( फोटो सौजन्य- सोशल मिडिया)
Maharashtrachi HasyaJatra: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. आपल्या विनोदी स्किट्स आणि कलाकारांच्या भन्नाट अभिनयामुळे या कार्यक्रमाने घराघरात लोकप्रियता मिळवली आहे. आता या कार्यक्रमाच्या टीमसाठी एक खास आणि आनंदाचा क्षण समोर आला आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ने आपल्या प्रवासाची ८ वर्षे पूर्ण केली आहेत. यानिमित्ताने सेटवर केक कापून खास सेलिब्रेशन करण्यात आलं.
सचिन पी. गोस्वामी यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत या खास क्षणाची माहिती दिली. या पोस्टमध्ये त्यांनी सोनी मराठीच्या आठ वर्षांच्या प्रवासाचा उल्लेख करत ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या या प्रवासात साथ देणाऱ्या सर्वांचे आभार मानले आहेत.
‘हास्यजत्रेच्या या ८ वर्षांत…’
सचिन पी. गोस्वामी यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं, “२०१८ ला आजच्या दिवशी सुरू झालेला सोनी मराठी वाहिनीचा प्रवास या प्रवासात हास्य जत्रा ही सोबत आहे.. हास्यजत्रेच्या या ८ वर्ष पूर्ण होण्यात सर्व सोनी टीम, वेटक्लाउड टीम आणि सर्व रसिक प्रेक्षकांचे खूप खूप आभार. असंच प्रेम कायम ठेवा.”
या खास प्रसंगी त्यांनी या प्रवासात सहप्रवासी झालेल्या अनेक मान्यवरांचेही आभार मानले. अजय भालवणकर, अमित फाळके, गणेश सागडे, अमित दीक्षित, सिद्धगुरु, अरविंद कोप्पली आणि गौरव बॅनर्जी यांच्यासह संपूर्ण सोनी टीमचे त्यांनी आभार व्यक्त केले.
View this post on Instagram
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ने गेल्या आठ वर्षांत आपल्या विनोदी स्किट्स आणि कलाकारांच्या दमदार अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं आहे. कार्यक्रमातील अनेक कलाकार आज घराघरात लोकप्रिय झाले आहेत. त्यामुळे ‘हास्यजत्रे’च्या आठ वर्षांच्या प्रवासात रसिक प्रेक्षकांचा वाटा महत्त्वाचा आहे, असं टीमच्या पोस्टमधूनही दिसून येतं.
या खास टप्प्यानिमित्ताने टीमने केक कापून सेलिब्रेशन केलं असून, सोशल मीडियावर या सेलिब्रेशनचे फोटो आणि पोस्ट चर्चेत आहेत. आता आगामी काळातही ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ प्रेक्षकांना असंच खळखळून हसवत राहणार का, याची उत्सुकता चाहत्यांना आहे.
Tumbbad 2: ‘तुम्बाड’च्या आठवणी पुन्हा ताज्या! रेकीदरम्यान सापडले ‘आटे की गुडिया’चे मूळ साचे






