Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 16 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Psycho Ranga Trailer: गूढ ‘रंगा’ कोण? अन्यायाविरुद्ध पुकारली लढाई; ‘सायको रंगा’चा थरारक ट्रेलर रिलीज

Psycho Ranga Trailer: सुबोध भावे यांच्या भूमिकेसह ‘सायको रंगा’चा दमदार ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. अन्याय, संघर्ष आणि थरारक अॅक्शनने भरलेला चित्रपट २५ सप्टेंबरला प्रदर्शित होणार.

  • By अमृता यादव
Updated On: Sep 16, 2026 | 08:40 AM
( फोटो सौजन्य- सोशल मिडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मिडिया)

Follow Us
Follow Us:

Psycho Ranga Trailer: गूढ स्वभावाचा नायक, अनपेक्षित संकटं, थरारक अॅक्शन आणि भावनिक गुंतागुंत… या सगळ्याचा अनोखा मेळ असलेल्या आगामी मराठी चित्रपट ‘सायको रंगा’चा दमदार ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. ट्रेलरमधून ‘रंगा’च्या आयुष्यातील संघर्ष आणि अन्यायाविरुद्ध त्याने पुकारलेली लढाई पाहायला मिळते. त्यामुळे चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे.

गावाकडच्या मातीपासून शहरातील सत्तेच्या खेळापर्यंत

‘सायको रंगा’च्या कथेत एका बाजूला गावाकडची माती, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि त्यांच्या आयुष्यातील संघर्ष दिसतो, तर दुसरीकडे शहरातील सत्ता आणि पैशांचे खेळ पाहायला मिळतात. या दोन वेगवेगळ्या विश्वांमधून रंगाची गोष्ट पुढे सरकताना दिसते.

अन्याय करणाऱ्यांविरोधात थेट भिडणारा रंगा नेमका कोण आहे? कोणत्या परिस्थितीमुळे तो या संघर्षात उतरतो? त्याच्या लढ्यामागचं नेमकं कारण काय? आणि या सगळ्यामागे दडलेलं गूढ काय आहे? या प्रश्नांची उत्तरं ट्रेलरमधून मिळत नसली, तरी चित्रपटाची उत्सुकता नक्कीच वाढते.

सुबोध भावेंसह तगडी स्टारकास्ट

देवेंद्र चौगुले यांच्या लेखन, दिग्दर्शन आणि निर्मितीत साकारलेल्या या चित्रपटात सुबोध भावे, मिलिंद शिंदे, पुष्कर जोग, जान्हवी किल्लेकर, स्मिता गोंदकर, संजय मोहिते, आनंद काळे, उमेश बोळके, रंजना कुलकर्णी, अमोल नाईक, अनिल राबाडे, एन. डी. चौगुले, सचिन मोरे आणि प्रकाश धोत्रे यांच्या भूमिका आहेत.

ट्रेलरमध्ये वेगवेगळ्या व्यक्तिरेखांमधील संघर्ष आणि त्यांच्या नात्यांमधील गुंतागुंत पाहायला मिळते. त्यामुळे चित्रपटाच्या कथेत प्रत्येक व्यक्तिरेखेची नेमकी भूमिका काय आहे, हे जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे.

Engineers Day: अभिनयासोबत शिक्षणातही अव्वल होते हे कलाकार; सुशांत सिंह राजपूतने शेवटच्या वर्षी का सोडली इंजिनिअरिंग?

‘रंगा’च्या व्यक्तिरेखेत अनेक पदर

दिग्दर्शक देवेंद्र चौगुले यांनी चित्रपटाबद्दल सांगितलं, “‘सायको रंगा’ ही परिस्थितीसमोर उभं राहण्याची आणि आपल्या अस्तित्वासाठी लढण्याची गोष्ट आहे. रंगाच्या व्यक्तिरेखेत अनेक पदर आहेत आणि त्याचा प्रवास जसजसा पुढे जातो, तसतसे त्याच्या आयुष्यातील काही अनपेक्षित पैलू समोर येतात. ट्रेलरमधून चित्रपटातील रंगा आणि त्यातील संघर्षाची झलक दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.”

 

२५ सप्टेंबरला चित्रपट होणार प्रदर्शित

देवेंद्र चौगुले लिखित, दिग्दर्शित आणि निर्मित ‘सायको रंगा’च्या सहदिग्दर्शनाची जबाबदारी स्नेहलराज (दादू) यांनी सांभाळली आहे. चित्रपटाला उत्तम चोरडे यांनी संगीत दिलं आहे. थरार, अॅक्शन, भावनिक गुंतागुंत आणि रहस्याचा अनुभव देणारा हा चित्रपट २५ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Zee Marathi Artists Ganeshotsav: बाप्पाच्या आठवणींमध्ये रमले झी मराठीचे कलाकार; सांगितल्या घरातील परंपरा अन् खास अनुभव

Web Title: Psycho ranga trailer subodh bhave marathi movie

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 16, 2026 | 08:40 AM

Topics:  

  • Entertainemnt News
  • marathi actor
  • marathi movie

संबंधित बातम्या

Tumbbad Movie:‘तुम्बाड’च्या थीमवर साकारले गणपती मंडप; भयावह सजावटीने वेधलं लक्ष, चाहत्यांचा अनोखा अंदाज
1

Tumbbad Movie:‘तुम्बाड’च्या थीमवर साकारले गणपती मंडप; भयावह सजावटीने वेधलं लक्ष, चाहत्यांचा अनोखा अंदाज

Engineers Day: अभिनयासोबत शिक्षणातही अव्वल होते हे कलाकार; सुशांत सिंह राजपूतने शेवटच्या वर्षी का सोडली इंजिनिअरिंग?
2

Engineers Day: अभिनयासोबत शिक्षणातही अव्वल होते हे कलाकार; सुशांत सिंह राजपूतने शेवटच्या वर्षी का सोडली इंजिनिअरिंग?

Ambani Ganpati Celebration:: गणपती दर्शनासाठी बॉलिवूडकरांची मांदियाळी; अंबानींच्या उत्सवात ग्लॅमरचा तडका
3

Ambani Ganpati Celebration:: गणपती दर्शनासाठी बॉलिवूडकरांची मांदियाळी; अंबानींच्या उत्सवात ग्लॅमरचा तडका

F.I.R. NO. 469 Movie: अभिनेता किरण गायकवाडचे दिग्दर्शनात पदार्पण, ‘F.I.R. NO. 469’मधून मांडणार कॉमन मॅनची गोष्ट
4

F.I.R. NO. 469 Movie: अभिनेता किरण गायकवाडचे दिग्दर्शनात पदार्पण, ‘F.I.R. NO. 469’मधून मांडणार कॉमन मॅनची गोष्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.