Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pravin Tarde : ‘मी छाती ठोकून बोलणार..’; हिंदुत्ववादी प्रोपोगंडाच्या आरोपांवर प्रवीण तरडे स्पष्टच बोलले

'देऊळ बंद २'च्या निमित्ताने हिंदुत्ववादी अजेंडाच्या आरोपांवर प्रवीण तरडेंनी स्पष्ट भूमिका मांडली. 'मी माझ्या धर्माबद्दल छाती ठोकून, ओरडून-ओरडून बोलणार,' असं म्हणत त्यांनी सडेतोड उत्तर दिलं.

  • By अमृता यादव
Updated On: Jul 07, 2026 | 04:15 PM
( फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

( फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता, लेखक आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे हे आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. त्यांच्या चित्रपटांवर अनेकदा हिंदुत्ववादी विचारसरणीचा प्रचार केल्याचे आरोप झाले आहेत. मात्र, या आरोपांवर आता प्रवीण तरडे यांनी स्पष्ट भूमिका मांडत सडेतोड उत्तर दिलं आहे.

अलीकडील एका मुलाखतीत प्रवीण तरडे यांना त्यांच्या चित्रपटांमधून हिंदुत्ववादी प्रोपोगांडा पसरवला जात असल्याच्या टीकेबाबत प्रश्न विचारण्यात आला. ‘देऊळ बंद २’ या चित्रपटातील एका संवादाचा संदर्भ देत, “प्रवीण तरडे त्यांच्या सिनेमातून हिंदुत्ववादी अजेंडा पसरवतात का?” असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. यावर त्यांनी कोणताही आडपडदा न ठेवता आपली भूमिका स्पष्ट केली.

प्रवीण तरडेंचे सडेतोड उत्तर

प्रवीण तरडे म्हणाले, “प्रवीण तरडे कोण आहे? हिंदू आहे. मी माझ्या धर्माबद्दल नाही बोलणार तर काय परदेशातून लोक येऊन बोलणार आहेत का? दुसऱ्या धर्माचे लोक येऊन बोलणार का? मी एवढंच सांगितलं की, तुमची-माझी जात बाजूला ठेवून हिंदू म्हणून एकत्र या. यात वाईट काय आहे? म्हणजे जातच पाळायची का? माझ्या धर्माबद्दल मीच बोलणार, अभिमानाने बोलणार. छाती ठोकून, ओरडून-ओरडून बोलणार.”

Welcome To The Jungle Budget: चित्रपटाच्या बजेटबाबत दिग्दर्शकाचा मोठा खुलासा; २००-२५० कोटी नाही तर इतका आहे चित्रपटाचा खर्च

ते पुढे म्हणाले, “माझा सिनेमा जगभरात पाहिला जातो. तो वेगवेगळ्या भाषांमध्ये भाषांतरित होतो. त्यातून जगाला हे कळेल की देश बदलत आहे आणि लोकांना जात-पात बाजूला ठेवून एकत्र यायचं आहे. मी हेच म्हणत राहणार, कारण हिंदू हाच माझा धर्म आहे.”

प्रवीण तरडे यांच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटत असून, त्यांच्या विधानाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

Marathi Serial: ‘वीण दोघांतली ही तुटेना’च्या सेटवरील किचनमध्ये रंगली मजा; कलाकारांनी बनवली गरमागरम कांदाभजी, पाहा Video

सिनेमाने 100 कोटींचा टप्पा गाठला

‘देऊळ बंद 2’ सिनेमाने 100 कोटींचा टप्पा गाठला आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन प्रवीण तरडे यांनी केले असून, मुख्य भूमिकेत त्यांची पत्नी स्नेहल तरडे झळकली आहे. स्नेहलने साकारलेल्या पात्राभोवती संपूर्ण कथा फिरते. विशेष म्हणजे, या पात्राची संकल्पना स्वतः स्नेहलनेच प्रवीण यांना सुचवली होती.

Web Title: Pravin tarde clarifies his stand on allegations of promoting a hindutva agenda ahead of deool band 2

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 07, 2026 | 04:15 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • marathi movie
  • pravin tarade

संबंधित बातम्या

Music Launch :’दिगंबरा दिगंबरा’च्या सुरांनी रंगली मैफल! अशोक सराफ यांची तबल्यावर साथ, राहुल देशपांडे यांचे सुरेल सादरीकरण
1

Music Launch :’दिगंबरा दिगंबरा’च्या सुरांनी रंगली मैफल! अशोक सराफ यांची तबल्यावर साथ, राहुल देशपांडे यांचे सुरेल सादरीकरण

Iravati Marathi Movie : नात्यांचे भावविश्व उलगडणारा ‘इरावती’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; अनुभवी कलाकारांची उत्कृष्ट सांगड
2

Iravati Marathi Movie : नात्यांचे भावविश्व उलगडणारा ‘इरावती’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; अनुभवी कलाकारांची उत्कृष्ट सांगड

Patri Sarkar 1942: साताऱ्याच्या मातीत पेटलेला स्वातंत्र्यलढा आता रुपेरी पडद्यावर! ‘पत्री सरकार १९४२’चा दमदार पोस्टर लाँच
3

Patri Sarkar 1942: साताऱ्याच्या मातीत पेटलेला स्वातंत्र्यलढा आता रुपेरी पडद्यावर! ‘पत्री सरकार १९४२’चा दमदार पोस्टर लाँच

Columbus Marathi Movie: सुशिक्षित बेरोजगाराच्या आयुष्यात अमेरिकेची संधी! ‘कोलंबस’ची रंजक गोष्ट लवकरच मोठ्या पडद्यावर
4

Columbus Marathi Movie: सुशिक्षित बेरोजगाराच्या आयुष्यात अमेरिकेची संधी! ‘कोलंबस’ची रंजक गोष्ट लवकरच मोठ्या पडद्यावर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.