फोटो सौजन्य - Social Media
‘System’ या कोर्टरूम ड्रामाचा ट्रेलर प्रदर्शित होताच सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. न्याय, सत्ता, पैसा आणि महत्त्वाकांक्षा यांच्या संघर्षाभोवती फिरणारी ही कथा प्रेक्षकांना एका वेगळ्या विश्वात घेऊन जाणार असल्याचं ट्रेलरवरून स्पष्ट होतं. Ashwiny Iyer Tiwari दिग्दर्शित ही मालिका २२ मे रोजी प्रदर्शित होणार आहे.
या मालिकेत Sonakshi Sinha एका महत्त्वाकांक्षी वकिलाच्या भूमिकेत दिसत आहे. स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी ती आपल्या वडिलांच्या लॉ फर्ममध्ये एक मोठी केस हाताळताना दिसते. Ashutosh Gowariker तिच्या वडिलांच्या भूमिकेत असून, ही केस तिच्या करिअरसाठी निर्णायक ठरणार असते. तर Jyotika एका हुशार कोर्टरूम स्टेनोग्राफरच्या भूमिकेत झळकणार आहे, जी सोनाक्षीला या प्रकरणात मदत करताना दिसते.
ट्रेलरमध्ये दाखवलेली “गरीबांचा आवाज श्रीमंतांच्या गोंधळात हरवतो” ही ओळ प्रेक्षकांच्या मनाला भिडताना दिसत आहे. ट्रेलर पाहिल्यानंतर सोशल मीडियावर अनेकांनी कलाकारांच्या अभिनयाचं कौतुक केलं आहे. विशेषतः Jyotika, Sonakshi Sinha आणि Ashutosh Gowariker यांच्या भूमिकांबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे.
या मालिकेचं लेखन Harman Baweja, Arun Sukumar, Ashwiny Iyer Tiwari, Tasneem Lokhandwala आणि Akshat Ghildial यांनी केलं आहे. तसेच Preeti Agarwalसोबत आदिनाथ कोठारेही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार असल्याने मराठी प्रेक्षकांमध्ये या मालिकेबाबत विशेष उत्सुकता निर्माण झाली आहे.






