
फोटो सौजन्य - Social Media
पुष्कर म्हणाला, “Social Media Influencers आणि Actors यांची कधीही तुलना होऊ नये. Reels Stars असोत किंवा Content Creators, ते त्यांच्या कामात अत्यंत चांगले आहेत; पण ते अभिनेते नाहीत. कोविडनंतर अनेक Reel Stars अचानक प्रसिद्ध झाले. मात्र, त्यांनी त्यांच्या आयुष्यात अपयश फारसं पाहिलेलं नाही. मी 1992 साली माझी पहिली फिल्म केली. त्यानंतर आयुष्यात अनेक चढ-उतार पाहिले, किंबहुना जास्त उतारच पाहिले. त्यामुळे प्रसिद्धी मिळवणं आणि नंतर ते सगळं अचानक गमावणं काय असतं, याची आम्हाला जाणीव आहे.”
पुढे इन्फ्लुएन्सर्सना सल्ला देताना तो म्हणाला, “तुम्ही आयुष्यात खूप यश मिळवा, पण नेहमी नम्र राहा.” Pushkar Jog यांनी त्यांचा एक अनुभवही शेअर केला. ते म्हणाले, “मी अनेक लोकांना भेटतो. काही वेळा त्यांच्याकडे पाहून असं वाटतं की कदाचित त्यांना स्वतःसारखं दुसरं कोणी नाही असं वाटत असावं. पण गेल्या डिसेंबरमध्ये मी Shah Rukh Khan आणि Amitabh Bachchan यांना भेटलो. इतके मोठे कलाकार असूनही ते समोरच्याशी अत्यंत नम्रपणे संवाद साधतात. आयुष्यात नम्रपणा आणि जमिनीवर पाय असणं खूप महत्त्वाचं आहे. आणि हे तेव्हाच समजतं, जेव्हा आपण हरतो किंवा कठीण काळाचा सामना करतो.”
नुकताच झळकला Cannes Film Festival 2026 मध्ये
अभिनेता पुष्कर जोग नुकताच Cannes Film Festival 2026 मध्ये झळकला होता. मराठी सिनेसृष्टीचे जागतिक मंचावर प्रतिनिधित्व करण्यासाठी अभिनेता या कार्यक्रमाचा भाग झाला होता. त्यानंतर अभिजात मराठी OTT ची टीमदेखील या मंचावर झळकली होती.