Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रिया बेर्डेंचं मराठी रंगभूमीवर नव्या उर्जेसह पुनरागमन, लवकरच रंगणार ‘भुल भुलैय्या’चा पहिला प्रयोग

प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया बेर्डे ‘भुल भुलैय्या’ मधून रंगभूमीवर नव्या उर्जेसह पुनरागमन करत आहेत. ‘भुल भुलैय्या’ च्या माध्यमातून पुन्हा नाट्यरसिकांच्या भेटीला येणार आहेत.

  • By अमृता यादव
Updated On: Apr 06, 2026 | 08:05 PM
(फोटो सौजन्य -इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य -इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

‘भुल भुलैय्या’ हे नाटक मनाच्या गाभाऱ्यात दडलेले रहस्य उलगडते. अनपेक्षित वळणांनी भरलेला हा प्रवास प्रत्येक क्षण थरारक आणि चकित करणारा आहे. यात सत्य आणि भ्रम यांची सीमारेषा इतकी धूसर आहे की काय खरं आणि काय खोटं हे ओळखणं कठीण होते. भ्रम आणि वास्तव यांच्या गुंतागुंतीचा असाच रंगतदार खेळ ‘भुल भुलैय्या’ या नाटकाद्वारे लवकरच मराठी रंगभूमीवर रंगणार असून या नाटकाच्या शुभारंभाचा प्रयोग रविवार १९ एप्रिलला दु. ४.०० वा. रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी, येथे संपन्न होणार आहे.

रंगत संगत आणि श्री लक्ष्मीनारायण प्रॉडक्शन्स निर्मित भुल भुलैय्या नाटकाची कथा हेमंत एदलाबादकर यांची असून रंगावृत्ती, दिग्दर्शन, प्रकाश कुमार सोहोनी यांचे आहे. रणजित देसाई, केदार सामंत नाटकाचे निर्माते आहेत. विशेष म्हणजे प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया बेर्डे ‘भुल भुलैय्या’ मधून रंगभूमीवर नव्या उर्जेसह पुनरागमन करत आहेत. ‘

भुल भुलैय्या’ च्या माध्यमातून पुन्हा नाट्यरसिकांच्या भेटीला येण्याबाबत प्रिया बेर्डे म्हणाल्या की, ‘जरी बऱ्याच वर्षांनी पुन्हा नाटकात काम करीत असले तरी नाटकापासून कधीच दूर गेले नव्हते. नाटकात काम करण्याची इच्छा मनात होतीच. पुनरागमन करण्यासाठी एका चांगल्या नाटकाच्या प्रतिक्षेत होते. ‘भुल भुलैय्या’ च्या माध्यमातून पुनरागमन करताना खूप आनंद होत आहे.

‘प्रेम सगळं काही नसतं’, Trisha Krishnan ची पोस्ट चर्चेत, Thalapathy Vijay सोबत अफेअरच्या अफवांदरम्यान पोस्ट व्हायरल

प्रिया बेर्डे यांच्यासोबत साहिल देसाई, परिणिता पावसकर, आरती सोळंकी अमीर तडवळकर, आशुतोष घोरपडे, विजय सूर्यवंशी हे कलाकार नाटकात आहेत. या नाटकाच्या शुभारंभाचे प्रयोग रवि १९ एप्रिल दु. ४.०० वा. रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी, सोम २० एप्रिल रात्रौ ८.०० वा. डॉ. काशिनाथ घाणेकर, ठाणे मंगळ २१एप्रिल दु. ४.०० वा. दीनानाथ नाट्यगृह, पार्ले येथे रंगणार आहेत.नेपथ्य संदेश बेंद्रे तर संगीत विजय गवंडे यांचे आहे. वेशभूषा मंगल केंकरे यांनी केली आहे. सूत्रधार-विजय सूर्यवंशी आहेत.

आयुष्यातील मोठ्या टप्प्यांनंतर नात्यांमध्ये काय बदलते? अभिनेता उमेश कामत नात्यांच्या काळानुसार होणाऱ्या बदलांवर झाला व्यक्त !

Web Title: Priya berde makes a vibrant comeback on the marathi stage the first performance of bhool bhulaiyaa to premiere soon

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 06, 2026 | 08:05 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • marathi actress
  • Marathi News

संबंधित बातम्या

Akola News : सिलेंडरसाठी वणवण! अकोल्याच्या रस्त्यावर थापल्या भाकरी; पाहा व्हिडिओ
1

Akola News : सिलेंडरसाठी वणवण! अकोल्याच्या रस्त्यावर थापल्या भाकरी; पाहा व्हिडिओ

पुन्हा खळबळ! Mark Zuckerberg चा मोठा निर्णय!  Meta कंपनीतून आणखी 200 कर्मचाऱ्यांची हकालपट्टी
2

पुन्हा खळबळ! Mark Zuckerberg चा मोठा निर्णय! Meta कंपनीतून आणखी 200 कर्मचाऱ्यांची हकालपट्टी

Akola News : कलिंगड झालं मातीमोल! 5रुपये किलो दराने विक्री, शेतकरी हतबल!
3

Akola News : कलिंगड झालं मातीमोल! 5रुपये किलो दराने विक्री, शेतकरी हतबल!

Jaykumar Gore : रातोरात पुतळे उभारणाऱ्यांवर होणार कारवाई!
4

Jaykumar Gore : रातोरात पुतळे उभारणाऱ्यांवर होणार कारवाई!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.