Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bol Bol Rani : गूढ नजरा, थरारक वातावरण आणि अनुत्तरित प्रश्न; तयार रहा… ‘या’ तारखेला उलगडणार रहस्य

सई ताम्हणकर, सुबोध भावे, चिन्मय मांडलेकर आणि संभाजी ससाणे यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटात एका महिलेच्या आयुष्याभोवती फिरणारी गूढ कथा उलगडणार असून, प्रत्येक पात्रामागे दडलेलं रहस्य प्रेक्षकांची उत्कंठा शेवटपर्यंत कायम ठेवणार आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jun 27, 2026 | 04:30 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

 

मराठी चित्रपटसृष्टीत आशयघन आणि वेगळ्या धाटणीच्या चित्रपटांना प्रेक्षकांचा वाढता प्रतिसाद मिळत असताना, आता रहस्य, थरार आणि सस्पेन्सचा रोमांचकारी अनुभव देणारा ‘बोल बोल राणी’ हा चित्रपट १७ जुलै रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे. नुकतेच प्रदर्शित झालेल्या नव्या पोस्टरने चित्रपटाविषयीची उत्सुकता आणखी वाढवली आहे.

‘सावित्रीबाई जोतीराव फुले’ मालिकेत झळकणार शिरूरची अनघा शिंदे; शिरूरच्या शिरपेचात मानाचा तुरा

पोस्टरमध्ये सई ताम्हणकर, सुबोध भावे, चिन्मय मांडलेकर आणि संभाजी ससाणे हे चारही कलाकार गंभीर आणि तणावपूर्ण अंदाजात दिसत आहेत. त्यांच्या हातातील बंदुका, चेहऱ्यांवरील तीव्र भाव आणि गूढ वातावरण चित्रपटातील संघर्ष, धोक्याची चाहूल आणि रहस्याची झलक देतात. प्रत्येक पात्राच्या चेहऱ्यामागे एखादं गुपित दडलं असल्याची भावना पोस्टरमधून निर्माण होत असून, कथानक नेमकं कोणत्या दिशेने जाणार याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये निर्माण झाली आहे.

‘बोल बोल राणी’ हा एका महिलेच्या आयुष्याभोवती फिरणारा रहस्यप्रधान थ्रिलर आहे. नातेसंबंधांमधील विश्वास, फसवणूक, गूढ घटनांची मालिक आणि अनपेक्षित वळणांनी भरलेली कथा प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवणार आहे. प्रत्येक टप्प्यावर नव्या प्रश्नांची भर पडत जाणारी ही कथा रहस्याचा उलगडा होईपर्यंत उत्कंठा कायम ठेवेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

चित्रपटाचे दिग्दर्शक सिड विंचुरकर म्हणाले की, नव्या पोस्टरमधून चित्रपटाच्या रहस्यमय विश्वाची केवळ एक झलक दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. प्रत्येक पात्रामागे एक गुपित दडलं असून, त्याच गुपिताभोवती संपूर्ण कथानक फिरतं. सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्रेक्षकांना गुंतवून ठेवणारा आणि प्रत्येक वळणावर नवी उत्सुकता निर्माण करणारा हा चित्रपट १७ जुलै रोजी एक वेगळाच सिनेमॅटिक अनुभव देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

‘यूट्यूबवर आता व्याख्याने देणार’; अभिनेते पंकज त्रिपाठी यांनी नेमकं काय म्हटलं?

‘न्यूझीलंड मोशन पिक्चर्स लिमिटेड’ निर्मित या चित्रपटाचे निर्माते अपूर्वा मोतिविले सहाय, सिड विंचुरकर आणि अमित भानुशाली आहेत. यश मोदी, शब्बीर सबुवाला, रचना वोरा, तपन विचारे, यश राम शाहानी आणि आयुष कृप्लानी हे सहनिर्माते आहेत. सई ताम्हणकर, सुबोध भावे, चिन्मय मांडलेकर आणि संभाजी ससाणे यांच्या दमदार अभिनयाने सजलेला ‘बोल बोल राणी’ हा चित्रपट रहस्य, सस्पेन्स आणि थराराचा वेगळा अनुभव घेऊन १७ जुलैपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Web Title: When will be bol bol rani marathi movie release date

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 27, 2026 | 04:30 PM

Topics:  

  • bollywod news
  • marathi movie

संबंधित बातम्या

Pach Futacha Bachchan Movie: कीर्तन, कोल्हापुरी भाषा अन् नाट्यमय कथा, पाच फुटाचा बच्चन’ चित्रपटाच्या ट्रेलरने वेधलं लक्ष
1

Pach Futacha Bachchan Movie: कीर्तन, कोल्हापुरी भाषा अन् नाट्यमय कथा, पाच फुटाचा बच्चन’ चित्रपटाच्या ट्रेलरने वेधलं लक्ष

Gondhal Marathi Movie: ‘गोंधळ’ची ऑस्करवारी सुरू! मुख्यमंत्र्यांची भेट घेत टीमने केली ‘ही’ खास मागणी
2

Gondhal Marathi Movie: ‘गोंधळ’ची ऑस्करवारी सुरू! मुख्यमंत्र्यांची भेट घेत टीमने केली ‘ही’ खास मागणी

Aali Mothi Shahani Movie: हृता-सारंगची ऑनस्क्रीन जुगलबंदी; ‘बोनिता बोनिता’ गाण्याने वेधलं लक्ष
3

Aali Mothi Shahani Movie: हृता-सारंगची ऑनस्क्रीन जुगलबंदी; ‘बोनिता बोनिता’ गाण्याने वेधलं लक्ष

Chhaya Kadam Bhootam Bhayyam: छाया कदमांचा ‘भूतम भयम्’चा अनुभव; ‘जठाई’च्या व्यक्तिरेखेबाबत अभिनेत्रीने सांगितली मनातली गोष्ट
4

Chhaya Kadam Bhootam Bhayyam: छाया कदमांचा ‘भूतम भयम्’चा अनुभव; ‘जठाई’च्या व्यक्तिरेखेबाबत अभिनेत्रीने सांगितली मनातली गोष्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.