Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Govindrao Powale : मराठी भावगीतांचा आवाज हरपला! सुप्रसिद्ध गायक गोविंदराव पोवळे यांचे निधन; संगीतसृष्टीत खळबळ

‘माती सांगे कुंभाराला’ आणि ‘तुझ्या मुरलीत माझी प्रतिमा’ यांसारख्या अजरामर भावगीतांतून महाराष्ट्रातील घराघरांत पोहोचलेला स्वर आज काळाच्या पडद्याआड गेला आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: May 10, 2026 | 09:05 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

‘माती सांगे कुंभाराला’ तसेच ‘तुझ्या मुरलीत माझी प्रतिमा’ अशा अनेक भावगीतांतून महाराष्ट्रसाध्य घराघरात पोहचलेला आवाज काळाच्या पडद्याआड गेला आहे. जेष्ठ आणि सुप्रसिद्ध गायक तसेच संगीतकार गोविंदराव पोवळे यांचे निधन झाले आहे. वयाच्या 94 व्या वर्षी त्यांनी प्राण सोडले असून वयोमानाने त्यांचे निधन झाल्याचे सांगण्यात येत आहे. व्हायच्या अगदी 15 व्या वर्षांपासून ते गायन क्षेत्रात आहेत, त्यामुळे मराठी भावगीतांमध्ये त्यांचे योगदान अफाट आहे. अनेक दशकेच नाही तर गेल्या अर्धा शतकापेक्षाही जास्त काळ त्यांनी मराठी संगीतक्षेत्राची तसेच मायबाप रसिकांची सेवा केली आहे. त्यांच्या निधनाच्या बातमीमुळे संपूर्ण संगीतक्षेत्र शोकाकुल आहे.

‘Palkhi Nighali Rajachi’ गाण्याचे संगीतकार काळाच्या पडद्याआड! नितीन मोरजकरांचे निधन

‘माती सांगे कुंभाराला’ यांसारख्या अजरामर गीतांना त्यांनी आपल्या स्वरांनी अमर केले. तसेच ‘रात्र काळी घागर काळी, ‘गंगा आली रे अंगणी’ (संथ वाहते कृष्णामाई चित्रपट), ‘उमटली रामाची पाऊले’ तसेच ‘तुझ्या मुरलीत माझी प्रतिमा’ अशा अनेक मधुर भावजतांना गोविंद पावले यांनी त्यांच्या सुमधुर स्वरांनी गायले आहे. अशा अनेक भावगीतांचा गायन त्यांनी केले असून देवाच्या नामाने गेल्या अनेक दशकांपासून त्यांनी संगीताची सेवा केली आहे.

वयाच्या अवघ्या १५व्या वर्षी आकाशवाणीवर गायन सुरू करून त्यांनी आपल्या संगीत प्रवासाची सुरुवात केली आणि मराठी सुगम संगीतात महत्त्वाचे स्थान मिळवले. गोविंद पोवळे त्याकाळी आकाशवाणीमध्ये गाणारे सगळ्यात लहान वयाचे गायक होते. त्यामुळे संगीतक्षेत्रात त्यांना विशेष स्थान आहे. त्यांनी १०० हून अधिक गाण्यांना संगीत दिले आणि २५-३० गाण्यांना आपला आवाज दिला, असे त्यांचे भलेमोठे योगदान संगीत क्षेत्राला लाभले आहे.

Usha Chavan : जेष्ठ अभिनेत्रीकडून सरकारवर नाराजी! आयुष्यभरात कमावलेली सगळी मानचिन्ह ठाण्यात दिघे समाधीस्थळी करणार अर्पण

त्यांचा जन्म ३० ऑक्टोबर १९३१ रोजी पनवेलजवळील चिरनेर गावात झाला असून, वडील त्रिंबक पोवळे हे कीर्तनकार असल्यामुळे त्यांना घरातूनच संगीताचा वारसा लाभला. आकाशवाणीवर सर्वात कमी वयाचा गायक म्हणून त्यांनी प्रवेश केला आणि चार दशकांहून अधिक काळ सुगम संगीत क्षेत्रात योगदान दिले. वयाच्या ९४व्या वर्षी त्यांचे निधन झाले असून त्यांच्या जाण्याने मराठी सुगम संगीतातील एक सुवर्णयुग संपले आहे.

Web Title: Veteran marathi singer govindrao povale passed away

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 10, 2026 | 09:04 PM

Topics:  

  • Death
  • Famous Singer

संबंधित बातम्या

Palghar Accident : स्टोर रुमची भिंत कोसळली… अन् होत्याचं नव्हतं झालं, तिघांचा मृत्यू
1

Palghar Accident : स्टोर रुमची भिंत कोसळली… अन् होत्याचं नव्हतं झालं, तिघांचा मृत्यू

Rani Mukerji Mother Death: अभिनेत्री राणी मुखर्जीला मातृशोक; कृष्णा मुखर्जी यांनी ७५व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2

Rani Mukerji Mother Death: अभिनेत्री राणी मुखर्जीला मातृशोक; कृष्णा मुखर्जी यांनी ७५व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Kishor Kumar Song Ban : 01 वर्षे सरकारी माध्यमांवर बंदी करण्यात आली होती गाणी ? कोण होता तो गायक , कोणत्या गायकाची गाणी होती बंद
3

Kishor Kumar Song Ban : 01 वर्षे सरकारी माध्यमांवर बंदी करण्यात आली होती गाणी ? कोण होता तो गायक , कोणत्या गायकाची गाणी होती बंद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.