फोटो सौजन्य - Social Media
‘मराठी मिडीयम’
मालिकेचे नाव ‘मराठी मिडीयम’ आहे. मालिका कधीपासून पाहता येईल याची तारीख सध्या जाहीर नाही परंतु 29 मे रोजी या मालिकेचा Promo लाँच करण्यात आला आहे. मराठी शाळांच्या अस्मितेवर या मालिकेची कथा आधारित आहे. सध्या राज्यभरात मराठी शाळा हाल सोसत आहेत त्यामुळे हा मुद्दा आणि त्यावर आधारित ही मालिका पाहणे महत्वाचे ठरणार आहे. मालिकेचे लेखन स्वतः अभिनेता चिन्मय मांडलेकरने केले आहे तर मंदार देवस्थळीच्या दिग्दर्शनाखाली मालिका आकार घेणार आहे.
Reelstar श्रद्धा पवारचे मालिका विश्वात पदार्पण!
रिलस्टार श्रद्धा पवार सोशल मीडियाची क्वीन म्हणून ओळखली जाते. अनेक मराठी हिट गाण्यांमध्ये अभिनय करून आज श्रद्धा मराठी मालिका विश्वात तिचे पहिले पाऊल ठेवत आहे. त्यामुळे ही मालिका तिच्यासाठी आणि तिच्या चाहत्यांसाठी विशेष आहे. या मालिकेत श्रद्धासोबत अभिनेता अक्षय नलावडेही झळकणार आहे.
स्टार प्रवाहच्या मेगा लाँच कार्यक्रमात नुकतीच या नव्या मालिकेची घोषणा करण्यात आली असली, तरी मालिकेतील सर्व सहाय्यक कलाकारांची नावे अद्याप गुप्त ठेवण्यात आली आहेत. वरिष्ठ कलाकार तसेच कुटुंबातील इतर महत्त्वाच्या भूमिकांमध्ये कोण झळकणार याचा खुलासा वाहिनी आगामी टीझर प्रोमोमधून टप्प्याटप्प्याने करणार आहे.






