Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 26 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pravin Tarde Proposal Video : ‘हीरोइनने मला 100 कोटी दिले…’ भर पार्टीमध्ये गुडघ्यावर बसत तरडेंनी केलं प्रपोज, VIDEO व्हायरल

Pravin Tarde Proposal: 'देऊळ बंद २'च्या यशानंतर झालेल्या सन्मान सोहळ्यात प्रवीण तरडेंनी पत्नी स्नेहल तरडे यांना गुडघ्यावर बसून प्रपोज केलं. त्यांचा हा रोमँटिक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Jul 12, 2026 | 12:36 PM
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Pravin Tarde Proposal: मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता, लेखक आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे सध्या ‘देऊळ बंद २’च्या यशामुळे चर्चेत आहेत. दमदार लेखन, दिग्दर्शन आणि अभिनयाच्या जोरावर त्यांनी प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं आहे. ‘मुळशी पॅटर्न’, ‘सरसेनापती हंबीरराव’, ‘धर्मवीर’, ‘देऊळ बंद’ आणि आता ‘देऊळ बंद २’ या चित्रपटांच्या माध्यमातून त्यांनी यशाचा नवा टप्पा गाठला आहे.

अलीकडेच ‘देऊळ बंद २’ने १०० कोटी रुपयांच्या कमाईचा टप्पा पार केल्याचा आनंद साजरा करण्यासाठी पुण्यात विशेष सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला राजकीय, सामाजिक आणि मनोरंजन क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली. चित्रपटाच्या संपूर्ण टीमचा गौरव करण्यात आला.

मात्र या सोहळ्यात सर्वाधिक चर्चेत राहिला तो प्रवीण तरडे आणि त्यांच्या पत्नी स्नेहल तरडे यांचा एक खास क्षण. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये प्रवीण तरडे पत्नीसमोर गुडघ्यावर बसून गुलाबाचं फूल देत पुन्हा एकदा प्रपोज करताना दिसत आहेत. हा रोमँटिक क्षण सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

यावेळी प्रवीण तरडे म्हणाले, “या हिरोईनने मला १०० कोटी दिले.” त्यानंतर विनोदी अंदाजात ते म्हणाले, “आता ती माझ्या सिनेमात नसेल, कारण १०० कोटींची हिरोईन मला परवडणार नाही.”

Dhamaal 4 Box Office Collection Day 2: ‘धमाल 4’ची बॉक्स ऑफिसवर घोडदौड! दुसऱ्याच दिवशी अजय देवगणच्या चित्रपटाची तुफान कमाई

यावर स्नेहल तरडे यांनीही तितक्याच मिश्कील शैलीत उत्तर दिलं. त्या म्हणाल्या, “असं वाटतंय का मी तुला दुसऱ्या कोणासोबत चित्रपट करू देईन? इतर कोणताही रोल चालेल, पण तुझ्या बायकोच्या भूमिकेसाठी दुसरी कोण चालणार नाही.”

त्यावर प्रवीण तरडेही हसत म्हणाले, “मग इथून पुढे मी ‘बायको नसलेला नवरा’ असा सिनेमा करेन.”

यावेळी त्यांनी आणखी एक खास आठवणही सांगितली. कॉलेजच्या दिवसांत स्नेहल यांना कधीच गुलाबाचं फूल देता आलं नव्हतं, त्यामुळे आज सर्वांसमोर ते स्वप्न पूर्ण झाल्याचं त्यांनी सांगितलं.

Samantha Ruth Prabhu : घटस्फोटानंतर पहिल्यांदाच Ex-नवऱ्याच्या कुटुंबाबाबत बोलली अभिनेत्री! अखिलसाठी शेअर केली विशेष पोस्ट

यावेळी त्यांच्या लग्नाच्या तारखेबद्दल विचारलं असता, प्रवीण तरडे क्षणभर गोंधळले आणि चुकीची तारीख सांगितली. त्यावर स्नेहल तरडे हसत म्हणाल्या, “आठवा… आठवा तरडे!” हा मजेशीर प्रसंगही उपस्थितांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवून गेला.

Web Title: Pravin tarde goes down on one knee to propose to his wife again says this heroine gave me 100 crore expressing his love

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 12, 2026 | 12:36 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • marathi movie
  • pravin tarade

संबंधित बातम्या

Dwidha Marathi Movie : ‘द्विधा’ चित्रपटातून उलगडणार भाऊ-बहिणीच्या नात्यातील खास बॉन्डिंग ;’आदि-श्रावणी’ची केमिस्ट्री चर्चेत
1

Dwidha Marathi Movie : ‘द्विधा’ चित्रपटातून उलगडणार भाऊ-बहिणीच्या नात्यातील खास बॉन्डिंग ;’आदि-श्रावणी’ची केमिस्ट्री चर्चेत

Mrityu Chakra Movie: गुरु’ नेमका कोण? पुष्कराज चिरपुटकरच्या भूमिकेने वाढवलं ‘मृत्यूचक्र’चं गूढ
2

Mrityu Chakra Movie: गुरु’ नेमका कोण? पुष्कराज चिरपुटकरच्या भूमिकेने वाढवलं ‘मृत्यूचक्र’चं गूढ

Abhishek Bachchan ETPL: अभिषेक बच्चनने केला European T20 Premier League चा श्रीगणेशा; मैदानावरून शेअर केला खास फोटो
3

Abhishek Bachchan ETPL: अभिषेक बच्चनने केला European T20 Premier League चा श्रीगणेशा; मैदानावरून शेअर केला खास फोटो

Salman Khan 38 Years:‘प्रेम’च्या रोमँटिक अंदाजापासून ‘टायगर’च्या ॲक्शनपर्यंत; सलमान खानचा ३८ वर्षांचा सुपरहिट प्रवास
4

Salman Khan 38 Years:‘प्रेम’च्या रोमँटिक अंदाजापासून ‘टायगर’च्या ॲक्शनपर्यंत; सलमान खानचा ३८ वर्षांचा सुपरहिट प्रवास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.