फोटो सौजन्य - Social Media
दरम्यान, सोशल माध्यमांवर पुष्कर जोग तसेच उपस्थित इतर सर्व मराठी कलाकारांचे अभिनंदन करण्यात आले. पण काही Trollers मंडळींना पुष्करचे Cannes मध्ये जाणे काही पटलेले दिसले नाही, त्यामुळे अभिनेत्याला Troll ही करण्यात आले होते. पण अभिनेत्याने या सर्व Trollers ला एका मुलाखतीच्या माध्यमातून प्रतिउत्तर दिले आहे.
काय म्हणाला Pushkar Jog?
पुष्कर जोग यंदाच्या Cannes Film Festival 2026 मध्ये झळकला होता. या मराठी अभिनेत्याला इतक्या मोठ्या मंचावर चालताना पाहून काही Trollers मंडळींनी “पैसे देऊन गेला असेल” असे विधाने केली. याला प्रतिउत्तर देताना पुष्कर म्हणतो की, “वयाच्या 7 वर्षांपासून मी अभिनय करतोय. तेव्हापासून मी Industry पाहतोय, अनुभवतोय आणि अनेक गोष्टी सहनही केल्या आहेत. पण आपण आपली मेहनत सुरूच ठेवायची.” अभिनेता पुढे म्हणतो की, “आताच मी Cannes ला गेलो होतो. मी एकटाच गेलो होतो ना! कोणत्याही Team सोबत नाही. मी माझ्या Merit ने गेलो होतो. आता त्यात काही लोकं म्हणतात ‘पैसे देऊन गेला असेल…’ मी त्यांना म्हणेल की ‘मग तुम्ही जाऊन दाखवा मग! तुम्ही जाऊ शकाल का? तुम्हाला ते बोलावतील तरी का?”
Trollers ला दिलेल्या या प्रतिउत्तरामुळे सोशल माध्यमांवर पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे. काही जण पुष्करच्या या मुद्द्याचे समर्थन करत आहेत तर काही जणांनी उलट प्रश्नांची विचारणा केली आहे. तर काही नेटकऱ्यांनी “माझा मराठी कलावंत इतक्या मोठ्या मंचावर झळकला” याचा अभिमान जाहीर केला आहे.






