Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 28 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Natak Controversy: ‘एक शब्द राहिला तो म्हणजे…’; ‘आमनेसामने’ नाटकाच्या मानधनाच्या वादावर मंगेश कदम-लीना भागवत यांचं स्पष्टीकरण

Aamne Saamne Natak Controversy: ‘आमने सामने’ नाटकाच्या मानधनाच्या वादावर निर्माते मंगेश कदम आणि लीना भागवत यांनी आपली बाजू मांडली. रोहन गुजर आणि केतकी विलास यांच्या आरोपांवर त्यांनी काय सांगितलं?

  • By अमृता यादव
Updated On: Oct 28, 2026 | 01:17 PM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Natak Controversy: रंगभूमीवर गाजत असलेलं ‘आमने सामने’ हे नाटक गेल्या दोन दिवसांपासून मानधनाच्या मुद्द्यावरून चर्चेत आहे. नाटकातील कलाकार रोहन गुजर आणि केतकी विलास यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत त्यांना नाटकातून काढून टाकल्याचा दावा केला होता. मानधनाच्या कारणामुळे नाटक थांबवण्यास सांगितल्याचं त्यांनी या व्हिडीओत म्हटलं होतं. या प्रकरणावर कलाकार आणि प्रेक्षकांनीही सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिल्या. आता नाटकाचे निर्माते आणि कलाकार मंगेश कदम व लीना भागवत यांनी व्हिडीओच्या माध्यमातून आपली बाजू मांडली आहे.

‘मानधन वाढवून मागितलं म्हणून काढलं, एवढंच नाही’

लीना भागवत यांनी रोहन गुजर आणि केतकी विलास यांच्या व्हिडीओचा उल्लेख करत सांगितलं की, त्यांनी दिवसभर त्या व्हिडीओवर आलेल्या प्रतिक्रिया पाहिल्या. त्यानंतर या प्रकरणातील काही गोष्टी स्पष्ट करणं आवश्यक वाटल्याने त्यांनी आपली बाजू मांडण्याचा निर्णय घेतला.

लीना भागवत म्हणाल्या की, मानधन वाढवून मागितल्यामुळे कलाकारांना तडकाफडकी नाटकातून काढून टाकण्यात आल्याचा सूर त्यांच्या व्हिडीओतून उमटत होता. मात्र, या चर्चेत एक महत्त्वाची गोष्ट राहून गेली, ती म्हणजे कलाकारांनी तिसऱ्यांदा मानधनवाढीचा प्रस्ताव दिला होता.

त्यांनी सांगितलं की, सुरुवातीला मानधनवाढीचा प्रस्ताव आला, तेव्हा नाटक सुरू नव्हतं आणि अनेक वर्षांनंतर मानधन वाढवणं गरजेचं होतं. त्यामुळे निर्मात्यांनी या प्रस्तावाला होकार दिला. त्यानंतर नाटकाचे प्रयोग सुरू झाल्यावर पुन्हा मानधनवाढीचा प्रस्ताव आला.

दुसऱ्या प्रस्तावालाही दिला होता होकार

मंगेश कदम यांनी सांगितलं की, दुसऱ्यांदा मानधनवाढीचा प्रस्ताव आल्यावर त्यांनी स्वतः कलाकारांशी चर्चा केली होती. त्यांची अपेक्षा काय आहे, हे विचारल्यानंतर त्यांनी सांगितलेली रक्कम निर्मात्यांनी मान्य केली होती.

या संदर्भातील मेसेजेस आपल्याकडे लिखित स्वरूपात असल्याचंही मंगेश कदम यांनी नमूद केलं. मानधनवाढीनंतर नाटकाचे प्रयोग पुन्हा सुरळीत सुरू झाले. मात्र, वर्ष पूर्ण होण्याआधीच कॅनडा दौऱ्यादरम्यान पुन्हा एकदा मानधनवाढीचा प्रस्ताव आल्याचं त्यांनी सांगितलं.

दुसऱ्यांदा मानधन वाढवताना कलाकारांना आणखी काही अपेक्षा आहेत का, असं आपण विचारलं होतं. तेव्हा त्यांनी सध्याचं मानधन पुरेसं असल्याचं सांगितलं होतं, असं मंगेश कदम यांनी स्पष्ट केलं.

 

‘दरवर्षी मानधन वाढवणं आम्हाला शक्य झालं नाही’

तिसऱ्यांदा आलेल्या प्रस्तावाबाबत लीना भागवत यांनी सांगितलं की, यावेळी मानधनवाढ दरवर्षी अपेक्षित असल्याचं कळवण्यात आलं होतं. मराठी रंगभूमीवरील कोणत्याही निर्मात्याला प्रत्येक वर्षी नाटकातील कलाकारांचं मानधन वाढवणं शक्य होईलच असं नाही, असं त्यांनी म्हटलं.

Navika Kotia: ‘इंग्लिश विंग्लिश’ फेम नविका कोटियाचा लग्नाच्या काही दिवस आधीच मोडला साखरपुडा, मुलाने केली फसवणूक?

त्या म्हणाल्या, “आम्हाला शक्य झालं नाही. म्हणून आम्ही नाही म्हटलं.”

कलाकारांना अपेक्षित असलेलं मानधन निर्माता म्हणून देता येणार नसेल, तर त्यांच्याकडून ते काम करून घेणं योग्य नाही, असंही लीना भागवत यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे नाटक थांबवण्याचा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं.

यापुढे या प्रकरणावर व्हिडीओ करणार नाही

या प्रकरणावर आपली बाजू मांडल्यानंतर यापुढे यासंदर्भात कोणतेही व्हिडीओ किंवा सोशल मीडिया पोस्ट करणार नसल्याचं लीना भागवत यांनी सांगितलं. या व्हिडीओच्या माध्यमातून आपली बाजू स्पष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचंही त्यांनी नमूद केलं.

‘आमने सामने’ नाटकातील कलाकारांनी केलेले दावे आणि निर्माते मंगेश कदम व लीना भागवत यांनी दिलेलं स्पष्टीकरण यामुळे मानधनाचा हा विषय मराठी रंगभूमीवर चर्चेचा ठरला आहे.

Vibhavari Pradhan: मराठी चित्रपटांत काम करण्याची इच्छा, पण संधीच मिळाली नाही! अभिनेत्री विभावरी प्रधान यांनी व्यक्त केली खंत

Web Title: Mangesh kadam leena bhagwat aamne saamne remuneration issue rohan ketaki video ay

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 28, 2026 | 01:17 PM

Topics:  

  • entertainment
  • Marathi celebrities

संबंधित बातम्या

Vibhavari Pradhan: मराठी चित्रपटांत काम करण्याची इच्छा, पण संधीच मिळाली नाही! अभिनेत्री विभावरी प्रधान यांनी व्यक्त केली खंत
1

Vibhavari Pradhan: मराठी चित्रपटांत काम करण्याची इच्छा, पण संधीच मिळाली नाही! अभिनेत्री विभावरी प्रधान यांनी व्यक्त केली खंत

Navika Kotia: ‘इंग्लिश विंग्लिश’ फेम नविका कोटियाचा लग्नाच्या काही दिवस आधीच मोडला साखरपुडा, मुलाने केली फसवणूक?
2

Navika Kotia: ‘इंग्लिश विंग्लिश’ फेम नविका कोटियाचा लग्नाच्या काही दिवस आधीच मोडला साखरपुडा, मुलाने केली फसवणूक?

Ramayana : भारतीय संस्कृतीचा जागतिक डंका! ‘रामायणम्’च्या भव्य विश्वाची नमित मल्होत्रांनी शेअर केली झलक
3

Ramayana : भारतीय संस्कृतीचा जागतिक डंका! ‘रामायणम्’च्या भव्य विश्वाची नमित मल्होत्रांनी शेअर केली झलक

Nana Patekar: नाना पाटेकरांच्या निधनानंतर ‘नाम फाऊंडेशन’चं काय होणार? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
4

Nana Patekar: नाना पाटेकरांच्या निधनानंतर ‘नाम फाऊंडेशन’चं काय होणार? जाणून घ्या महत्त्वाची माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.