Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 28 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

राष्ट्रीय पुरस्कार विजेते शैलेंद्र सिंग यांचे मराठी दिग्दर्शनात पदार्पण; सत्य घटनेवर आधारित ‘लाडू’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!

राष्ट्रीय पुरस्कार विजेते Shailendra Singh 'लाडू' या चित्रपटातून प्रथमच मराठी दिग्दर्शनात पदार्पण करत आहेत. सत्य घटनेवर आधारित हा चित्रपट मानवी संघर्ष आणि भावनिक नातेसंबंधांची वास्तववादी कथा मांडतो. मुंबई, ठाणे, कर्जत येथे कृष्ण-धवल स्वरूपात चित्रित झालेला हा १०३ मिनिटांचा चित्रपट सध्या विविध चित्रपट महोत्सवांमध्ये चर्चेत आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jul 28, 2026 | 05:18 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • ‘ब्रेडविनर प्रोडक्शन्स’ प्रस्तुत हा चित्रपट सध्या राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्येही गाजत आहे.
  • भावविश्व अत्यंत संवेदनशीलपणे उलगडण्यात आले आहे.
  • ‘लाडू’कडून प्रेक्षकांसह चित्रपटसृष्टीलाही मोठ्या अपेक्षा आहेत.
राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक आणि निर्माते Shailendra Singh हे आता ‘लाडू’ या चित्रपटाच्या माध्यमातून प्रथमच मराठी दिग्दर्शनात पदार्पण करत आहेत. भारतीय चित्रपटसृष्टीत तब्बल २५ वर्षांची कारकीर्द गाजवणाऱ्या शैलेंद्र सिंग यांनी आतापर्यंत ७२ वैशिष्ट्यपूर्ण चित्रपटांची निर्मिती केली असून त्यांच्या कामाला १२ राष्ट्रीय पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. हिंदी तसेच जागतिक चित्रपटसृष्टीत दिग्दर्शनाचा अनुभव असलेल्या शैलेंद्र सिंग यांचा हा पहिलाच मराठी चित्रपट असल्याने प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. ‘बॉस एंटरटेनमेंट’ आणि ‘ब्रेडविनर प्रोडक्शन्स’ प्रस्तुत हा चित्रपट सध्या राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्येही गाजत आहे.

Love And War Update: भन्साळींच्या ‘लव्ह अँड वॉर’बाबत सर्वात मोठी अपडेट समोर! रणबीर-आलियाच्या चाहत्यांची उत्सुकता शिगेला

‘लाडू’ हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित असून मानवी संघर्ष, भावनिक नातेसंबंध आणि वास्तववादी जीवनपट यांची प्रभावी मांडणी करतो. मुंबई, ठाणे आणि कर्जत येथे कृष्ण-धवल स्वरूपात चित्रित करण्यात आलेल्या या १०३ मिनिटांच्या चित्रपटाची दृश्यभाषा प्रेक्षकांना वेगळा अनुभव देणारी आहे. चित्रपटातील कथानक वास्तवाशी जोडलेले असून त्यात मानवी जीवनातील संघर्ष आणि भावविश्व अत्यंत संवेदनशीलपणे उलगडण्यात आले आहे. आपल्या पहिल्या मराठी दिग्दर्शकीय प्रवासाबद्दल बोलताना शैलेंद्र सिंग म्हणाले, “मी ७२ चित्रपटांची निर्मिती केली आहे आणि यापूर्वी काही चित्रपट दिग्दर्शितही केले आहेत. मात्र, दिग्दर्शक म्हणून केलेला हा माझा पहिलाच मराठी चित्रपट आहे. हा चित्रपट माझ्या हृदयाच्या अत्यंत जवळचा असून तो माझ्यासोबत कायम राहील.” त्यांनी चित्रपटातील प्रमुख कलाकार प्रदीप गोगटे यांच्या अभिनयाचेही विशेष कौतुक केले. “प्रदीप गोगटे आपल्या निःशब्द अभिनयातून एका माणसाचं संपूर्ण आयुष्य पडद्यावर जिवंत करतात,” असे ते म्हणाले.

Pravin Tarde : ‘सगळ्यांचा हिशोब होणार’ इशारा मुळशीच्या नेत्यांना की प्रेक्षकांना? प्रवीण तरडेची रोखठोक पोस्ट

या चित्रपटाची निर्मिती ‘बॉस एंटरटेनमेंट’ आणि ‘ब्रेडविनर प्रोडक्शन्स’ यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आली असून सोनिया नासेरी कोल या सह-निर्मात्या आहेत. चित्रपटात तब्बल ९ अस्सल मराठी गाणी असून ती कथानकाच्या भावनिक प्रवासाचा महत्त्वाचा भाग आहेत. या गाण्यांचा औपचारिक लॉन्च सोहळा लवकरच पार पडणार आहे. ‘पेज ३’, ‘कांचीवरम’, ‘हनुमान’, ‘कॉर्पोरेट’ आणि ‘डोर’ यांसारख्या राष्ट्रीय स्तरावर गाजलेल्या चित्रपटांची निर्मिती करणारे शैलेंद्र सिंग आता मराठी चित्रपटसृष्टीत दिग्दर्शक म्हणून नवी इनिंग सुरू करत आहेत. त्यामुळे ‘लाडू’कडून प्रेक्षकांसह चित्रपटसृष्टीलाही मोठ्या अपेक्षा आहेत.

Web Title: Shailendra singh debut in marathi cinemas ladu film

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 28, 2026 | 05:17 PM

Topics:  

  • Laddu Gopal
  • marathi film

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.