Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tula Pahata : पहिल प्रेम अन् एक नवा दृष्टिकोन…; मराठी आणि हिंदीत जगभर झळकणार ‘तुला पाहता’, चित्रपटाचा रंजक टीजर लाँच

मयुरा प्रधान दिग्दर्शित ‘तुला पाहता’ हा चित्रपट एका अनवट आणि तरल प्रेमकथेच्या माध्यमातून प्रेक्षकांना भावनिक प्रवासावर घेऊन जाणार आहे. चित्रपटाचा रंजक टीजर नुकताच लाँच करण्यात आला.

  • By श्वेता झगडे
Updated On: May 11, 2026 | 11:56 AM
पहिल प्रेम अन् एक नवा दृष्टिकोन...; मराठी आणि हिंदीत जगभर झळकणार ‘तुला पाहता’, चित्रपटाचा रंजक टीजर लाँच

पहिल प्रेम अन् एक नवा दृष्टिकोन...; मराठी आणि हिंदीत जगभर झळकणार ‘तुला पाहता’, चित्रपटाचा रंजक टीजर लाँच

Follow Us
Follow Us:
  • “तुला पाहता” चित्रपटातून तरल प्रेमाची अनवट कहाणी उलगडणार
  • मयुरा प्रधान दिग्दर्शित ‘तुला पाहता’ चित्रपटाचा रंजक टीजर लाँच
  • एक नवा दृष्टिकोन घेऊन प्रेक्षकांसमोर येणारा ‘तुला पाहता’
Tula Pahata Marathi Movie : मराठी चित्रपटसृष्टीत वेगळ्या धाटणीच्या प्रेमकथांचा ट्रेंड वाढताना दिसत असताना आता दिग्दर्शिका मयुरा प्रधान प्रेक्षकांसाठी ‘तुला पाहता’ हा भावस्पर्शी चित्रपट घेऊन येत आहेत. तरल भावना, नात्यांतील सूक्ष्म गुंतागुंत आणि प्रेमाकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन यामुळे हा चित्रपट सध्या चर्चेत आला आहे. नुकताच या चित्रपटाचा टीजर प्रदर्शित करण्यात आला असून, त्यातील दृश्यरचना, संवाद आणि भावनिक वातावरणामुळे प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे.

ऐन तारुण्यात, प्रेमात आकंठ बुडालेले असताना तो अचानक तिच्या आयुष्यातून निघून जातो आणि काही वर्षांनी तसाच अचानक परततो तो निवृत्त लष्करी अधिकारी म्हणून.. त्याच्या अचानक जाण्यानं आणि पुन्हा परतण्यानं तिच्या आयुष्यात काय खळबळ उडते त्याची तरल कहाणी तुला पाहता या चित्रपटातून उलगडणार आहे. १० जुलैला हा चित्रपट मराठीसह हिंदीतही प्रदर्शित होणार असून, या चित्रपटाचा टीजर लाँच करण्यात आला आहे.

Govindrao Powale : मराठी भावगीतांचा आवाज हरपला! सुप्रसिद्ध गायक गोविंदराव पोवळे यांचे निधन; संगीतसृष्टीत खळबळ

ब्रेव्ह व्हील प्रॉडक्शन्सच्या मयुरा प्रधान यांनी “तुला पाहता” या चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन ही मयुरा प्रधान यांचंच आहे. पुष्कर झोटिंग यांनी छायांकन, रोहन प्रधान, रोहन गोखले यांनी संगीत दिग्दर्शन, तर दीपाली विचारे यांनी नृत्य दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटात सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते सतीश पुळेकर, अभिनेत्री इला भाटे, निशिगंधा वाड, मानसी पाटील, नचिकेत लेले, आनंद काळे, दीपाली विचारे, पल्लवी अजय, स्वप्नील परजणे, आकाश शिंदे अशी उत्तम स्टारकास्ट आहे. नव्या-जुन्या पिढीच्या कलाकारांचा दर्जेदार अभिनय या चित्रपटातून पाहता येणार आहे.

कुटुंबांतील वेगवेगळ्या पिढ्यांची गोष्ट आता ‘तुला पाहता’ या चित्रपटातून उलगडणार आहे. एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये जेव्हा तरुण एक जोडपं असतं तेव्हा काय काय घडतं याची रंजक गोष्ट “तुला पाहता” या चित्रपटातून उलगडणार आहे. एका तरल प्रेमकहाणीची झलक टीजरमधून दाखवण्यात आली आहे. पण या टीजरपलीकडेही या चित्रपटाच्या कथेत आणखी अनेक पदर आहेत. हे पदर ट्रेलरमधून आणखी काही प्रमाणात उलगडतील अशी अपेक्षा आहे. चित्रपटाचा पोत, छायांकन, पार्श्वसंगीतामुळे चित्रपटाचा गुणवत्तापूर्ण स्तर दिसून येतो. चित्रपटाच्या पोस्टर, त्यातील कसदार अभिनेत्यांच्या फळी यामुळे ‘तुला पाहता’ हा चित्रपटाविषयीची उत्सुकता आता टीजरमुळे आणखी वाढली आहे. एक नवा दृष्टिकोन घेऊन प्रेक्षकांसमोर येणारा हा चित्रपट पाहण्यासाठी १० जुलैपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.

‘तुला पाहता’ हा चित्रपट पारंपरिक प्रेमकथांपेक्षा वेगळा अनुभव देणारा असल्याचे टीजरमधून स्पष्ट होते. नात्यांमधील न बोललेले भाव, मनातील ओढ आणि आयुष्याच्या वळणावर भेटणाऱ्या व्यक्तींमुळे घडणारे भावविश्व या चित्रपटातून मांडले जाणार आहे. चित्रपटाची सिनेमॅटिक मांडणी आणि संवेदनशील कथानक हे त्याचे प्रमुख आकर्षण मानले जात आहे. प्रेक्षकांना केवळ मनोरंजन नाही, तर भावनिक पातळीवर जोडणारा अनुभव देण्याचा उद्देश असल्याचे चित्रपटाच्या टीमकडून सांगण्यात आले. विशेष म्हणजे, ‘तुला पाहता’ हा चित्रपट मराठीसोबत हिंदी भाषेतही प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे देशभरातील प्रेक्षकांना ही कथा अनुभवता येणार आहे. हा चित्रपट १० जुलैपासून जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार असून, टीजरनंतर आता प्रेक्षकांना ट्रेलर आणि गाण्यांची उत्सुकता लागली आहे.

Mi Jinkun Gheil Saar : छवी–अनिकेतच्या ऑन-स्क्रीन बाँडिंगवर चर्चा; सेटवर १५-२० आंब्यांची धमाल

Web Title: Teaser of marathi movie tula pahta starring ila bhate satish pulekar pallavi ajay

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 11, 2026 | 11:54 AM

Topics:  

  • marathi movie

संबंधित बातम्या

हास्याचा फुल ऑन डोस! ‘मामाच्या गोव्याला जाऊया’चा धमाकेदार टीझर आऊट, अंकुश, कुशल, अभिजीत अन् संतोषची भन्नाट गँगमस्ती
1

हास्याचा फुल ऑन डोस! ‘मामाच्या गोव्याला जाऊया’चा धमाकेदार टीझर आऊट, अंकुश, कुशल, अभिजीत अन् संतोषची भन्नाट गँगमस्ती

समर्थ रामदासांच्या विचारांचा जागर, ‘समर्थ’चा फर्स्ट लुक चर्चेत; अडीच हजार विद्यार्थ्यांसमोर पोस्टरचे भव्य अनावरण
2

समर्थ रामदासांच्या विचारांचा जागर, ‘समर्थ’चा फर्स्ट लुक चर्चेत; अडीच हजार विद्यार्थ्यांसमोर पोस्टरचे भव्य अनावरण

Dwidha Marathi Movie: बाप-लेकीच्या नात्याचा हळवा प्रवास; ‘द्विधा’ उलगडणार भावनांची नवी बाजू
3

Dwidha Marathi Movie: बाप-लेकीच्या नात्याचा हळवा प्रवास; ‘द्विधा’ उलगडणार भावनांची नवी बाजू

‘घबाडकुंड’च्या यशानंतर मोठी घोषणा! मराठी युनिव्हर्सच्या दुसऱ्या अध्यायासाठी ‘इतक्या’ कोटींची गुंतवणूक
4

‘घबाडकुंड’च्या यशानंतर मोठी घोषणा! मराठी युनिव्हर्सच्या दुसऱ्या अध्यायासाठी ‘इतक्या’ कोटींची गुंतवणूक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.