Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mamachya Govyala Jauya : गोव्यात साऊथ इंडियन तडका! ‘मामाच्या गोव्याला जाऊया’मधील ‘वणक्कम’ गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

Mamachya Govyala Jauya: मामाच्या गोव्याला जाऊया' चित्रपटातील 'वणक्कम' हे नवं प्रमोशनल गाणं प्रदर्शित झालं आहे. अवधूत गुप्ते आणि राहुल देशपांडे यांच्या आवाजातील हे साऊथ इंडियन स्टाईलचं गाणं सुपरस्टार रजनीकांत यांना समर्पित करण्यात आलं आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Jul 30, 2026 | 01:39 PM
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Mamachya Govyala Jauya: आगामी मराठी चित्रपट ‘मामाच्या गोव्याला जाऊया’ (Mamachya Govyala Jauya)आपल्या भन्नाट गाण्यांमुळे आधीच चर्चेत आहे. आता चित्रपटातील आणखी एक प्रमोशनल गाणं ‘वणक्कम’ प्रेक्षकांच्या भेटीला आलं असून, साऊथ इंडियन स्टाईल, जोशपूर्ण संगीत आणि दमदार सादरीकरणामुळे या गाण्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

‘वणक्कम’ या गाण्यात साऊथ इंडियन संगीताची लय, रंगतदार बीट्स आणि उत्साहाने भरलेला माहोल अनुभवायला मिळतो. आकर्षक कोरिओग्राफी आणि धमाल सादरीकरणामुळे हे गाणं प्रेक्षकांना ठेका धरायला भाग पाडतं. गोव्याच्या पार्श्वभूमीवर साऊथ इंडियन तडका देणारं हे गाणं चित्रपटाच्या मजेशीर आणि मनोरंजक प्रवासाची आणखी एक झलक दाखवतं.

साऊथ इंडियन शैलीचा असा हटके प्रयोग

मराठी चित्रपटात साऊथ इंडियन शैलीचा असा हटके प्रयोग प्रेक्षकांसाठी वेगळा अनुभव ठरणार आहे. या गाण्याला अवधूत गुप्ते आणि राहुल देशपांडे यांच्या दमदार आवाजाची साथ लाभली आहे. गाण्याचे बोल आणि संगीतही अवधूत गुप्ते यांचेच असून, त्यांच्या संगीतामुळे गाण्याला वेगळीच ऊर्जा प्राप्त झाली आहे.

या गाण्याविषयी दिग्दर्शक विजू माने म्हणाले, “‘मामाच्या गोव्याला जाऊया’ हा चित्रपट जसा मनोरंजनाचा धमाल प्रवास आहे, तसंच त्यातील प्रत्येक गाणंही वेगळा अनुभव देणारं आहे. ‘वणक्कम’ करताना आम्ही साऊथ इंडियन संगीताचा उत्साह, ऊर्जा आणि सेलिब्रेशनची भावना मराठी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. हे गाणं अत्यंत एंटरटेनिंग आहे आणि चित्रपटात वेगळीच रंगत आणतं. विशेष म्हणजे, हे गाणं आम्ही सुपरस्टार रजनीकांत यांना समर्पित करत आहोत. प्रेक्षकांना हे गाणं नक्की आवडेल, असा मला विश्वास आहे.”


Marathi Bhakti Geet: रूपकुमार राठोड यांच्या संगीताने सजलं ‘पालखी निघाली वारीला’; कन्या रीवा राठोडचं मराठीत पहिलंच भक्तिगीत

‘विजुमेनिया प्रा. लि.’ आणि ‘लाईट अँड शेड’ प्रस्तुत या चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन आणि निर्मिती विजू माने यांनी केली आहे. पटकथा आणि संवाद विजू माने, राहुल आवटे आणि कुशल बद्रिके यांचे आहेत.

या दिवशी होणार चित्रपट रिलीज

मैत्री, धमाल आणि मनोरंजनाचा अनोखा अनुभव देणारा ‘मामाच्या गोव्याला जाऊया’ हा चित्रपट ३१ जुलै रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

Sonu Sood Birthday : इंजिनिअर ते बॉलिवूड स्टार! ‘दबंग’चा खलनायक ते कोविडमधील ‘रिअल हिरो’; असा आहे सोनू सूदचा प्रेरणादायी प्रवास

Web Title: Mamachya govyala jauya movie vanakkam song release marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 30, 2026 | 01:39 PM

Topics:  

  • kushal badrike
  • marathi movie
  • santosh juvekar

संबंधित बातम्या

Gondhal Movie: Oscarसाठी मराठी चित्रपट ‘गोंधळ’ची निवड; विविध भाषांमधील 33 चित्रपटांना टाकले मागे
1

Gondhal Movie: Oscarसाठी मराठी चित्रपट ‘गोंधळ’ची निवड; विविध भाषांमधील 33 चित्रपटांना टाकले मागे

Bandhu Marathi Movie: भजनाच्या तालावर रंगले ‘बंधू’; उपेंद्र लिमये-जितेंद्र जोशींनी घेतले गणरायाचे दर्शन
2

Bandhu Marathi Movie: भजनाच्या तालावर रंगले ‘बंधू’; उपेंद्र लिमये-जितेंद्र जोशींनी घेतले गणरायाचे दर्शन

Devghar On Rent Marathi Movie: ‘देवघर ऑन रेंट’चा थरारक ट्रेलर रिलीज; अध्यात्म, रहस्य आणि ॲक्शनचा जबरदस्त तडका
3

Devghar On Rent Marathi Movie: ‘देवघर ऑन रेंट’चा थरारक ट्रेलर रिलीज; अध्यात्म, रहस्य आणि ॲक्शनचा जबरदस्त तडका

Sai Tamhankar Adkitta: अडकित्ता’मधील मंगलच्या भूमिकेबद्दल सई ताम्हणकरने सांगितला खास अनुभव
4

Sai Tamhankar Adkitta: अडकित्ता’मधील मंगलच्या भूमिकेबद्दल सई ताम्हणकरने सांगितला खास अनुभव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.