Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 24 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Marathi OTT Content August 2026: कॉमेडी, सस्पेन्स ते कौटुंबिक कथा; OTTवर पाहा हे ट्रेंडिंग मराठी सिनेमे आणि वेबसीरिज

Marathi OTT Content August 2026: ‘बाई ग’, ‘सौभाग्यवती सरपंच २’, ‘८ वाजून १३ मिनिटे’, ‘कैरी’ यांसह अनेक मराठी चित्रपट आणि वेबसीरिज अल्ट्रा झकासवर पाहा.

  • By अमृता यादव
Updated On: Aug 19, 2026 | 09:15 AM
( फोटो सौजन्य- सोशल मिडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मिडिया)

Follow Us
Follow Us:

Marathi OTT Content August 2026: मराठी सिनेमाची खरी ताकद त्याच्या वैविध्यपूर्ण कथांमध्ये आहे. वेगवेगळे विषय, लक्षवेधी कथानकं आणि दमदार अभिनयामुळे मराठी कंटेंटने प्रेक्षकांच्या मनात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. आता जुने तसेच नवे मराठी चित्रपट आणि वेबसीरिज अल्ट्रा झकास मराठी या OTT प्लॅटफॉर्मवर एकाच ठिकाणी पाहता येणार आहेत.

कॉमेडी, सस्पेन्स-थ्रिलर, कौटुंबिक नाती, सामाजिक प्रश्न आणि भावनिक कथांचा अनुभव देणाऱ्या अनेक कलाकृतींचा यामध्ये समावेश आहे. त्यामुळे या ऑगस्टमध्ये मराठी मनोरंजनाचा खास डोस घेण्यासाठी प्रेक्षकांकडे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. जाणून घेऊया या यादीत कोणते चित्रपट आणि वेबसीरिज आहेत.

‘बाई ग’

नुकताच अल्ट्रा झकासवर स्ट्रीम झालेला ‘बाई ग’ हा चित्रपट धनुषच्या (स्वप्नील जोशी) आयुष्याभोवती फिरतो. वैवाहिक आयुष्यातील अडचणींमुळे आपल्या निर्णयांचा विचार करत असताना त्याच्या मागील पाच जन्मांतील पत्नी वर्तमान आयुष्यात परत येतात. प्रार्थना बेहरे या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसते. भूतकाळातील नाती आणि वर्तमानातील परिस्थिती यांची अनोखी सांगड या कथेत पाहायला मिळते.

‘सौभाग्यवती सरपंच २’

अल्ट्रा झकास ओरिजिनल वेबसीरिज ‘सौभाग्यवती सरपंच २’मध्ये अवलीची (देविका दफ्तरदार) गावातील राजकीय आणि सामाजिक लढाई पुढे सुरू राहते. नाना हा नवा प्रतिस्पर्धी तिच्यासमोर आव्हान उभे करतो. त्याचवेळी गावातील पाणीटंचाईचा प्रश्न सोडवण्याची जबाबदारीही अवलीसमोर आहे. त्यामुळे राजकारणासोबतच सामाजिक प्रश्नांचीही झलक या मालिकेत पाहायला मिळते.

‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’

‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’मध्ये रतन (अशोक सराफ), चंदन (भरत जाधव) आणि मदन (मकरंद अनासपुरे) या तीन भावांची गॅरेजमधील कथा पाहायला मिळते. तिघांनीही लग्न न करण्याचा निर्णय घेतलेला असतो. मात्र, त्यांच्या आयुष्यात एका महिलेचा प्रवेश झाल्यानंतर त्यांच्या आयुष्याला वेगळे वळण मिळते. त्यातून निर्माण होणारे गैरसमज आणि विनोदी प्रसंग प्रेक्षकांचे मनोरंजन करतात.

‘भागुबाई’

‘भागुबाई’मध्ये निर्मिती सावंत यांनी साकारलेली व्यक्तिरेखा गावातील घडामोडी आणि गुपितांभोवती फिरते. माहिती मिळवण्याची आणि ती इतरांपर्यंत पोहोचवण्याची तिची सवय गावातील नातेसंबंध आणि समीकरणांवर परिणाम करते. सत्य, हेतू आणि सामाजिक संबंधांचा वेध घेणारी ही कथा प्रेक्षकांसाठी वेगळी ठरू शकते.

‘८ वाजून १३ मिनिटे’

अल्ट्रा झकास ओरिजिनल ‘८ वाजून १३ मिनिटे’ ही सुनील बर्वे यांनी साकारलेल्या बँक मॅनेजरच्या आयुष्याभोवती फिरणारी सस्पेन्स-थ्रिलर वेबसीरिज आहे. निवृत्तीनंतर शांत आयुष्य जगण्याची त्यांची योजना एका अनपेक्षित घटनेमुळे बदलते. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी घेतलेले निर्णय, गुन्हा आणि कुटुंबाच्या सुरक्षिततेतील संघर्ष या कथेत पाहायला मिळतो.

‘नशीब – किस्मत’

‘नशीब – किस्मत’मध्ये एका छोट्या गावातील तीन बेरोजगार अभियंत्यांच्या आयुष्याला चोरीच्या एका प्रकरणामुळे अनपेक्षित वळण मिळते. पैशांच्या गरजेतून सुरू झालेली त्यांची धावपळ त्यांना अशा परिस्थितीत घेऊन जाते, जिथे आपल्या निर्णयांचे परिणाम त्यांना भोगावे लागतात.

‘पोस्ट ऑफिस उघडं आहे’

‘पोस्ट ऑफिस उघडं आहे’ ही मालिका ९०च्या दशकाच्या उत्तरार्धातील पारगाव गावातील पोस्ट ऑफिसमधील कर्मचाऱ्यांच्या आयुष्यावर आधारित आहे. मकरंद अनासपुरे यांच्या प्रमुख भूमिकेतील या कथेत पारंपरिक कामकाजाच्या पद्धती आणि बदलत्या डिजिटल युगातील संघर्ष मांडण्यात आला आहे.

‘मारुती नगर पोलीस स्टेशन’

**‘मारुती नगर पोलीस स्टेशन’**मध्ये चार मित्र आपल्या मित्राच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी एका भ्रष्ट पोलीस अधिकाऱ्याला आणि कुख्यात गुंडाला लक्ष्य करण्याचा निर्णय घेतात. मात्र, त्यांच्या योजनेआधीच तिसरी व्यक्ती हे काम पूर्ण करते. त्यानंतर कथेला अनपेक्षित वळण मिळते आणि सस्पेन्स आणखी वाढतो.

‘वडापाव’

‘वडापाव’ या चित्रपटाची टॅगलाइनच ‘गोड कुटुंबाची तिखट लव्ह स्टोरी’ अशी आहे. लंडनमध्ये राहणाऱ्या जयदेव देशमुख (प्रसाद ओक) आणि त्यांच्या कुटुंबाची ही कथा आहे. ‘वडापाव’ रेस्टॉरंट चालवणाऱ्या जयदेवसमोर व्यवसायासोबतच कुटुंबातील नाती आणि मूल्ये जपण्याचे आव्हान उभे राहते.

2026 New Bollywood Couples: नवे चेहरे, नवी केमिस्ट्री! २०२६मध्ये या बॉलिवूड जोड्या करणार प्रेक्षकांचं मनोरंजन

‘ज्ञानेश्वर माऊली’

‘ज्ञानेश्वर माऊली’ ही मालिका संत ज्ञानेश्वर यांच्या जीवनावर आणि शिकवणीवर आधारित आहे. वरुण भागवत यांनी संत ज्ञानेश्वरांची भूमिका साकारली आहे. त्यांच्या बालपणापासून वयाच्या २१व्या वर्षी घेतलेल्या समाधीपर्यंतचा प्रवास मालिकेत मांडण्यात आला आहे. त्यांच्या आध्यात्मिक प्रवासासोबतच त्यांच्या शिकवणीचाही कथेत समावेश आहे.

‘कैरी’

‘कैरी’मध्ये सायली संजीव यांनी ग्रामीण महिलेची भूमिका साकारली आहे. ती पतीसोबत शहरात राहायला येते. मात्र, तिचा पती अचानक बेपत्ता झाल्यानंतर त्याचा शोध घेताना तिला अनोळखी शहरी परिस्थितीचा सामना करावा लागतो. सिद्धार्थ जाधव आणि सुबोध भावे हे कलाकारही या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.

लवकरच येणार ‘रहस्यम’ आणि ‘असावमी’

याशिवाय लवकरच ‘रहस्यम’ आणि ‘असावमी’ या दोन नव्या वेबसीरिजचीही अल्ट्रा झकास मराठी OTTवर भर पडणार आहे. रहस्य आणि सस्पेन्सने भरलेल्या या कथांमुळे प्रेक्षकांना मराठी मनोरंजनाचे आणखी नवे पर्याय मिळणार आहेत.

Lagn Aani Barach Kahi: लग्नाच्या पलीकडची गोष्ट! ‘लग्न आणि बरंच काही’मधून उमटणार स्त्रीशक्तीचा नवा आवाज

फक्त अल्ट्रा झकासवर पाहता येणार कंटेंट

कॉमेडीपासून सस्पेन्सपर्यंत आणि कौटुंबिक कथांपासून ऐतिहासिक-आध्यात्मिक विषयांपर्यंत विविध प्रकारचा मराठी कंटेंट या प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळणार आहे. हे सर्व चित्रपट आणि वेबसीरिज अल्ट्रा झकास या OTT प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत. त्यामुळे मराठी मनोरंजनाचा खास अनुभव घेऊ इच्छिणाऱ्या प्रेक्षकांसाठी ऑगस्ट महिन्यात ही कंटेंट लायब्ररी नक्कीच आकर्षण ठरणार आहे.

Web Title: Marathi ott content august 2026 trending movies web series ultra jhakaas

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 19, 2026 | 09:15 AM

Topics:  

  • Entertainemnt News
  • marathi movie
  • OTT

संबंधित बातम्या

Bagulbua: पहिल्यांदाच मराठीतील AI चित्रपट, ‘बागुलबुवा’ अभिजीत खांडकेकरसह 55 दमदार कलाकार झळकणार
1

Bagulbua: पहिल्यांदाच मराठीतील AI चित्रपट, ‘बागुलबुवा’ अभिजीत खांडकेकरसह 55 दमदार कलाकार झळकणार

Exclusive: मालिका, ओटीटी गाजवलं; आता मोठ्या पडद्यावर झळकणार अक्षया नाईक! पहिल्या सिनेमाबद्दल काय म्हणाली अभिनेत्री?
2

Exclusive: मालिका, ओटीटी गाजवलं; आता मोठ्या पडद्यावर झळकणार अक्षया नाईक! पहिल्या सिनेमाबद्दल काय म्हणाली अभिनेत्री?

Maitreya Marathi Movie: मैत्री, मस्ती अन् प्रेमाचे रंग! ‘मैत्रेया’चं टायटल साँग प्रदर्शित; क्रांती रेडकरने पहिल्यांदाच गायला रॅप
3

Maitreya Marathi Movie: मैत्री, मस्ती अन् प्रेमाचे रंग! ‘मैत्रेया’चं टायटल साँग प्रदर्शित; क्रांती रेडकरने पहिल्यांदाच गायला रॅप

Janak Marathi Movie Teaser: बापाच्या सन्मानासाठी लेकीचा न्यायालयात लढा! सायली संजीवच्या ‘जनक’चा दमदार टीझर रिलीज
4

Janak Marathi Movie Teaser: बापाच्या सन्मानासाठी लेकीचा न्यायालयात लढा! सायली संजीवच्या ‘जनक’चा दमदार टीझर रिलीज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.