Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 5 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pallavi Joshi: ‘पल्लवी जोशींना त्यांच्या कर्तृत्वाने ओळखा’; ‘पत्नी’ उल्लेखावर विवेक अग्निहोत्रींची नाराजी

Pallavi Joshi: अभिनेत्री पल्लवी जोशी यांचा ‘विवेक अग्निहोत्री यांच्या पत्नी’ असा उल्लेख केल्याने विवेक अग्निहोत्रींनी नाराजी व्यक्त केली. पल्लवींच्या स्वतंत्र कर्तृत्वाचा दिला दाखला.

  • By अमृता यादव
Updated On: Sep 18, 2026 | 07:54 AM
( फोटो सौजन्य- सोशल मिडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मिडिया)

Follow Us
Follow Us:

Pallavi Joshi: अभिनेत्री आणि निर्माती पल्लवी जोशी यांची नुकतीच केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाच्या (CBFC) नव्या 18 सदस्यीय बोर्डावर नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्र सरकारने 16 सप्टेंबर रोजी नव्या बोर्डाची घोषणा केली. या बोर्डात पल्लवी जोशी यांच्यासह प्रीती झिंटा, पंकज त्रिपाठी, सुनील शेट्टी, रूपाली गांगुली यांसारख्या मनोरंजन क्षेत्रातील अनेक कलाकारांचा समावेश आहे.

पल्लवी जोशी यांच्या नियुक्तीनंतर एका वृत्तात त्यांचा परिचय ‘फिल्ममेकर विवेक अग्निहोत्री यांच्या पत्नी’ असा करण्यात आला. या उल्लेखावर त्यांचे पती आणि दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री यांनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली आहे. पल्लवी जोशी यांची स्वतःची प्रदीर्घ व्यावसायिक कारकीर्द आणि ओळख असताना त्यांच्या परिचयात पतीचा संदर्भ प्रामुख्याने का देण्यात आला, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

‘पल्लवी जोशी यांची स्वतःची ओळख आहे’

विवेक अग्निहोत्री यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये संबंधित रिपोर्टच्या मांडणीवर टीका केली. त्यांनी पल्लवी जोशी यांच्या अभिनय, टेलिव्हिजन, सिनेमा आणि प्रोडक्शन क्षेत्रातील कामाचा उल्लेख करत त्यांच्या स्वतंत्र कारकीर्दीवर भर दिला.

पल्लवी जोशी यांनी लहान वयात अभिनयाला सुरुवात केली असून, त्यांच्या दीर्घ कारकीर्दीत अभिनयासोबतच निर्मिती क्षेत्रातही काम केलं आहे. विवेक अग्निहोत्री यांनी त्यांच्या पोस्टमध्ये पल्लवी जोशी यांच्या कामगिरीचा संदर्भ देत, एखाद्या यशस्वी महिलेची ओळख तिच्या पतीच्या नात्यानेच करून देण्याच्या पद्धतीवर प्रश्न उपस्थित केला.

Pehla Pyaar Doosri Baar: ‘पहला प्यार दूसरी बार’चा फर्स्ट लुक आऊट; लव रंजनच्या चित्रपटातून कोणते ६ कलाकार करणार डेब्यू?

पल्लवी जोशींच्या प्रोडक्शन कामाचाही उल्लेख

विवेक अग्निहोत्री यांनी पल्लवी जोशी यांच्या निर्मिती क्षेत्रातील योगदानाचाही उल्लेख केला. त्यांनी ‘आरोहण’ या प्रोजेक्टचा दाखला दिला. भारतीय नौदलातील महिलांवर केंद्रित या प्रोजेक्टच्या निर्मितीचा संदर्भ देत त्यांनी पल्लवी यांच्या स्वतंत्र कामाची आठवण करून दिली.

विवेक अग्निहोत्री यांनी आपल्या पोस्टमध्ये संबंधित माध्यमांच्या मांडणीवर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. त्यांच्या मते, पल्लवी जोशी यांची ओळख त्यांच्या स्वतःच्या कामातून आणि उपलब्धींमधूनही समोर यायला हवी.

Ankita Walawalkar On Pregnancy: ‘मला स्वतःला आई म्हणून बघायचंय…’; मातृत्वाबाबत अंकितानं केलं मन मोकळं

पल्लवी जोशींची CBFC बोर्डावर नियुक्ती

दरम्यान, केंद्र सरकारने नव्याने गठित केलेल्या CBFC बोर्डाचा कार्यकाळ तीन वर्षांचा किंवा पुढील आदेशापर्यंत, यापैकी जे आधी असेल तोपर्यंत असणार आहे. या 18 सदस्यीय बोर्डात पल्लवी जोशी यांच्यासह प्रीती झिंटा, पंकज त्रिपाठी, सुनील शेट्टी, रूपाली गांगुली, प्रोसेनजीत चॅटर्जी, प्रियदर्शन, रिकी केज आणि इतरांचा समावेश आहे.

पल्लवी जोशी यांच्या परिचयावरून सुरू झालेल्या या चर्चेत विवेक अग्निहोत्री यांनी त्यांच्या पत्नीच्या वैयक्तिक नात्यापेक्षा त्यांच्या व्यावसायिक कारकीर्दीला आणि स्वतंत्र ओळखीला महत्त्व देण्याचा मुद्दा मांडला आहे.

Web Title: Pallavi joshi vivek agnihotri wife reference cbfc appointment

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 18, 2026 | 07:54 AM

Topics:  

  • Director Vivek Agnihotri
  • Entertainemnt News
  • Pallavi Joshi

संबंधित बातम्या

Ant Ek Prarambh: अतुल परचुरेंचा शेवटचा चित्रपट OTTवर; ‘अंत एक प्रारंभ’मधून मिळणार अभिनयाची अनमोल भेट
1

Ant Ek Prarambh: अतुल परचुरेंचा शेवटचा चित्रपट OTTवर; ‘अंत एक प्रारंभ’मधून मिळणार अभिनयाची अनमोल भेट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.