Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Onkar Bhojane: “ओंकार भोजने खूप अनप्रोफेशनल”; अभिनेत्याच्या वागण्यावर दिग्दर्शक मिलिंद कवडे संतापले, नेमकं काय घडलं?

Onkar Bhojane: ‘अफरातफरी’च्या प्रमोशनला गैरहजर राहिल्याने दिग्दर्शक मिलिंद कवडे यांनी अभिनेता ओंकार भोजने याच्याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. नेमकं काय घडले जाणून घ्या..

  • By अमृता यादव
Updated On: Sep 24, 2026 | 12:01 PM
(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

ओंकार भोजने फोन उचलत नसल्याचा मिलिंद कवडेंचा आरोप

“पुढच्या चित्रपटात ओंकारला अजिबात घेणार नाही”

गेल्या चार महिन्यांपासून संपर्क होत नसल्याचा दावा

Onkar Bhojane: मराठी मनोरंजनसृष्टीतील आगामी ‘अफरातफरी’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या चित्रपटाची संपूर्ण टीम प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. मात्र, याचदरम्यान काही कलाकार प्रमोशनला उपस्थित राहत नसल्याची चर्चा सुरू आहे. आता ‘अफरातफरी’चे दिग्दर्शक मिलिंद कवडे यांनी अभिनेता ओंकार भोजने याच्याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.

ओंकार भोजने फोन उचलत नसल्याचा आरोप

मिलिंद कवडे यांनी ‘महा MTB’ला दिलेल्या मुलाखतीत ओंकार भोजनेच्या प्रमोशनमधील सहभागाबाबत भाष्य केलं. त्यांनी सांगितलं की, जूनमध्येच ओंकारला ऑक्टोबरमध्ये चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र, त्यानंतर प्रमोशनसाठी त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही प्रतिसाद मिळाला नसल्याचं कवडे यांनी सांगितलं.

“ओंकार एवढा बिझी आहे की तो कोणाचेही फोन उचलत नाही. आम्हा तिघांचेही त्याने फोन उचलले नाहीत. कॉल केल्यानंतर त्याचा एकच मेसेज येतो, ‘दादा मी तुला कॉलबॅक करतो.’ गेल्या चार महिन्यांपासून हेच सुरू आहे,” असं मिलिंद कवडे यांनी सांगितलं.Onkar Bhojane

निर्मात्यांनीही पाठवला मेसेज

ओंकारकडून प्रतिसाद मिळत नसल्याने अखेर निर्मात्यांनी त्याला मेसेज करून नाराजी व्यक्त केल्याचंही मिलिंद कवडे यांनी सांगितलं. चित्रपटासाठी निर्मात्यांनी मोठी गुंतवणूक केलेली असते, त्यामुळे कलाकारांनी किमान प्रमोशनमध्ये सहकार्य करावं, असं त्यांनी म्हटलं.

कवडे यांनी अभिनेता मोहन आगाशे यांचं उदाहरणही दिलं. मोहन आगाशे हैदराबादमध्ये असतानाही त्यांनी तिथून सेल्फी व्हिडीओ पाठवून चित्रपटाचं प्रमोशन केल्याचं ते म्हणाले. त्यानंतर ते स्वत: प्रमोशनसाठी उपस्थित असल्याचंही कवडे यांनी सांगितलं.

“पुढच्या चित्रपटात ओंकारला घेणार नाही”

या प्रकारानंतर आपण पुढच्या चित्रपटात ओंकार भोजनेला घेणार नसल्याचं मिलिंद कवडे यांनी स्पष्ट केलं.

“आता मी कानाला खडा लावला आहे. मी पुढच्या चित्रपटात ओंकारला अजिबात घेणार नाही. मी आतापर्यंत खूप काम केलं आहे, पण या सगळ्यात तो खूप अनप्रोफेशनल आहे. दिग्दर्शकाचा फोन न उचलणं, निर्मात्यांचा फोन न उचलणं, EP ला गंडवणं आणि सतत येतो-येतो म्हणणं… याला अनप्रोफेशनलच म्हणतात,” असं कवडे यांनी म्हटलं.

Allu Arjun: भारतीय सिनेमाला ग्लोबल ओळख मिळवून देण्याच्या दिशेने मोठं पाऊल; ‘राका’ची गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये एंट्री

“तो कलाकार म्हणून उत्तम आहे, पण माणूस म्हणून…”

ओंकारच्या अभिनयाचं कौतुक करताना मात्र मिलिंद कवडे यांनी त्याचं कलाकार म्हणून कौतुक केलं. “तो एक कलाकार म्हणून उत्तम आहे, चांगलं काम करतो. पण माणूस म्हणून सॉरी! खूप अनप्रोफेशनल… तो सराईत खोटारडा आहे,” असं त्यांनी मुलाखतीत म्हटलं.

दरम्यान, ओंकार भोजनेने या आरोपांवर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिल्याची माहिती नाही. त्यामुळे मिलिंद कवडे यांनी केलेल्या आरोपांबाबत ओंकारची बाजू समोर येणं महत्त्वाचं ठरणार आहे.

‘अफरातफरी’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, सध्या त्याच्या प्रमोशनची जोरदार तयारी सुरू आहे.

Aai Tulja Bhavani Serial: ‘त्रिदल राजदंडा’साठी बालगणेश-कार्तिकेय देणार महापरीक्षा; शक्ती, युक्ती अन् भक्तीची रंगणार चुरस

Web Title: Onkar bhojane unprofessional milind kawde afaratfari

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 24, 2026 | 12:01 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • marathi actor
  • marathi movie

संबंधित बातम्या

Gondhal Movie: ‘गोंधळ’च्या ऑस्कर निवडीवर अनुराग कश्यपांनी व्यक्त केली नाराजी, दिग्दर्शक संतोष डावखरांनी दिलं सडेतोड उत्तर
1

Gondhal Movie: ‘गोंधळ’च्या ऑस्कर निवडीवर अनुराग कश्यपांनी व्यक्त केली नाराजी, दिग्दर्शक संतोष डावखरांनी दिलं सडेतोड उत्तर

Dhaktya Sunbai Marathi Serial: सोशल मीडियावर गाजल्यानंतर ‘या’ प्रसिद्ध इन्फ्लुएन्सरची मालिकेत एन्ट्री; पहिल्यांदाच टीव्हीवर झळकणार
2

Dhaktya Sunbai Marathi Serial: सोशल मीडियावर गाजल्यानंतर ‘या’ प्रसिद्ध इन्फ्लुएन्सरची मालिकेत एन्ट्री; पहिल्यांदाच टीव्हीवर झळकणार

Allu Arjun: भारतीय सिनेमाला ग्लोबल ओळख मिळवून देण्याच्या दिशेने मोठं पाऊल; ‘राका’ची गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये एंट्री
3

Allu Arjun: भारतीय सिनेमाला ग्लोबल ओळख मिळवून देण्याच्या दिशेने मोठं पाऊल; ‘राका’ची गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये एंट्री

Aai Tulja Bhavani Serial: ‘त्रिदल राजदंडा’साठी बालगणेश-कार्तिकेय देणार महापरीक्षा; शक्ती, युक्ती अन् भक्तीची रंगणार चुरस
4

Aai Tulja Bhavani Serial: ‘त्रिदल राजदंडा’साठी बालगणेश-कार्तिकेय देणार महापरीक्षा; शक्ती, युक्ती अन् भक्तीची रंगणार चुरस

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.