Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Manjar Marathi Movie: ‘मांजर’ नेमकं कोण? तीन मित्रांच्या गोंधळाची भन्नाट गोष्ट; ‘या’ दिवशी होणार रहस्याचा उलगडा

Manjar Marathi Movie: सिद्धार्थ मेनन, ओंकार भोजने यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘मांजर’ या मराठी चित्रपटाचं पोस्टर रिलीज. १८ सप्टेंबर २०२६ रोजी चित्रपट होणार प्रदर्शित.

  • By अमृता यादव
Updated On: Aug 16, 2026 | 01:04 PM
(फोटो सौजन्य- सोशल मिडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मिडिया)

Follow Us
Follow Us:

Manjar Marathi Movie: मराठी सिनेसृष्टीत आणखी एका भन्नाट कॉमेडी चित्रपटाची भर पडणार आहे. ‘मांजर’ या आगामी मराठी चित्रपटाचं पोस्टर नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीला आलं असून, पोस्टरने चित्रपटाबद्दलचं कुतूहल चांगलंच वाढवलं आहे. तीन मित्र, घरभर पसरलेला पसारा आणि या सगळ्यामध्ये ‘मांजर’चा नेमका काय संबंध, असा प्रश्न पोस्टर पाहिल्यानंतर पडतो.

घरातील अस्ताव्यस्त पसारा, बिनधास्त मित्रांची गँग आणि त्यांचं बेफिकीर जगणं पोस्टरमध्ये पाहायला मिळतं. कपडे, मोबाईल, लॅपटॉप, इअरफोन्स, बॅग्ज आणि रोजच्या वापरातील वस्तूंमध्ये हे मित्र अक्षरशः निवांत लोळताना दिसत आहेत. मात्र, या सगळ्या गोंधळामागचं नेमकं कारण काय, याचा उलगडा पोस्टरमध्ये केलेला नाही. त्यामुळे चित्रपटाची उत्सुकता आणखी वाढली आहे.

‘मांजर’ आणि तीन मित्रांचं नातं काय?

पोस्टरमधून ‘मांजर’ ही केवळ तीन मित्रांची गोष्ट नसून त्यांच्या आयुष्यात घडणाऱ्या मजेशीर आणि गोंधळात टाकणाऱ्या घटनांची धमाल कॉमेडी असल्याची झलक मिळते. या तीन मित्रांच्या आयुष्यात ‘मांजर’ आधीपासूनच एक भाग असल्याचं दिग्दर्शक सुशील महादेव यांनी सांगितलं आहे. मात्र, त्याच्याभोवती घडणाऱ्या घटनांमुळे त्यांच्या निवांत आयुष्यात मजेशीर परिस्थिती निर्माण होते.

दिग्दर्शक सुशील महादेव म्हणतात, “‘मांजर’मध्ये तीन मित्रांचं मोकळंढाकळं विश्व आणि त्यातून निर्माण होणाऱ्या भन्नाट परिस्थिती पाहायला मिळणार आहेत. मांजर हा त्यांच्या जगाचा आधीपासूनच एक भाग आहे; मात्र त्याच्याभोवती घडणाऱ्या घटनांमुळे त्यांच्या आयुष्यात मजेशीर परिस्थिती निर्माण होते.”

पात्रांची केमिस्ट्री, कॉमेडी आणि या गोंधळामागचं कारण प्रेक्षकांना नक्कीच एंटरटेन करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. मात्र, मांजराचं कथेत नेमकं स्थान काय आहे, हे सध्या गुलदस्त्यात ठेवण्यात आलं आहे.

Ranbir Kapoor Ramayana: ‘रामायण’ भारतात वेगळी, चीनमध्ये वेगळी! रणबीर कपूरच्या सिनेमात ३३ मिनिटांचा फरक, जाणून घ्या कारण

सिद्धार्थ मेनन, ओंकार भोजनेसह कलाकारांची फौज

एचथ्रीओ मोशन पिक्चर्स आणि जस्ट राईट फिल्म्स निर्मित या चित्रपटाचं दिग्दर्शन सुशील महादेव यांनी केलं आहे. सिद्धार्थ मेनन, ओंकार भोजने, तेजस राऊत आणि भाग्यश्री लिमये यांच्या प्रमुख भूमिका आहेत. पोस्टरमध्ये या कलाकारांची धमाल केमिस्ट्री पाहायला मिळते.

याशिवाय सयाजी शिंदे, अंशुमन विचारे, वैष्णवी अंधाडे आणि अश्विनी काळसेकर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

१८ सप्टेंबरला उलगडणार गोंधळाचं गुपित

हर्ष, अविनाश शर्मा, हरि राजपूत, बंटी नागी आणि जसबीर नागी यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटाच्या वितरणाची जबाबदारी एए फिल्म्सने सांभाळली आहे.

तीन मित्रांच्या या भन्नाट गोंधळामागचं रहस्य आणि ‘मांजर’चा कथेशी नेमका संबंध काय, हे १८ सप्टेंबर २०२६ रोजी चित्रपटगृहात समोर येणार आहे. त्यामुळे या हटके कॉमेडीची प्रेक्षकांमध्ये आतापासूनच उत्सुकता निर्माण झाली आहे.

Ranbir Kapoor Ramayana: ‘रामायण’ भारतात वेगळी, चीनमध्ये वेगळी! रणबीर कपूरच्या सिनेमात ३३ मिनिटांचा फरक, जाणून घ्या कारण

Web Title: Manjar poster sparks curiosity the mystery behind the chaos to be unveiled on september 18

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 16, 2026 | 01:04 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • marathi movie

संबंधित बातम्या

Afratafri Movie: ‘अफरातफरी’मध्ये ग्लॅमरचा तडका अन् मस्तीचा जल्लोष! ‘होऊन जाऊ दे’ गाणं प्रदर्शित
1

Afratafri Movie: ‘अफरातफरी’मध्ये ग्लॅमरचा तडका अन् मस्तीचा जल्लोष! ‘होऊन जाऊ दे’ गाणं प्रदर्शित

Pach Futacha Bachchan Movie: कीर्तन, कोल्हापुरी भाषा अन् नाट्यमय कथा, पाच फुटाचा बच्चन’ चित्रपटाच्या ट्रेलरने वेधलं लक्ष
2

Pach Futacha Bachchan Movie: कीर्तन, कोल्हापुरी भाषा अन् नाट्यमय कथा, पाच फुटाचा बच्चन’ चित्रपटाच्या ट्रेलरने वेधलं लक्ष

Gondhal Marathi Movie: ‘गोंधळ’ची ऑस्करवारी सुरू! मुख्यमंत्र्यांची भेट घेत टीमने केली ‘ही’ खास मागणी
3

Gondhal Marathi Movie: ‘गोंधळ’ची ऑस्करवारी सुरू! मुख्यमंत्र्यांची भेट घेत टीमने केली ‘ही’ खास मागणी

Bakaiti Season 2: कटारिया कुटुंबात पुन्हा रंगणार धमाल; शीबा चड्ढांनी सांगितलं सुष्माच्या पात्राचं खास वैशिष्ट्य
4

Bakaiti Season 2: कटारिया कुटुंबात पुन्हा रंगणार धमाल; शीबा चड्ढांनी सांगितलं सुष्माच्या पात्राचं खास वैशिष्ट्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.