Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘मामाच्या गोव्याला जाऊया’चा जल्लोषात पार पडला संगीत अनावरण सोहळा,’एनर्जीने भरलेल्या गाण्यांनी जिंकली प्रेक्षकांची मनं

'मामाच्या गोव्याला जाऊया' चित्रपटाचा संगीत अनावरण सोहळा जल्लोषात पार पडला. 'लागले', 'डार्लिंग' आणि शीर्षकगीताची झलक प्रेक्षकांसमोर सादर करण्यात आली. ३१ जुलैला प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटाविषयी जाणून घ्या.

  • By अमृता यादव
Updated On: Jul 02, 2026 | 02:58 PM
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

मैत्री, मस्ती आणि गोव्याच्या भन्नाट ट्रिपची झलक दाखवणारा ‘मामाच्या गोव्याला जाऊया’ हा मराठी चित्रपट प्रदर्शनापूर्वीच चर्चेत आला आहे. चित्रपटाच्या ट्रेलरची उत्सुकता शिगेला पोहोचली असताना, आता त्यातील गाण्यांनी चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढवली आहे. नुकत्याच पार पडलेल्या भव्य म्युझिक लॉन्च सोहळ्यात ‘लागले’ या गाण्याचे अनावरण करण्यात आले, तर ‘डार्लिंग’ आणि शीर्षकगीत ‘मामाच्या गोव्याला जाऊया’ यांची झलकही सादर करण्यात आली.

ठाण्यात पार पडलेल्या या सोहळ्याला ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के, चित्रपटाची संपूर्ण टीम, कलाकार आणि संगीतकार उपस्थित होते. कार्यक्रमात कलाकारांनी शूटिंगदरम्यानचे अनेक मजेशीर अनुभव सांगितले. गोव्यातील लोकेशन्स, मैत्रीचे किस्से आणि चित्रपटाच्या निर्मितीमागील आठवणींनी उपस्थितांचे भरभरून मनोरंजन केले.

‘लागले’ या गाण्याला गायक रवींद्र खोमणे यांचा दमदार आवाज लाभला असून, अनुराग गोडबोले यांनी संगीत दिले आहे. तर या गाण्याचे बोल विजू माने यांनी लिहिले आहेत. आकर्षक संगीत, जोशपूर्ण सादरीकरण आणि हटके हूक स्टेपमुळे हे गाणे सोशल मीडियावरही चर्चेचा विषय ठरत आहे.

संगीतकार अवधूत गुप्ते यांनी सांगितले की, या चित्रपटातील प्रत्येक गाणे वेगवेगळ्या मूडचे आहे. मैत्री, प्रवास, प्रेम आणि गोव्याचा उत्साह यांचे सुंदर मिश्रण संगीतामधून साकारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ही गाणी प्रेक्षकांच्या प्लेलिस्टमध्ये कायमची जागा मिळवतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Abhijeet Sawant : 20 वर्षांनंतर अभिजीत सावंत ‘इंडियन आयडॉल’च्या मंचावर, वीकेंड स्पेशल एपिसोडमध्ये रंगणार खास परफॉर्मन्स

चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक आणि निर्माते विजू माने म्हणाले की, “‘मामाच्या गोव्याला जाऊया’ हा फक्त गोव्याच्या ट्रिपचा चित्रपट नाही, तर मित्रांच्या नात्याचा, आठवणींचा आणि भरपूर मनोरंजनाचा प्रवास आहे. गाण्यांना मिळणारा प्रतिसाद पाहून आम्ही खूप आनंदी आहोत. आता प्रेक्षकांनी मोठ्या पडद्यावरही हा अनुभव घ्यावा, अशी अपेक्षा आहे.”

Mandar Jadhav: ‘९व्या मजल्यावरून उडी मारण्याचा विचार..,’ मंदार जाधवने सांगितला आयुष्यातील सर्वात कठीण काळ, म्हणाला, ‘त्या क्षणी’

‘विजुमेनिया प्रा. लि.’ आणि ‘लाईट अँड शेड’ प्रस्तुत या चित्रपटात कुशल बद्रिके, अभिजीत चव्हाण, संतोष जुवेकर आणि अंकुश चौधरी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. मैत्री आणि धमाल मनोरंजनाचा हा प्रवास ३१ जुलै रोजी चित्रपटगृहांत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Web Title: Mamachya govyala jauya music launch held amid grand celebrations high energy songs win hearts of the audience

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 02, 2026 | 02:58 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • marathi movie
  • santosh juvekar

संबंधित बातम्या

Afratafri Movie: ‘अफरातफरी’मध्ये ग्लॅमरचा तडका अन् मस्तीचा जल्लोष! ‘होऊन जाऊ दे’ गाणं प्रदर्शित
1

Afratafri Movie: ‘अफरातफरी’मध्ये ग्लॅमरचा तडका अन् मस्तीचा जल्लोष! ‘होऊन जाऊ दे’ गाणं प्रदर्शित

Pach Futacha Bachchan Movie: कीर्तन, कोल्हापुरी भाषा अन् नाट्यमय कथा, पाच फुटाचा बच्चन’ चित्रपटाच्या ट्रेलरने वेधलं लक्ष
2

Pach Futacha Bachchan Movie: कीर्तन, कोल्हापुरी भाषा अन् नाट्यमय कथा, पाच फुटाचा बच्चन’ चित्रपटाच्या ट्रेलरने वेधलं लक्ष

Gondhal Marathi Movie: ‘गोंधळ’ची ऑस्करवारी सुरू! मुख्यमंत्र्यांची भेट घेत टीमने केली ‘ही’ खास मागणी
3

Gondhal Marathi Movie: ‘गोंधळ’ची ऑस्करवारी सुरू! मुख्यमंत्र्यांची भेट घेत टीमने केली ‘ही’ खास मागणी

Bakaiti Season 2: कटारिया कुटुंबात पुन्हा रंगणार धमाल; शीबा चड्ढांनी सांगितलं सुष्माच्या पात्राचं खास वैशिष्ट्य
4

Bakaiti Season 2: कटारिया कुटुंबात पुन्हा रंगणार धमाल; शीबा चड्ढांनी सांगितलं सुष्माच्या पात्राचं खास वैशिष्ट्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.