Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

समर्थ रामदास स्वामींच्या विचारांचा वारसा जपणाऱ्या ‘समर्थ’ चित्रपटाचे मोशन पोस्टर अनावरण

समर्थ रामदास स्वामींचे विचार आणि समाजप्रबोधनाचा संदेश नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने साकारत असलेल्या ‘समर्थ’ या मराठी चित्रपटाचे मोशन पोस्टर आळंदी येथे अनावरण करण्यात आले. थर्मोलाइन मार्केटिंग प्रा. लि. प्रस्तुत आणि ए३ इव्हेंट्स अँड मीडिया सर्व्हिसेस निर्मित हा चित्रपट ऑगस्ट २०२६ मध्ये प्रदर्शित होणार आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: May 30, 2026 | 09:28 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

समर्थ रामदास स्वामींचे विचार, तत्त्वज्ञान, राष्ट्रधर्म आणि समाजप्रबोधनाची शिकवण नव्या पिढीपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्याच्या उद्देशाने साकारत असलेला ‘समर्थ’ हा बहुप्रतिक्षित मराठी चित्रपट येत्या ऑगस्ट २०२६ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. थर्मोलाइन मार्केटिंग प्रा. लि. प्रस्तुत आणि ए३ इव्हेंट्स अँड मीडिया सर्व्हिसेस निर्मित या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा सुरू असून, चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

‘Dhurandhar’मुळे बदललं Jio स्टुडिओचं भवितव्य? मुकेश अंबानींचा महत्त्वाचा खुलासा

अधिक मासानिमित्त आळंदी येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘श्री रामकथा मानस पसायदान’ या विशेष प्रवचन कार्यक्रमात चित्रपटाच्या मोशन पोस्टरचे भव्य अनावरण करण्यात आले. अध्यात्मिक आणि भक्तिमय वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमाला भाविकांसह विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती लाभली. समर्थ रामदास स्वामींच्या विचारांवर आधारित चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रथमच रसिकांसमोर आल्याने उपस्थितांमध्ये विशेष उत्साह पाहायला मिळाला.

या चित्रपटाची मूळ संकल्पना उद्योगपती आणि प्रसिद्ध रामकथा प्रवचनकार रवींद्र पाठक यांची आहे. कार्यक्रमादरम्यान बोलताना त्यांनी चित्रपटामागील उद्देश स्पष्ट केला. ते म्हणाले, “समर्थ रामदास स्वामी हे केवळ संत नव्हते, तर ते समाजसुधारक, राष्ट्रप्रेमी आणि लोकजागृती करणारे महान विचारवंत होते. त्यांच्या शिकवणुकीचा प्रभाव आजही समाजावर दिसून येतो. ‘समर्थ’ या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांच्या विचारांची ताकद आणि त्यांची आजच्या काळातील उपयुक्तता नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. हा चित्रपट केवळ मनोरंजनासाठी नसून, प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडणारा आणि प्रेरणा देणारा ठरेल.”

चित्रपटातील कलाकारांची नावे अद्याप जाहीर करण्यात आलेली नाहीत. निर्मात्यांनी कलाकारांची निवड अत्यंत काळजीपूर्वक करण्यात आल्याचे सांगितले असून, त्याबाबतची अधिकृत घोषणा लवकरच करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे चित्रपटात कोणते कलाकार झळकणार याबाबतही प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे.

चित्रपटाचे दिग्दर्शक योगेश फुलफगर यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, “समर्थ रामदास स्वामींचे विचार आजही समाजाला दिशा देणारे आहेत. त्यांच्या शिकवणुकीत आत्मविश्वास, कर्तव्यनिष्ठा, राष्ट्रभक्ती आणि सामाजिक बांधिलकी यांचा संदेश आहे. आधुनिक तंत्रज्ञान आणि प्रभावी कथनशैलीच्या माध्यमातून हे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रेक्षकांना हा चित्रपट भावनिक आणि बौद्धिकदृष्ट्या समृद्ध अनुभव देईल, असा आम्हाला विश्वास आहे.”

‘समर्थ’ चित्रपटाची निर्मिती आणि कथा रवींद्र पाठक यांनी सांभाळली आहे. चित्रपटाचा कथाविस्तार आणि पटकथा आशुतोष भोसेकर यांनी लिहिली असून, संवादलेखनाची जबाबदारी मानस लयाळ यांनी पार पाडली आहे. तर अमोल भगत हे चित्रपटाचे क्रिएटिव्ह प्रोड्युसर आणि कार्यकारी निर्माते म्हणून कार्यरत आहेत. अनुभवी आणि अभ्यासू टीमच्या माध्यमातून हा चित्रपट साकारला जात असल्याने चित्रपटाकडून अपेक्षा वाढल्या आहेत.

चिन्मय मांडलेकर करणार ‘या’ आगामी मालिकेचे लेखन! मराठी अस्मितेसाठी एकत्र, लेखक-दिग्दर्शकाची ‘ही’ सुप्रसिद्ध जोडी

मराठी चित्रपटसृष्टीमध्ये ऐतिहासिक, धार्मिक आणि प्रेरणादायी विषयांवरील चित्रपटांना प्रेक्षकांकडून नेहमीच चांगला प्रतिसाद मिळत आला आहे. त्यातच समर्थ रामदास स्वामींसारख्या महान संताच्या जीवनदृष्टीवर आणि विचारांवर आधारित चित्रपट असल्याने ‘समर्थ’कडे विशेष लक्ष वेधले जात आहे. समाजाला सकारात्मक दिशा देणारे आणि सांस्कृतिक मूल्यांची जपणूक करणारे विषय आजच्या काळात अधिक महत्त्वाचे ठरत आहेत. या पार्श्वभूमीवर ‘समर्थ’ हा चित्रपट मनोरंजनासोबतच समाजप्रबोधनाचे कार्यही करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

समर्थ रामदास स्वामींच्या विचारसंपदेचा आधुनिक माध्यमातून वेध घेणारा आणि त्यांच्या शिकवणीचा प्रभाव नव्या पिढीपर्यंत पोहोचवणारा ‘समर्थ’ हा चित्रपट प्रेक्षकांसाठी प्रेरणादायी, विचारप्रवर्तक आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध अनुभव ठरणार आहे. त्यामुळे ऑगस्ट २०२६ मध्ये प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाची आता रसिक आतुरतेने वाट पाहत आहेत.

Web Title: Unveiling of the motion poster for the film samarthpreserving the legacy of samarth ramdas swamis thoughts

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 30, 2026 | 09:28 PM

Topics:  

  • latest movies

संबंधित बातम्या

Marathi Medium : मराठी अस्मितेचा जागर होणार! मालिकेत झळकणार, सोशल मीडिया स्टार श्रद्धा पवार
1

Marathi Medium : मराठी अस्मितेचा जागर होणार! मालिकेत झळकणार, सोशल मीडिया स्टार श्रद्धा पवार

Visaru nako tu mala : Promo असा की कधीच विसरणार नाही! Music पण A1 अन् कलाकारांची निवडही नंबर वन
2

Visaru nako tu mala : Promo असा की कधीच विसरणार नाही! Music पण A1 अन् कलाकारांची निवडही नंबर वन

‘भूतम भयम’ : नवा कोरा हॉरर मराठी सिनेमा! खरंच हॉरर कॉमेडी विश्वातला गेमचेंजर? ‘या’ तारखेला मिळणार उत्तर
3

‘भूतम भयम’ : नवा कोरा हॉरर मराठी सिनेमा! खरंच हॉरर कॉमेडी विश्वातला गेमचेंजर? ‘या’ तारखेला मिळणार उत्तर

Gullak 5 : याच कारणामुळे वैभव राज गुप्ताने सोडली का ‘गुल्लक 5’? ‘हे’ आहे कारण, वाचा
4

Gullak 5 : याच कारणामुळे वैभव राज गुप्ताने सोडली का ‘गुल्लक 5’? ‘हे’ आहे कारण, वाचा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.