Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rakhandar First Look: सिंह, रक्ताचे शिंतोडे अन् ..,गश्मीर महाजनीच्या ‘राखणदार’चं पोस्टर चर्चेत

Rakhandar First Look: गश्मीर महाजनी दिग्दर्शक म्हणून पदार्पण करत असून ‘राखणदार’चा पहिला रहस्यमय पोस्टर रिलीज झाला या चित्रपटाच्या पोस्टरची चर्चा सध्या जोरदार सुरू आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Aug 11, 2026 | 08:50 AM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Rakhandar First Look: अभिनेता गश्मीर महाजनी (Gashmeer Mahajani) आता दिग्दर्शक म्हणून नवी इनिंग सुरू करत आहे. गश्मीरच्या दिग्दर्शनातील पहिला चित्रपट ‘राखणदार’ २०२७ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाची घोषणा होताच त्याचं पहिलं पोस्टर सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलं आहे.

सिंह, रक्ताचे शिंतोडे अन् ‘माझा आवडता प्राणी – माझे बाबा’

पोस्टरमध्ये लालभडक पार्श्वभूमी, रक्ताचे उडालेले शिंतोडे आणि मध्यभागी सिंहाच्या उग्र चेहऱ्याची प्रतिमा पाहायला मिळते. त्याखाली मजबूत देहयष्टी असलेली व्यक्तिरेखा दिसत असून, या दृश्यरचनेमुळे चित्रपटाच्या कथेबद्दल अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. सिंहाची प्रतिमा सामर्थ्य, धैर्य आणि रक्षणाची भावना अधोरेखित करताना दिसते.

हे कलाकार प्रमुख भूमिकांमध्ये झळकणार

या चित्रपटात सई ताम्हणकर, गश्मीर महाजनी आणि मकरंद अनासपुरे हे कलाकार प्रमुख भूमिकांमध्ये झळकणार आहेत. विशेष म्हणजे पोस्टरवर लहान मुलाच्या हस्ताक्षरात लिहिलेलं ‘माझा आवडता प्राणी – माझे बाबा’ हे वाक्य लक्ष वेधून घेत आहे. या कॅप्शनमुळे ‘राखणदार’ ही वडील-मुलाच्या नात्याभोवती फिरणारी कथा आहे का, असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे.

पोस्टरमधील रक्तरंजित वातावरण, सिंहाचा चेहरा आणि माणसाचं शरीर यामागे नेमकं काय रहस्य आहे, याची उत्सुकता निर्माण झाली आहे. चित्रपटाच्या पोस्टरमधील प्रत्येक घटक कथेशी संबंधित असल्याचं गश्मीरने सांगितलं आहे.

दिग्दर्शक म्हणून आपल्या पहिल्या चित्रपटाबद्दल बोलताना गश्मीर महाजनी म्हणाला, “दिग्दर्शक म्हणून माझा पहिलाच चित्रपट असल्यामुळे प्रत्येक गोष्ट प्रेक्षकांच्या मनात कुतूहल निर्माण करणारी असावी, अशी माझी इच्छा होती. त्यामुळे या पोस्टरमधील प्रत्येक एलिमेंट अतिशय विचारपूर्वक तयार करण्यात आला आहे.”

Surbhi Chandna: “मी एग्ज फ्रीज करणार नाही…” सुरभी चंदनाच्या वक्तव्याने वेधलं लक्ष, नेमकं काय म्हणाली?

तो पुढे म्हणाला, “पोस्टर पाहाताच प्रेक्षकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण व्हावेत आणि त्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी त्यांनी चित्रपटगृहात यावं, हा त्यामागचा उद्देश आहे. या पोस्टरमधील प्रत्येक प्रतिमा, प्रत्येक शब्द आणि प्रत्येक तपशील कथेशी जोडलेला आहे. हा चित्रपट मी मनापासून माझ्या बाबांना समर्पित करत आहे.”

२०२७ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार ‘राखणदार’

गश्मीर महाजनीच्या दिग्दर्शनातील पदार्पणामुळे आणि रहस्य निर्माण करणाऱ्या पोस्टरमुळे ‘राखणदार’ची आतापासूनच चर्चा सुरू झाली आहे. २०२७ मध्ये हा चित्रपट प्रेक्षकांसमोर कोणती कथा आणि कसा वेगळा अनुभव घेऊन येतो, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Love and War: रिलीजआधीच भन्साळींच्या चित्रपटाचा धमाका! ‘लव्ह अँड वॉर’च्या राइट्ससाठी बॉलिवूडमधील दिग्गजांत युद्ध; कोण बाजी मारणार?

Web Title: Rakhandar first look a lion blood splatter and gashmeer mahajani movie poster

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 11, 2026 | 08:50 AM

Topics:  

  • marathi actor
  • marathi movie
  • Sai Tamhankar

संबंधित बातम्या

Vikas Patil New Car: बर्थडेच्या दिवशी स्वतःलाच दिलं महागडं गिफ्ट; विकास पाटीलने घेतली नवी Vitara कार, किंमत आहे ‘इतकी’
1

Vikas Patil New Car: बर्थडेच्या दिवशी स्वतःलाच दिलं महागडं गिफ्ट; विकास पाटीलने घेतली नवी Vitara कार, किंमत आहे ‘इतकी’

Onkar Bhojane On Milind Kawde: ‘नक्कीच उत्तर देईन’; ‘अफरातफरी’च्या प्रमोशनवरून वाद, मिलिंद कवडेंच्या आरोपांवर ओंकार भोजनेचं उत्तर
2

Onkar Bhojane On Milind Kawde: ‘नक्कीच उत्तर देईन’; ‘अफरातफरी’च्या प्रमोशनवरून वाद, मिलिंद कवडेंच्या आरोपांवर ओंकार भोजनेचं उत्तर

Ravi Prakash: खाकी वर्दीत दिसणार तेलुगू अभिनेता रवी प्रकाश; ‘दशमी’मधील ACP आसिफ मुजावरची भूमिका चर्चेत
3

Ravi Prakash: खाकी वर्दीत दिसणार तेलुगू अभिनेता रवी प्रकाश; ‘दशमी’मधील ACP आसिफ मुजावरची भूमिका चर्चेत

Hruta Durgule: बाइक राईड, समुद्र अन् मोकळं आकाश; हृताच्या ‘फुलपाखरू’ गाण्याने जिंकली मनं
4

Hruta Durgule: बाइक राईड, समुद्र अन् मोकळं आकाश; हृताच्या ‘फुलपाखरू’ गाण्याने जिंकली मनं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.