Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 7 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘माझ्या बापाला वाचवायचं आहे…’; वडिलांसाठी ढसाढसा रडला ‘सैराट’चा सल्या, पहाटे ४ वाजता VIDEO पोस्ट; नेमकं काय घडलं?

Sairat Salya Arbaj Shaikh : 'सैराट' फेम अभिनेता अरबाज शेखने वडिलांना ब्रेन हॅमरेज झाल्यानंतर सोशल मीडियावर भावनिक व्हिडिओ शेअर करत आर्थिक मदतीचे आवाहन केले. त्याची पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Jul 09, 2026 | 10:43 AM
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Sairat Salya Arbaj Shaikh : ‘सैराट’ चित्रपटातील ‘सल्या’ ही भूमिका साकारून घराघरात पोहोचलेला अभिनेता अरबाज शेख सध्या एका भावनिक व्हिडिओमुळे चर्चेत आला आहे. ९ जुलै रोजी पहाटे सुमारे ४ वाजता त्याने सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करत वडिलांच्या उपचारांसाठी मदतीची आर्त विनंती केली. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून चाहत्यांनाही भावूक करत आहे.

व्हिडिओमध्ये अरबाज शेख म्हणतो, “मी सध्या सोलापूरमधील नोबेल हॉस्पिटलसमोर उभा आहे. आठ दिवसांपूर्वी माझ्या पप्पांना ब्रेन हॅमरेज झाला. त्यांना हृदयाशी संबंधित त्रासही होता, त्यामुळे आम्ही त्यांना नोबेल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, इथला अनुभव माझ्यासाठी अत्यंत वाईट ठरला.”

अरबाजच्या म्हणण्यानुसार, रुग्णालयात दाखल करताना १० हजार रुपयांचे डिपॉझिट भरावे लागले. त्यानंतर औषधांची यादी देत ती रुग्णालयातील मेडिकलमधूनच खरेदी करण्यास सांगण्यात आले. “तीच औषधे बाहेरच्या मेडिकलमध्ये जवळपास अर्ध्या किमतीत उपलब्ध होती. रुग्णालयातून घेतलेल्या औषधांचे बिल ४० हजार रुपयांहून अधिक झाले, तर बाहेरून तीच औषधे सुमारे २० हजार रुपयांत मिळाली असती,” असा दावा त्याने केला.

 

भावनिक होत अरबाज पुढे म्हणाला, “एवढी लूट होत आहे. पण मला माझ्या बापाला मरताना पाहायचं नाही. त्यामुळे आम्ही त्यांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्याचा निर्णय घेतला. आता वडिलांवर कुठे उपचार करावेत, काय करावं, हेच कळत नाही. काहीही करून मला माझ्या बापाला वाचवायचं आहे. कृपया मला मदत करा.”

पोस्टच्या कॅप्शनमध्ये तो म्हणतो, “आत्ता मी खूप आर्थिक अडचणीत आहे. तरीही माझ्या वडिलांचे उपचार सुरू ठेवणं खूप गरजेचं आहे. ज्यांना शक्य असेल त्यांनी थोडीशी आर्थिक मदत करा किंवा ही पोस्ट जास्तीत जास्त शेअर करा. तुमची छोटीशी मदतही माझ्यासाठी खूप मोठी ठरेल.” गुगल पे नंबर 8888515473. तुम्हा सगळ्यांना विनंती आहे, ज्यांना शक्य असेल त्यांनी थोडीशी आर्थिक मदत करा किंवा ही पोस्ट जास्तीत जास्त शेअर करावा. यासोबतच त्याने ऑनलाइन आर्थिक मदतीसाठी आपला Google Pay क्रमांकही शेअर केला आहे.

Web Title: Sairat fame actor arbaz shaikh appeals for financial help after his father suffers a brain hemorrhage shares emotional video on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 09, 2026 | 10:43 AM

Topics:  

  • Entertainemnt News
  • marathi actor

संबंधित बातम्या

Vidyadhar Joshi: ‘तेव्हापासूनच गणेशोत्सवाची माती..’; गणेशोत्सवातील बदलांवर विद्याधर जोशींचं परखड भाष्य, राजकारण्यांचा केला उल्लेख
1

Vidyadhar Joshi: ‘तेव्हापासूनच गणेशोत्सवाची माती..’; गणेशोत्सवातील बदलांवर विद्याधर जोशींचं परखड भाष्य, राजकारण्यांचा केला उल्लेख

Pratyusha Banerjee Case: 10 वर्षांनंतर ‘बालिका वधू’ फेम प्रत्युषा बॅनर्जी आत्महत्या प्रकरणाचा निकाल; राहुल राज सिंगला दिलासा
2

Pratyusha Banerjee Case: 10 वर्षांनंतर ‘बालिका वधू’ फेम प्रत्युषा बॅनर्जी आत्महत्या प्रकरणाचा निकाल; राहुल राज सिंगला दिलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.