Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 25 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Deool Band 2 तर देवाच्या नावावरून चालला! ट्रोल करणाऱ्यांना प्रवीण तरडेने दिले सडेतोड उत्तर

'देऊळबंद 2'च्या यशानंतर दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी चित्रपटावरील टीका आणि ट्रोलिंगला सडेतोड उत्तर दिले आहे. देवाच्या नावामुळेच चित्रपट यशस्वी झाला, हा समज चुकीचा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्या मते, चित्रपटाच्या यशामागे कथा, मांडणी आणि प्रामाणिक मेहनत तितकीच महत्त्वाची असते.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jul 10, 2026 | 05:59 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • सर्व प्रश्नांवर प्रवीण तरडे यांनी खुलून भाष्य केले आहे.
  • प्रवीण तरडे यांनी त्यांना स्पष्ट शब्दात सांगितले.
  • सध्या प्रेक्षक ‘मुळाशी पॅटर्न 2’ सिनेमाची वाट पाहत आहेत.
सध्या महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातील सिनेमागृहात स्वामींचा गजर होत आहे. प्रवीण तरडे यांनी दिग्दर्शित केलेला सिनेमा ‘देऊळबंद 2’ महाराष्ट्रभर इतका गाजला की सिनेमा 100 कोटी कमावणारा तिसरा ऐतिहासिक मराठी सिनेमा ठरला. सिनेमाने मोठे यश मिळवले. यामागे कारण काय? असा प्रश्न जेव्हा सिनेप्रेक्षकांच्या मनात आला. तेव्हा बहुतांश सिनेचाहत्यांनी ‘देवाच्या नावाने सिनेमा तयार केला म्हणून इतकं यश मिळालं’ असे म्हंटले. दरम्यान, शाहरुख खानने ‘देऊळबंद 2’ सिनेमामध्ये महत्वपूर्ण योगदान दिल्याचे कळताच काही समाजकंटकांनी या मुद्द्याला धार्मिक रंग देण्यास सुरुवात केली. या सर्व प्रश्नांवर प्रवीण तरडे यांनी खुलून भाष्य केले आहे.

Rajesh Sharma Health Update : किडा नाही तर ‘या’ कारणामुळे अभिनेत्याची खालावली होती तब्येत!

काय म्हणाले प्रवीण तरडे?

Deool Band 2 सिनेमाचे दिग्दर्शक प्रवीण तरडे यांना एका मुलाखती दरम्यान जेव्हा ‘Deool Band 2 तर देवाच्या नावावरून चालला!’ अशा काही प्रेक्षकांच्या मताविषयी सांगण्यात आले तेव्हा प्रवीण तरडे यांनी त्यांना स्पष्ट शब्दात सांगितले. प्रवीण म्हणाले की “एखादा सिनेमा तयार करण्यासाठी फक्त सिनेमाचा विषय महत्वाचा नसतो. तर त्या सिनेमाची कथा, त्या कथेची मांडणी आणि त्यामागचे प्रामाणिक प्रयत्न या सर्व बाबींनाही तितकेच महत्व असते.” प्रवीण सांगतात की “एखादा सिनेमा देवाच्या नावाने चालला असे म्हणणे, हा चुकीचा समज आहे.”

शाहरुख खानने देऊळबंद 2 सिनेमासाठी केलेली मदत या मुद्द्यावरूनही प्रवीण यांना ट्रोल करण्यात आले होते. त्यावेळी प्रवीण तरडे यांनी धर्माच्या नावाने ट्रोलिंग करणाऱ्या त्या प्रत्येकाला सडेतोड उत्तर दिले की “शाहरुख खानने केलेली मदत धर्माच्या चष्म्यातून न पाहता त्यांनी दाखवलेल्या चांगुलपणाचे कौतुक करावे.”

Adarsh Baal Vidyalaya Series: मोडकळीस आलेल्या शाळेची मजेशीर कहाणी; आदर्श बाल विद्यालय’ची रिलीज डेट जाहीर

Deool Band या सिक्वेलमध्ये पुढे आणखीन भाग येतील, असे स्वतः प्रवीण तरडे यांनी एका मुलाखतीमध्ये स्पष्ट केले होते. तसेच एका सोशल मीडिया पोस्टमध्ये त्यांनी स्वतः स्पष्ट केले होते की ‘देऊळबंद 3’ सिनेमाची शूटिंग कोकणातील गुहागर येथे होणार आहे. त्यामुळे स्वामींची कोकणात असणारी लीला या सिनेमाच्या माध्यमातून पाहायला मिळण्याची शक्यता आहे. सध्या प्रेक्षक ‘मुळाशी पॅटर्न 2’ सिनेमाची वाट पाहत आहेत.

Web Title: Pravin tardes reply to trolls about movie deool band 2

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 10, 2026 | 05:53 PM

Topics:  

  • Marathi celebrities
  • pravin tarade

संबंधित बातम्या

Manjar Teaser: चार मित्रांच्या बिनधास्त दुनियेत ‘मांजर’ची एन्ट्री, टीझरने वाढवली उत्सुकता
1

Manjar Teaser: चार मित्रांच्या बिनधास्त दुनियेत ‘मांजर’ची एन्ट्री, टीझरने वाढवली उत्सुकता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.