Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 23 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ड्युटी संपवून घरी जाताना काळाचा घाला; कंपनीच्या बसखाली सुपरवायझरचा मृत्यू

ड्युटी संपवून सायकलने घरी जात असलेल्या बजाज कंपनीतील सुपरवायझरला कंपनीच्या बसने धडक दिल्याने झालेल्या अपघातात त्यांचा मृत्यू झाला आहे. ही घटना २० नोव्हेंबर रोजी रात्री एमआयडीसी वाळूज परिसरात घडली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Nov 23, 2026 | 12:28 PM
ड्युटी संपवून घरी जाताना काळाचा घाला; कंपनीच्या बसखाली सुपरवायझरचा मृत्यू

ड्युटी संपवून घरी जाताना काळाचा घाला; कंपनीच्या बसखाली सुपरवायझरचा मृत्यू

Follow Us
Follow Us:
  • ड्युटी संपवून घरी जाताना काळाचा घाला
  • कंपनीच्या बसखाली सुपरवायझरचा मृत्यू
  • कुटुंबावर दुःखाचा डोंगर
छत्रपती संभाजीनगर : ड्युटी संपवून सायकलने घरी जात असलेल्या बजाज कंपनीतील सुपरवायझरला कंपनीच्या बसने धडक दिल्याने झालेल्या अपघातात त्यांचा मृत्यू झाला आहे. राजकिरण साहेबराव तायडे (वय ४०, रा. भीमनगर, कापसी रोड, अकोला) असे मृत सुपरवायझरचे नाव आहे. ही घटना २० नोव्हेंबर रोजी रात्री एमआयडीसी वाळूज परिसरात घडली आहे. याप्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलिसांनी बसचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

 

राजकिरण तायडे हे बजाज कंपनीत सुपरवायझर म्हणून कार्यरत होते. शुक्रवारी सायंकाळी पाचच्या सुमारास त्यांची ड्युटी संपल्यानंतर ते सायकलने घरी जाण्यासाठी निघाले होते. दरम्यान, कंपनीची बस (एमएच-२०-जीझेड-५४१८) चालकाने निष्काळजीपणे वळविल्याने बसची तायडे यांच्या सायकलला जोरदार धडक बसली. या धडकेत ते गंभीर जखमी झाले. अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी आणि संबंधितांनी त्यांना तातडीने रुग्णवाहिकेतून घाटी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

हे सुद्धा वाचा : दहिहंडी उत्सवात पिस्तूल दाखवून दहशत माजवली, कंचीले टोळीला पोलिसांचा दणका; मकोका अंतर्गत कारवाई

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच मुंबई येथे असलेले त्यांचे लहान भाऊ उमेश तायडे (वय ३२) छत्रपती संभाजीनगर येथे आले. त्यांनी नातेवाइकांकडून घटनेची माहिती घेतल्यानंतर शनिवारी एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी संबंधित बसचालकाविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा नोंदविला आहे. या अपघाताची पुढील चौकशी एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक विनोद अबुज करीत आहेत.

हे सुद्धा वाचा : ड्राय डेच्या आदेशाला केराची टोपली! नवी मुंबईत ब्लॅकने दारूविक्री जोमात; अधिकारी गायब?

PMPML बसने अज्ञात व्यक्तीला चिरडले

पुण्यात पीएमपीएल बसने एका व्यक्तीला चिरडल्याची दुर्दैवी घटना घडली. कर्वेनगर पुलाखाली बस चिरडण्याचा या घटनेत अज्ञात व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. या धक्कादायक घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. कर्वेनगर परिसरातून पायी जात असताना भरधाव पीएमपीएमएल बसने संबंधित पादचाऱ्याला जोरदार धडक दिली. बसखाली आल्याने या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पुणे पोलीस आणि फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळी धाव घेतली. मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नसून पोलीस त्याची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत. मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला असून,पुढील तपास सुरू केला आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: अपघातात मृत्यू झालेल्या सुपरवायझरचे नाव काय आहे?

    Ans: राजकिरण साहेबराव तायडे (वय ४०) असे मृत सुपरवायझरचे नाव आहे. ते बजाज कंपनीत कार्यरत होते.

  • Que: हा अपघात नेमका कुठे आणि कधी घडला?

    Ans: २० नोव्हेंबर रोजी एमआयडीसी वाळूज परिसरात ड्युटी संपवून सायकलने घरी जात असताना कंपनीच्या बसने त्यांच्या सायकलला धडक दिली.

  • Que: या अपघाताप्रकरणी पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: मृताच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून एमआयडीसी वाळूज पोलिसांनी बसचालकाविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक विनोद अबुज करीत आहेत.

Web Title: An incident has occurred in which a person died after being run over by a company bus nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 23, 2026 | 12:23 PM

Topics:  

  • Accident News
  • Bus Accident
  • Death

संबंधित बातम्या

Road Accident News : रविवार ठरला मृत्यूचा काळ! विविध राज्यात झाले सहा भीषण अपघात, २७ जणांचा दुर्दैवी मृत्यू
1

Road Accident News : रविवार ठरला मृत्यूचा काळ! विविध राज्यात झाले सहा भीषण अपघात, २७ जणांचा दुर्दैवी मृत्यू

राजस्थानच्या कोटा येथील अपघातात महाराष्ट्रातील 9 जणांचा मृत्यू; 6 जण जखमी
2

राजस्थानच्या कोटा येथील अपघातात महाराष्ट्रातील 9 जणांचा मृत्यू; 6 जण जखमी

जायकवाडी कालव्यात फेकलेल्या श्यामचाही मृतदेह सापडला; दोन चिमुकल्यांच्या मृत्यूने गावावर शोककळा
3

जायकवाडी कालव्यात फेकलेल्या श्यामचाही मृतदेह सापडला; दोन चिमुकल्यांच्या मृत्यूने गावावर शोककळा

Uttarakhand Bus Accident: मृत्यूचे तांडव! ३० ते ३५ प्रवाशांनी भरलेली बस थेट १०० मीटर खोल पाण्यात कोसळली; भीषण अपघातांत १२ जणांचा..
4

Uttarakhand Bus Accident: मृत्यूचे तांडव! ३० ते ३५ प्रवाशांनी भरलेली बस थेट १०० मीटर खोल पाण्यात कोसळली; भीषण अपघातांत १२ जणांचा..

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.