा वर्षे या कलाकारांनी आणि टीमने मैत्रीचा जो सुंदर धागा जपला आहे, तोच आता पुन्हा एकदा या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, ही आनंदाची गोष्ट आहे. कलाकारांविषयी बोलायचं झालं तर प्रत्येकाने आपल्या अभिनयातून प्रेक्षकांच्या मनात वेगळी जागा निर्माण केली आहे. त्यामुळे या चित्रपटाकडून अपेक्षा आणखी वाढल्या आहेत. संपूर्ण चित्रपटाच्या टीमला मनःपूर्वक शुभेच्छा. प्रेक्षकांनी या मैत्रीचा, हास्याचा आणि भावनांचा प्रवास नक्की अनुभवावा.’’

चित्रपटाबद्दल दिग्दर्शक विजू माने म्हणतात, ”मैत्री, वेडेपणा, अचानक बनलेले प्लॅन्स आणि त्या ट्रिपमध्ये घडणारे भन्नाट अनुभव हे प्रत्येकाच्या आयुष्याचा भाग असतात. ‘मामाच्या गोव्याला जाऊया’ हा फक्त गोव्याला जाण्याचा प्रवास नाही, तर मित्रांसोबत जगलेल्या क्षणांचा खजिना आहे. प्रेक्षकांना थिएटरमध्ये बसून स्वतःच्या मित्रांची आणि त्यांच्या ट्रिप्सची आठवण आल्याशिवाय राहाणार नाही. फ्रेंडशिप, फन आणि फिल्म यांचा सुंदर मेळ यात अनुभवायला मिळणार आहे.’’

फ्रेंडशिप डेच्या आठवड्यात म्हणजेच ३१ जुलै रोजी हा चित्रपट प्रदर्शित होत असल्याने मित्रांसाठी ही एक भन्नाट सिनेमॅटिक ट्रीट ठरणार आहे. मैत्री, धम्माल, नॉस्टॅल्जिया आणि गोव्याच्या मस्तीचा फुल्ल डोस देणारा ‘मामाच्या गोव्याला जाऊया’ आता प्रेक्षकांना थिएटरमध्ये एक भन्नाट ट्रिप घडवण्यासाठी सज्ज झाला आहे. विजुमेनिया प्रा. लि. आणि लाईट अँड शेड प्रस्तुत या चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन आणि निर्मिती विजू माने यांनी केली आहे. तर पटकथा आणि संवाद विजू माने, राहुल आवटे आणि कुशल बद्रिके यांचे आहेत.

15 वर्षांनंतर पुन्हा रंगणार सासू-सुनेची जुगलबंदी; ‘पुढचं पाऊल’ची जोडी रंगभूमीवर एकत्र

Web Title: Mamachya govyala jauya marathi movie friendship goa trip cast

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 12, 2026 | 06:55 PM

Topics:  

  • Goa
  • marathi movie

संबंधित बातम्या

Dwidha Marathi Movie: बाप-लेकीच्या नात्याचा हळवा प्रवास; ‘द्विधा’ उलगडणार भावनांची नवी बाजू
1

Dwidha Marathi Movie: बाप-लेकीच्या नात्याचा हळवा प्रवास; ‘द्विधा’ उलगडणार भावनांची नवी बाजू

‘घबाडकुंड’च्या यशानंतर मोठी घोषणा! मराठी युनिव्हर्सच्या दुसऱ्या अध्यायासाठी ‘इतक्या’ कोटींची गुंतवणूक
2

‘घबाडकुंड’च्या यशानंतर मोठी घोषणा! मराठी युनिव्हर्सच्या दुसऱ्या अध्यायासाठी ‘इतक्या’ कोटींची गुंतवणूक

रोमान्स, भावना आणि फ्रेश केमिस्ट्री, पहिल्यांदाच एकत्र झळकणार भूषण प्रधान आणि सायली पाटील; ‘स्वप्नसुंदरी’मुळे वाढली उत्सुकता
3

रोमान्स, भावना आणि फ्रेश केमिस्ट्री, पहिल्यांदाच एकत्र झळकणार भूषण प्रधान आणि सायली पाटील; ‘स्वप्नसुंदरी’मुळे वाढली उत्सुकता

Mardini Trailer: एका आईच्या वेदनेने घेतलं रणरागिणीचं रूप; मर्दिनी’चा अंगावर शहारे आणणारा ट्रेलर रिलीज
4

Mardini Trailer: एका आईच्या वेदनेने घेतलं रणरागिणीचं रूप; मर्दिनी’चा अंगावर शहारे आणणारा ट्रेलर रिलीज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.