फोटो सौजन्य - Social Media
‘माती सांगे कुंभाराला’ तसेच ‘तुझ्या मुरलीत माझी प्रतिमा’ अशा अनेक भावगीतांतून महाराष्ट्रसाध्य घराघरात पोहचलेला आवाज काळाच्या पडद्याआड गेला आहे. जेष्ठ आणि सुप्रसिद्ध गायक तसेच संगीतकार गोविंदराव पोवळे यांचे निधन झाले आहे. वयाच्या 94 व्या वर्षी त्यांनी प्राण सोडले असून वयोमानाने त्यांचे निधन झाल्याचे सांगण्यात येत आहे. व्हायच्या अगदी 15 व्या वर्षांपासून ते गायन क्षेत्रात आहेत, त्यामुळे मराठी भावगीतांमध्ये त्यांचे योगदान अफाट आहे. अनेक दशकेच नाही तर गेल्या अर्धा शतकापेक्षाही जास्त काळ त्यांनी मराठी संगीतक्षेत्राची तसेच मायबाप रसिकांची सेवा केली आहे. त्यांच्या निधनाच्या बातमीमुळे संपूर्ण संगीतक्षेत्र शोकाकुल आहे.
‘माती सांगे कुंभाराला’ यांसारख्या अजरामर गीतांना त्यांनी आपल्या स्वरांनी अमर केले. तसेच ‘रात्र काळी घागर काळी, ‘गंगा आली रे अंगणी’ (संथ वाहते कृष्णामाई चित्रपट), ‘उमटली रामाची पाऊले’ तसेच ‘तुझ्या मुरलीत माझी प्रतिमा’ अशा अनेक मधुर भावजतांना गोविंद पावले यांनी त्यांच्या सुमधुर स्वरांनी गायले आहे. अशा अनेक भावगीतांचा गायन त्यांनी केले असून देवाच्या नामाने गेल्या अनेक दशकांपासून त्यांनी संगीताची सेवा केली आहे.
वयाच्या अवघ्या १५व्या वर्षी आकाशवाणीवर गायन सुरू करून त्यांनी आपल्या संगीत प्रवासाची सुरुवात केली आणि मराठी सुगम संगीतात महत्त्वाचे स्थान मिळवले. गोविंद पोवळे त्याकाळी आकाशवाणीमध्ये गाणारे सगळ्यात लहान वयाचे गायक होते. त्यामुळे संगीतक्षेत्रात त्यांना विशेष स्थान आहे. त्यांनी १०० हून अधिक गाण्यांना संगीत दिले आणि २५-३० गाण्यांना आपला आवाज दिला, असे त्यांचे भलेमोठे योगदान संगीत क्षेत्राला लाभले आहे.
त्यांचा जन्म ३० ऑक्टोबर १९३१ रोजी पनवेलजवळील चिरनेर गावात झाला असून, वडील त्रिंबक पोवळे हे कीर्तनकार असल्यामुळे त्यांना घरातूनच संगीताचा वारसा लाभला. आकाशवाणीवर सर्वात कमी वयाचा गायक म्हणून त्यांनी प्रवेश केला आणि चार दशकांहून अधिक काळ सुगम संगीत क्षेत्रात योगदान दिले. वयाच्या ९४व्या वर्षी त्यांचे निधन झाले असून त्यांच्या जाण्याने मराठी सुगम संगीतातील एक सुवर्णयुग संपले आहे.






