Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 25 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Victoria Movie : सातव्या मजल्यावर घडलं तरी काय? सिनेमाच्या शूटिंगदरम्यान सोनाली कुलकर्णीसोबत घडलेली ‘ती’ विचित्र घटना

'व्हिक्टोरिया'च्या शूटिंगदरम्यान अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि संपूर्ण टीमला काही रहस्यमय अनुभव आल्याचा दावा तिने एका पॉडकास्टमध्ये केला होता.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jun 21, 2026 | 03:29 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

 

हॉरर फिल्म्स कुणाला नाही आवडत! लोकं भितात पण अशा चित्रपटांना पाहण्याची आवडही भलतीच असते. अशा सिनेमांना पाहताना जेवढी भीती वाटते त्यापेक्षा जास्त मज्जाही येते. अशीच मज्जा हॉरर सिनेमाच्या शूटिंग दरम्यानही येत असावी. पण जेव्हा अशा सिनेमाची शूटिंग असते त्यावेळी त्या सिनेमाशी जोडलेल्या कलाकारांमध्ये एक भीतीचे वातावरण असते. कारण कधी कधी अशा सिनेमांना शूट करण्यासाठी आपला मायदेश सोडून देशाबाहेरही जावे लागते. कधी कधी तर जिथे शूटिंग सुरु आहे, त्याच ठिकाणी राहवेदेखील लागते. यादरम्यान, ज्या कलाकारंनी अशी शूटिंग अनुभवली आहे त्या अनेक कलाकारांनी त्यांच्या अनुभवांचा पाढा माध्यमांसमोर वाचला आहे.

Rhea Kapoor : रिया कपूरच्या टीमशी संबंधित कोट्यावधींच्या दागिन्यांची चोरी; मुंबई पोलिसांकडून तपास सुरू

काही वर्षांपूर्वी मराठी सिनेसृष्टीत एक भयपट आले होते. चित्रपटाचे नाव ‘व्हीकटोरीया’ असून सिनेमात मुख्य भूमिकेत अभिनेता पुष्कर जोग आणि अभिनेत्री सोनाली कुलकर्णी झळकली होती. सिनेमाचे दिग्दर्शन विराजास कुलकर्णी आणि जीत अशोक यांनी केली होती तर चित्रपटाचे निर्माते आनंद पंडित, रूपा पंडित, आणि पुष्कर जोग आहेत. एका पॉडकास्टमध्ये सोनालीने शूटिंगदरम्यान अनुभवलेल्या काही घटनांचा पाढा वाचला. तिनेच नव्हे तर तेथे उपस्थित असणाऱ्या टीमने देखील हा प्रसंग अनुभवला आहे.

सिनेमाची शूटिंग United Kingdom मध्ये Scotland येथे स्थित असलेल्या एका प्रसिद्ध पॅलेसमध्ये झाली. पॅलेस मोठा, भयाण आणि निर्जन होता. भाडेतत्वावर तेथे शूटिंग करण्यात आली. त्यामुळे क्रू आणि कास्टला तिथेच राहावे लागत होते. एकदा, सोनालीला त्या महालाच्या सातव्या माळ्यावर लाईट बंद-चालू होताना दिसली. संपूर्ण महालातली विद्युत रोषणाई नीट आहे परंतु फक्त सातव्या मजल्यावरच तसा प्रकार दिसत होता. फक्त सोनाली नव्हे तर तिथे हजर प्रत्येक क्रूने त्या गोष्टी अनुभवल्या होत्या.

‘सावित्रीबाई जोतीराव फुले’ मालिकेचा नवा डिजीटल प्रवास! ‘मराठी वारसा’ यूट्यूब वाहिनीवर पहिला भाग प्रसारित

नक्की काय आहे Victoria Movie!

चित्रपटाची कथा अंकिता (सोनाली कुलकर्णी) आणि सिद्धार्थ (आशय कुलकर्णी) या तरुण जोडप्याभोवती फिरते. दोघे सुट्टीसाठी स्कॉटलंडला जातात आणि तिथे दुर्गम भागात असलेल्या ‘हॉटेल व्हिक्टोरिया’मध्ये राहण्यासाठी पोहोचतात. हे हॉटेल त्यांचा नातेवाईक अधिराज (पुष्कर जोग) याच्या मालकीचे असून, तो त्या विशाल मालमत्तेत एकटाच राहतो. मात्र, हॉटेलमध्ये आल्यानंतर लवकरच अंकिता आणि सिद्धार्थला अधिराजचे वागणे अतिशय विचित्र आणि संशयास्पद वाटू लागते. त्याच्याकडे काही काळी रहस्ये दडलेली असल्याची जाणीव त्यांना होते. दरम्यान, अंकिताला त्या जुन्या हॉटेलमध्ये एखाद्या अमानवी आणि भयावह शक्तीचे अस्तित्व जाणवू लागते. त्यानंतर हे जोडपे एका शर्यतीत अडकते, हॉटेल खरोखरच सूडाने पेटलेल्या आत्म्याने पछाडले आहे की हे सर्व कोणाच्या मनाचा खेळ आहे, याचा उलगडा करण्यासाठी त्यांना वेळेशी स्पर्धा करावी लागते.

Web Title: Victoria movie horror sonalee kulkarni

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 21, 2026 | 03:29 PM

Topics:  

  • sonalee kulkarni

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.