Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 12 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘Deool Band 2 : Aata Pariksha Devachi’ सिनेमाला अभूतपूर्व प्रतिसाद! गुरुपुष्यामृत मुहूर्तावर दमदार ओपनिंग

Deool Band 2 – Aata Pariksha Devachi या बहुचर्चित चित्रपटाने प्रदर्शित होताच मराठी प्रेक्षकांकडून तुफान प्रतिसाद मिळवत बॉक्स ऑफिसवर दमदार सुरुवात केली आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: May 22, 2026 | 11:49 AM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

२०१३ मध्ये प्रदर्शित झालेल्या Deool Band या सुपरहिट चित्रपटाने श्रद्धा आणि विज्ञान यांचा अनोखा संगम मांडत मराठी प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले होते. आता तब्बल ११ वर्षांनंतर आलेल्या Deool Band 2 – Aata Pariksha Devachi या बहुचर्चित सिक्वेलने प्रदर्शित होताच मराठी चित्रपटसृष्टीत दमदार एन्ट्री केली असून प्रेक्षकांकडून अभूतपूर्व प्रतिसाद मिळवत आहे.

System : मराठमोळा अभिनेता आता सिस्टम हलवणार! आदिनाथ कोठारे झळकणार महत्वाच्या भूमिकेत

विशेष म्हणजे, चित्रपट पारंपरिक शुक्रवारऐवजी गुरुवारी पहाटे सहा वाजता गुरुपुष्यामृत योग आणि ब्रह्ममुहूर्त साधत प्रदर्शित करण्यात आला. या अनोख्या प्रयोगालाही प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला असून पहाटेच्या शोसाठीही थिएटरबाहेर मोठी गर्दी पाहायला मिळाली. राज्यातील अनेक चित्रपटगृहांमध्ये पहिल्याच दिवशी शो हाऊसफुल्ल झाले. पुणे, पिंपरी-चिंचवड, मुंबई, नाशिक, विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात चित्रपटाला मोठा प्रतिसाद मिळत आहे.

मुंबईतील भांडुप, कल्याण, नालासोपारा, अंधेरी, ठाणे आणि लोअर परळ या मराठीबहुल भागांतही चित्रपटाची जबरदस्त क्रेझ पाहायला मिळाली. अनेक थिएटरमधील सर्व शो हाऊसफुल्ल झाले असून ऑनलाइन बुकिंग प्लॅटफॉर्मवर तिकिटांसाठी मोठी स्पर्धा पाहायला मिळाली. सोशल मीडियावरही चित्रपटातील दमदार संवाद, भावनिक प्रसंग, कथानक, संगीत आणि कलाकारांच्या अभिनयाचे जोरदार कौतुक होत आहे.

चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन Pravin Vitthal Tarde यांनी केले असून त्यांच्या वास्तववादी मांडणीमुळे चित्रपट अधिक प्रभावी ठरला आहे. तर ज्येष्ठ अभिनेते Mohan Joshi यांनी पुन्हा एकदा स्वामी समर्थांच्या दैवी भूमिकेत प्रभावी अभिनय साकारत प्रेक्षकांची वाहवा मिळवली आहे.

Vatvruksh Entertainment निर्मित या चित्रपटाची निर्मिती कैलास वाणी, जयश्री वाणी, कैवल्य वाणी आणि जुईली वाणी-सूर्यवंशी यांनी केली आहे. उत्कृष्ट छायांकन, भव्य सादरीकरण आणि प्रभावी पार्श्वसंगीतामुळे चित्रपट अधिक उठावदार ठरत आहे.

नवं घर नि नवी गाडी! Anshuman Vichare ने आणखीन एक दिला सुखद धक्का; Post करत शेअर केली Good News

पहिल्याच दिवशी संपूर्ण महाराष्ट्रातील सुमारे ५०० चित्रपटगृहांमध्ये या चित्रपटाचे २ हजारांहून अधिक शो प्रदर्शित करण्यात आले. पुण्यातील सिटी प्राईड मल्टिप्लेक्समध्ये तब्बल २५ शो हाऊसफुल्ल झाल्याने हा प्रतिसाद मराठी चित्रपटसृष्टीसाठी विक्रमी मानला जात आहे. दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीप्रमाणे वेगळ्या दिवशी आणि शुभ मुहूर्तावर चित्रपट प्रदर्शित करण्याचा हा प्रयोग यशस्वी ठरल्याची चर्चा आता चित्रपट वर्तुळात रंगू लागली आहे.

Web Title: Opening of deool band 2 aata pariksha devachi at box office

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 22, 2026 | 11:49 AM

Topics:  

  • pravin tarade

संबंधित बातम्या

Pravin Tarde Proposal Video : ‘हीरोइनने मला 100 कोटी दिले…’ भर पार्टीमध्ये गुडघ्यावर बसत तरडेंनी केलं प्रपोज, VIDEO व्हायरल
1

Pravin Tarde Proposal Video : ‘हीरोइनने मला 100 कोटी दिले…’ भर पार्टीमध्ये गुडघ्यावर बसत तरडेंनी केलं प्रपोज, VIDEO व्हायरल

Deool Band 2 तर देवाच्या नावावरून चालला! ट्रोल करणाऱ्यांना प्रवीण तरडेने दिले सडेतोड उत्तर
2

Deool Band 2 तर देवाच्या नावावरून चालला! ट्रोल करणाऱ्यांना प्रवीण तरडेने दिले सडेतोड उत्तर

Pravin Tarde : ‘मी छाती ठोकून बोलणार..’; हिंदुत्ववादी प्रोपोगंडाच्या आरोपांवर प्रवीण तरडे स्पष्टच बोलले
3

Pravin Tarde : ‘मी छाती ठोकून बोलणार..’; हिंदुत्ववादी प्रोपोगंडाच्या आरोपांवर प्रवीण तरडे स्पष्टच बोलले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.