Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Smita Tambe Movie: शेतकरी कुटुंबाचा संघर्ष, नात्यांची गुंतागुंत अन् राजकारणाचं वास्तव; ‘धडपड’च्या चित्रीकरणाला सुरुवात

Smita Tambe Movie: ‘धडपड’ या आगामी मराठी सिनेमाच्या चित्रीकरणाला गोमेवाडीत सुरुवात झाली आहे. स्मिता तांबेच्या मध्यवर्ती भूमिकेतून शेतकरी कुटुंबाचा संघर्ष आणि ग्रामीण जीवनाचं वास्तव उलगडणार.

  • By अमृता यादव
Updated On: Aug 12, 2026 | 10:46 AM
( फोटो सौजन्य- सोशल मिडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मिडिया)

Follow Us
Follow Us:

Smita Tambe Movie: मराठी सिनेसृष्टीत वेगवेगळ्या विषयांवर आधारित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. आता ‘धडपड’ या आगामी मराठी चित्रपटातून ग्रामीण जीवन, शेतकरी कुटुंबाचा संघर्ष, नात्यांमधील गुंतागुंत आणि स्वप्नांसाठीची जिद्द रुपेरी पडद्यावर उलगडणार आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला नुकतीच आटपाडी तालुक्यातील गोमेवाडी येथे सुरुवात झाली आहे. स्त्रीप्रधान विषय असलेल्या या चित्रपटात अभिनेत्री स्मिता तांबे मध्यवर्ती भूमिकेत दिसणार आहे.

गोमेवाडीत ‘धडपड’च्या चित्रीकरणाला सुरुवात

बोधी सिनेमा प्रस्तुत आणि अश्विनी समाधान ऐवळे निर्मित ‘धडपड’ या चित्रपटाची कथा बालाजी वाघमोडे यांच्या कथेवर आधारित आहे. या चित्रपटाच्या निर्मितीसाठी अनुभवी तंत्रज्ञांची टीम कार्यरत आहे. काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘फुला’ या चित्रपटाचे दिग्दर्शक अभिषेक जावीर ‘धडपड’चे दिग्दर्शन करत आहेत.

चित्रपटासाठी क्रिएटिव्ह डायरेक्टर म्हणून अनुप जगदाळे, कॅमेरामन वीरधवल पाटील, कला दिग्दर्शक अतुल लोखंडे, वेशभूषा दीपाली देशमुख, नेपथ्य स्वाती थोरात, कार्यकारी निर्माता कल्पेश जगताप आणि संगीत दिग्दर्शक समाधान ऐवळे काम पाहत आहेत.

Sara Ali Khan Birthday: शाळेत सस्पेंड होता होता वाचली होती सारा अली खान; अमृता सिंह यांनी सुशांतला दिली होती खास ताकीद

स्मिता तांबेंसह दमदार कलाकारांची फौज

‘धडपड’मध्ये स्मिता तांबे, किशोर चौगुले, कुशल बद्रिके, पार्थ भालेराव, मोनालिसा बागल, अश्विनी कासार, प्रभाकर मोरे आणि रोहित चव्हाण हे कलाकार प्रमुख भूमिकांमध्ये झळकणार आहेत.

अल्पभूधारक शेतकरी कुटुंबाची संघर्षगाथा

‘धडपड’चे कथानक एका अल्पभूधारक शेतकरी कुटुंबाभोवती फिरते. कर्त्या पुरुषाच्या चुकीच्या निर्णयांमुळे आणि कर्मदरिद्रीपणामुळे कुटुंबाच्या स्वप्नांची होणारी राख, त्यानंतर उभ्या राहणाऱ्या अडचणी आणि या संकटांमध्येही संसाराचा गाडा पुढे नेण्यासाठी धडपडणारी स्त्री, यांचे भावनिक आणि वास्तववादी चित्रण चित्रपटात करण्यात आले आहे.

कुटुंब आणि आपल्या रानासाठी अहोरात्र मेहनत करणाऱ्या स्त्रीची संघर्षगाथा ‘धडपड’मधून मांडण्यात येणार आहे. त्यासोबतच गावातील राजकारण, महिला नेतृत्व, राजकीय कुरघोड्या आणि त्याचा सामान्य माणसावर होणारा परिणाम यावरही चित्रपट भाष्य करणार आहे.

Eetha Movie Postponed: श्रद्धा कपूरच्या ‘ईठा’ची रिलीज डेट बदलली; यशसोबतचा क्लॅश टळला, आता प्रभास-अक्षयसमोर आव्हान!

ग्रामीण मातीशी जोडलेली कथा

ग्रामीण मातीत रुजलेली कथा, शेतकरी कुटुंबाचा संघर्ष, नात्यांची गुंतागुंत, राजकारणाचे वास्तव आणि स्वप्नांसाठीची जिद्द या सगळ्यांचा संगम ‘धडपड’मध्ये पाहायला मिळणार आहे. त्यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांसाठी वेगळा अनुभव ठरेल, असा विश्वास दिग्दर्शक अभिषेक जावीर यांनी व्यक्त केला आहे.

Web Title: Marathi movie dhadpad to bring a rural families struggle to the big screen

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 12, 2026 | 10:46 AM

Topics:  

  • Entertainemnt News
  • marathi actress
  • marathi movie

संबंधित बातम्या

Zee Marathi Serial: मनोरंजनासोबत प्रबोधनही! ‘कृष्णाईच्या लेकी’मध्ये दारूबंदीचा लढा; गावासाठी एकवटणार महिला
1

Zee Marathi Serial: मनोरंजनासोबत प्रबोधनही! ‘कृष्णाईच्या लेकी’मध्ये दारूबंदीचा लढा; गावासाठी एकवटणार महिला

Onkar Bhojane On Milind Kawde: ‘नक्कीच उत्तर देईन’; ‘अफरातफरी’च्या प्रमोशनवरून वाद, मिलिंद कवडेंच्या आरोपांवर ओंकार भोजनेचं उत्तर
2

Onkar Bhojane On Milind Kawde: ‘नक्कीच उत्तर देईन’; ‘अफरातफरी’च्या प्रमोशनवरून वाद, मिलिंद कवडेंच्या आरोपांवर ओंकार भोजनेचं उत्तर

Ishwar Thakur: ‘FIR’ फेम अभिनेता ईश्वर ठाकूरची मृत्यूशी झुंज; रुग्णालयात उपचार सुरू, कुटुंबीयांनी मागितली आर्थिक मदत
3

Ishwar Thakur: ‘FIR’ फेम अभिनेता ईश्वर ठाकूरची मृत्यूशी झुंज; रुग्णालयात उपचार सुरू, कुटुंबीयांनी मागितली आर्थिक मदत

Ravi Prakash: खाकी वर्दीत दिसणार तेलुगू अभिनेता रवी प्रकाश; ‘दशमी’मधील ACP आसिफ मुजावरची भूमिका चर्चेत
4

Ravi Prakash: खाकी वर्दीत दिसणार तेलुगू अभिनेता रवी प्रकाश; ‘दशमी’मधील ACP आसिफ मुजावरची भूमिका चर्चेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.