Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘तुला पाहता’ ट्रेलर रिलीज! मयुरा प्रधान यांच्या चित्रपटात उलगडणार दोन पिढ्यांतील प्रेमाची अनोखी कहाणी

'तुला पाहता' चित्रपटाचा हृदयस्पर्शी ट्रेलर रिलीज झाला आहे. मयुरा प्रधान दिग्दर्शित हा चित्रपट १० जुलैपासून मराठी आणि हिंदी भाषेत जगभर प्रदर्शित होणार आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Jul 01, 2026 | 09:21 AM
( फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

( फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

प्रेम, नातेसंबंध आणि भावनांचा अनोखा प्रवास उलगडणारा ‘तुला पाहता’ या मराठी चित्रपटाचा ट्रेलर नुकताच सुप्रसिद्ध अभिनेते मुश्ताफ खान यांच्या हस्ते मुंबईत दिमाखदार सोहळ्यात लाँच करण्यात आला. या कार्यक्रमाला सिनेपोलिसचे हेड ऑफ डिपार्टमेंट (प्रोग्रामिंग अँड डिस्ट्रिब्युशन) मयांक श्रॉफ, अभिनेते सुशांत शेलार आणि चित्रपटाची संपूर्ण टीम उपस्थित होती. विशेष म्हणजे, हा चित्रपट १० जुलैपासून मराठी आणि हिंदी भाषांमध्ये जगभर प्रदर्शित होणार आहे.

ब्रेव्ह व्हील प्रॉडक्शन्सच्या बॅनरखाली मयुरा प्रधान यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून, लेखन आणि दिग्दर्शनाची धुराही त्यांनीच सांभाळली आहे. पहिल्याच चित्रपटात निर्माती, लेखिका आणि दिग्दर्शिका अशा तिहेरी जबाबदारी यशस्वीपणे पेलत त्यांनी एक वेगळा विषय मोठ्या पडद्यावर आणला आहे.

दोन काळ, दोन प्रेमकथा आणि भावनांचा अनोखा संगम

आजवर अनेक प्रेमकथांवर आधारित चित्रपट आले असले, तरी ‘तुला पाहता’ या चित्रपटात १९७१ आणि २०२६ या दोन वेगवेगळ्या काळातील दोन प्रेमकथा एकत्र गुंफण्यात आल्या आहेत. ऐन तारुण्यात प्रेमात आकंठ बुडालेला नायक अचानक नायिकेच्या आयुष्यातून निघून जातो. अनेक वर्षांनी तो निवृत्त लष्करी अधिकारी म्हणून परततो आणि त्याच्या पुनरागमनामुळे तिच्या आयुष्यात निर्माण होणारी भावनिक खळबळ चित्रपटातून अनुभवायला मिळणार आहे.

यासोबतच आजच्या काळातील एका तरुण जोडप्याची प्रेमकहाणीही चित्रपटात समांतरपणे उलगडते. प्रेम, नातेसंबंध, एकत्र कुटुंब व्यवस्था आणि आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन अशा अनेक भावनिक पैलूंना स्पर्श करणारी कथा प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे.

दर्जेदार कलाकारांची फौज

चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते सतीश पुळेकर, ज्येष्ठ अभिनेत्री इला भाटे, तसेच नचिकेत लेले, मानसी पाटील, निशिगंधा वाड, आनंद काळे, दीपाली विचारे, पल्लवी अजय, स्वप्नील परजाणे आणि आकाश शिंदे यांसारख्या कलाकारांच्या भूमिका आहेत. नव्या आणि जुन्या पिढीतील कलाकारांचा उत्कृष्ट अभिनय हा चित्रपटाचा आणखी एक विशेष आकर्षण ठरणार आहे.

चित्रपटाचे छायांकन पुष्कर झोटिंग, ध्वनिआरेखन रोहित प्रधान, संगीत दिग्दर्शन रोहन प्रधान आणि रोहन गोखले, तर नृत्यदिग्दर्शन दीपाली विचारे यांनी केले आहे.

‘टायटल आणि ट्रेलर मनाला भिडणारा’ – मुश्ताफ खान

ट्रेलर लाँच सोहळ्यात बोलताना अभिनेते मुश्ताफ खान म्हणाले, “‘तुला पाहता’ हे चित्रपटाचे शीर्षकच खूप सुंदर आहे. चित्रपटाचा ट्रेलर मनाला भिडणारा आणि भावनिक आहे. या चित्रपटाला माझ्याकडून मनःपूर्वक शुभेच्छा.”

Gaurav Khanna Divorce : गौरव खन्नाने जिंकली मनं! ‘ती माझी पत्नी आहे…’, पत्नीच्या खुलाशानंतर अभिनेत्याची पहिली प्रतिक्रिया

टीझर आणि गाण्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद

चित्रपटाचा टीझर आणि गाणी सोशल मीडियावर आधीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहेत. आता ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपटाविषयीची उत्सुकता आणखी वाढली आहे. त्यामुळे १० जुलैपासून प्रेप्रेम, नातेसंबंध आणि भावनांचा अनोखा प्रवास उलगडणारा ‘तुला पाहता’ या मराठी चित्रपटाचा ट्रेलर नुकताच सुप्रसिद्ध अभिनेते मुश्ताफ खान यांच्या हस्ते मुंबईत दिमाखदार सोहळ्यात लाँच करण्यात आला. या कार्यक्रमाला सिनेपोलिसचे हेड ऑफ डिपार्टमेंट (प्रोग्रामिंग अँड डिस्ट्रिब्युशन) मयांक श्रॉफ, अभिनेते सुशांत शेलार आणि चित्रपटाची संपूर्ण टीम उपस्थित होती. विशेष म्हणजे, हा चित्रपट १० जुलैपासून मराठी आणि हिंदी भाषांमध्ये जगभर प्रदर्शित होणार आहे.

Lock Upp 2: Bisexual आहे Akanksha Chamola? गौरव खन्नाच्या पत्नीचं ‘सीक्रेट’ नेमकं कोणी उघड केलं?

Web Title: Tula pahata trailer released mayura pradhans film unfolds a unique love story across two generations

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 01, 2026 | 09:21 AM

Topics:  

  • Entertainemnt News
  • marathi movie

संबंधित बातम्या

Entertainment News: स्वातंत्र्यदिनी अक्षय कुमार-टायगर श्रॉफने फडकावला तिरंगा; ‘खिलाडी कुमार’च्या कृतीने जिंकलं चाहत्यांचं मन!
1

Entertainment News: स्वातंत्र्यदिनी अक्षय कुमार-टायगर श्रॉफने फडकावला तिरंगा; ‘खिलाडी कुमार’च्या कृतीने जिंकलं चाहत्यांचं मन!

Gauhar on Husband Zaid:  ‘माझा पती असं करतो अन्…’  इश्कजादे’ फेम अभिनेत्रीचा मोठा खुलासा
2

Gauhar on Husband Zaid: ‘माझा पती असं करतो अन्…’ इश्कजादे’ फेम अभिनेत्रीचा मोठा खुलासा

Independence Day 2026: स्वातंत्र्यदिनाच्या उत्साहात ‘फौजी’चा देशभक्तीचा हुंकार, विशेष चर्चेत
3

Independence Day 2026: स्वातंत्र्यदिनाच्या उत्साहात ‘फौजी’चा देशभक्तीचा हुंकार, विशेष चर्चेत

Dwidha: ‘द्विधा’ चित्रपटाच्या ट्रेलरचे दिमाखदार अनावरण, बाप-लेकीच्या नात्यातील भावनिक द्वंद्वाची हृदयस्पर्शी झलक
4

Dwidha: ‘द्विधा’ चित्रपटाच्या ट्रेलरचे दिमाखदार अनावरण, बाप-लेकीच्या नात्यातील भावनिक द्वंद्वाची हृदयस्पर्शी झलक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.