Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सातारकरांनो, लक्ष द्या! जिल्ह्यात चित्रपटसृष्टी उभारण्याचे स्वप्न होणार पूर्ण! मेघराज राजे भोसले यांचे प्रयत्न

सातारा जिल्ह्यातील कलाकार, तंत्रज्ञ, छायाचित्रकार आणि ज्युनिअर आर्टिस्ट यांना अधिक संधी मिळाव्यात यासाठी जिल्ह्यात चित्रपटसृष्टी विकसित करण्यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासन मेघराज राजे भोसले यांनी दिले.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jun 02, 2026 | 04:41 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • समर्थ पॅनलच्या उमेदवारांनी आपल्या भावी कामकाजाचा आराखडा मांडला.
  • समर्थ पॅनलच्या ‘पतंग’ चिन्हासमोर मतदान करून पॅनलला पाठिंबा देण्याचे आवाहनही त्यांनी केले.
  • आश्वासन मेघराज राजे भोसले यांनी दिले.
सातारा जिल्ह्यातील कलाकार, छायाचित्रकार, ज्युनिअर आर्टिस्ट आणि विविध क्षेत्रातील तंत्रज्ञांना अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यात चित्रपटसृष्टी विकसित करण्याच्या दृष्टीने राज्य शासनाकडे पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासन अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे विद्यमान अध्यक्ष तसेच समर्थ पॅनलचे अध्यक्षपदाचे उमेदवार मेघराज राजे भोसले यांनी दिले. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या पंचवार्षिक संचालक मंडळ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर साताऱ्यात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही भूमिका मांडली. ७ जून रोजी कोल्हापूर, मुंबई, पुणे आणि सातारा या चार जिल्ह्यांमध्ये मतदान होणार असून, यानिमित्त समर्थ पॅनलच्या उमेदवारांनी आपल्या भावी कामकाजाचा आराखडा मांडला.

‘Drishyam 3’: खतरनाक खुनाचा थरार! विजय साळगावकर पुन्हा येतोय – शूटिंग पूर्ण, ‘या’ दिवशी चित्रपट होणार रिलीज

या पत्रकार परिषदेला निर्माता सुनील महाजन, दीपक कदम, दिग्दर्शक अजित शिरोळे, लेखक राज काळे, अभिनेते सुशांत शेलार, छायाचित्रकार धनाजी यमकर, दिग्दर्शक सुभाष नकाशे, ध्वनी संयोजक शरद चव्हाण, कला दिग्दर्शक प्रवीण पाटील, वेशभूषाकार चैत्राली डोंगरे, निर्माता व्यवस्थापक रवी गावडे, प्रसिद्धी प्रमुख गणेश गारगोटे आणि कामगार प्रतिनिधी विकास तोरणे उपस्थित होते.

यावेळी बोलताना भोसले म्हणाले की, सातारा जिल्ह्याला कलाकार, तंत्रज्ञ, निर्माते आणि दिग्दर्शकांची समृद्ध परंपरा लाभली आहे. अण्णा देशपांडे, दीपक देशमुख आणि दिवंगत निर्माते अरुण गोडबोले यांसारख्या मान्यवरांनी जिल्ह्याची ओळख मराठी चित्रपटसृष्टीत भक्कम केली आहे. त्यामुळे स्थानिक कलावंतांना अधिक व्यासपीठ मिळावे यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येतील.

सातारा जिल्ह्यात चित्रपट महामंडळाचे सुमारे २२०० सभासद असून, अ वर्गातील ११५ मतदार मतदानाचा हक्क बजावणार असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच समर्थ पॅनलच्या ‘पतंग’ चिन्हासमोर मतदान करून पॅनलला पाठिंबा देण्याचे आवाहनही त्यांनी केले.

‘मालिका संपतेय पण गोष्ट सुरूच राहणार!’ Star Pravah वर नव्या मालिकांचा बहर, ‘या’ प्रसिद्ध मालिकेचा अंत

पुढील पाच वर्षांसाठीच्या नियोजनाबाबत बोलताना त्यांनी सक्रिय सभासदसंख्या वाढविणे, कलाकार व तंत्रज्ञांच्या विविध प्रश्नांवर सातत्याने पाठपुरावा करणे, पेन्शन व मानधनासंदर्भातील मागण्या शासनापर्यंत पोहोचवणे आणि जिल्ह्यात चित्रपटनिर्मितीसाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्यासाठी प्रयत्न करणे, या बाबींना प्राधान्य दिले जाईल, असे सांगितले. “सातारा जिल्ह्यातील कलाकार आणि तंत्रज्ञांच्या हितासाठी समर्थ पॅनल पूर्णपणे कटिबद्ध आहे. त्यांच्या कोणत्याही अडचणी सोडवण्यासाठी मी स्वतः पुढाकार घेईन,” असे आश्वासन मेघराज राजे भोसले यांनी दिले.

Web Title: Meghraj raje bhosale announced about the indian film industry based in satara

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 02, 2026 | 04:41 PM

Topics:  

  • Film industry
  • Satara

संबंधित बातम्या

Satara YC College : सातारा YC कॉलेजमध्ये विद्यार्थिनीच्या आत्महत्येने खळबळ; रॅगिंगचा आरोप प्राचार्यांनी फेटाळला
1

Satara YC College : सातारा YC कॉलेजमध्ये विद्यार्थिनीच्या आत्महत्येने खळबळ; रॅगिंगचा आरोप प्राचार्यांनी फेटाळला

Satara News: सातारा जिल्ह्यात आरोग्य आणि शिक्षणाचा विकास; स्मार्ट आरोग्य केंद्रे व आदर्श शाळांसाठी कोट्यवधींचा निधी
2

Satara News: सातारा जिल्ह्यात आरोग्य आणि शिक्षणाचा विकास; स्मार्ट आरोग्य केंद्रे व आदर्श शाळांसाठी कोट्यवधींचा निधी

Satara Sugarcane Farmers: साखरेचे दर वाढल्याने कारखान्यांनी उसाचा दुसरा हप्ता जाहीर करावा; रयत क्रांती संघटना आक्रमक
3

Satara Sugarcane Farmers: साखरेचे दर वाढल्याने कारखान्यांनी उसाचा दुसरा हप्ता जाहीर करावा; रयत क्रांती संघटना आक्रमक

क्षणभराचा फरक अन् जीव वाचला! भरधाव ट्रक देऊर बसस्थानकात घुसला; ST स्टँडसह उपहारगृह जमीनदोस्त, मोठा अनर्थ टळला
4

क्षणभराचा फरक अन् जीव वाचला! भरधाव ट्रक देऊर बसस्थानकात घुसला; ST स्टँडसह उपहारगृह जमीनदोस्त, मोठा अनर्थ टळला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.