Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘बटाट्याची चाळ’ पुन्हा जिवंत होणार; गद्य संवादांशिवाय रंगणार अनोखी मराठी संगीतिका

P. L. Deshpande: पु. ल. देशपांडे यांच्या 'बटाट्याची चाळ'वरील 'या इथे चाळ बटाट्याची' ही भव्य मराठी संगीतिका लवकरच रंगभूमीवर येत आहे. २१ कलाकारांसह रंगणार अनोखा संगीतप्रयोग.

  • By अमृता यादव
Updated On: Jul 23, 2026 | 10:56 AM
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

P. L. Deshpande: मराठी साहित्यविश्वातील ज्येष्ठ साहित्यिक पु. ल. देशपांडे यांच्या अजरामर ‘बटाट्याची चाळ’ या साहित्यकृतीतील ‘एक संगीतक’ या संकल्पनेला नव्या रंगमंचीय स्वरूपात सादर करण्याचा अनोखा प्रयत्न ‘या इथे चाळ बटाट्याची’ या भव्य मराठी संगीतिकेतून करण्यात आला आहे. दोन अंकी, २१ कलाकारांच्या सहभागाने आणि गद्य संवादांशिवाय साकारलेल्या या संगीतिकेचे शुभारंभाचे प्रयोग लवकरच रंगणार आहेत.

पु. ल. देशपांडे यांनी आपल्या लेखणीतून चाळसंस्कृतीतील विनोद, आपुलकी, संघर्ष, नात्यांतील ऊब आणि सामान्य माणसांच्या आयुष्याचं जिवंत चित्र रेखाटलं. त्याच साहित्याचा आत्मा जपत, आजच्या पिढीशी संवाद साधणाऱ्या नव्या संगीतभाषेत हे नाट्यरूपांतर साकारण्यात आलं आहे. गीत, संगीत, नृत्य आणि बहुपात्री रंगमंचीय मांडणीच्या माध्यमातून चाळीतील जीवनाचा हृदयस्पर्शी आणि मनोरंजक प्रवास या संगीतिकेत अनुभवायला मिळणार आहे.

या संगीतिकेचं मूळ लेखन आणि संगीत पु. ल. देशपांडे यांचं असून, कपीश जोशी यांनी निर्मितीची धुरा सांभाळली आहे. देवेंद्र भोमे आणि योगेश सप्रे यांनी दिग्दर्शन केलं असून, संगीत दिग्दर्शन देवेंद्र भोमे तर नाट्यरूपांतर योगेश सप्रे यांनी केलं आहे.

या संगीतिकेत पंढरीनाथ कांबळे, अजित परब, मिलिंद जोशी, आशुतोष मुंगळे, अंजली मराठे, शमिका भिडे, स्वरांगी मराठे, केतन पवार, वज्रांग आफळे, मधुरा आफळे, तन्वी परांजपे, इशिता सावळे आणि साक्षी देशपांडे यांसारख्या कलाकारांची दमदार फळी पाहायला मिळणार आहे. तसेच मंदार बगाडे, ओमकार जोशी, सई जोशी, सिद्धी देशपांडे, तनिष्का जोशी, दीप वैद्य, स्वप्नील कुंभार आणि केदार जाधव हे वाद्यवृंद कलाकार संगीताची साथ देणार आहेत.

Sonu Nigam: ‘शी… अशा कलाकारांना लाज वाटली पाहिजे’; विद्यार्थी आंदोलनावर सोनू निगमचं वक्तव्य चर्चेत; सोशल मीडियावर संतापाची लाट

नेपथ्याची जबाबदारी संदेश बेंद्रे, प्रकाशयोजना सुजय भडकमकर, वेशभूषा गायत्री चक्रदेव, नृत्यरचना मधुरा आफळे, निर्मिती सूत्रधार नितीन नाईक, प्रसिद्धी पराग पब्लिसिटी आणि सूत्रसंचालन मयूर वैद्य यांच्याकडे आहे.

पारंपरिक मराठी संगीत रंगभूमीचा वारसा आणि आधुनिक रंगभाषेचा सुरेख संगम घडवणारी ही संगीतिका पुलंवर प्रेम करणाऱ्या रसिकांसह नव्या पिढीलाही वेगळा आणि अविस्मरणीय रंगमंचीय अनुभव देईल, असा विश्वास निर्मात्यांनी व्यक्त केला आहे.

Megha Dhade Oppose CJP: सीजेपीच्या आंदोलनाला मराठी अभिनेत्री मेघा धाडेचा तीव्र विरोध, आक्रमक विरोधी पोस्टने वेधलं लक्ष; म्हणाली..

Web Title: Yaa ithe chawl batatyachi set to hit the stage soon p l deshpandes batatyachi chaal gets a new musical adaptation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 23, 2026 | 10:56 AM

Topics:  

  • Entertainemnt News
  • Marathi News

संबंधित बातम्या

World News : ट्रम्प-शी भेटीला तिबेटचा ‘ट्विस्ट’; कॅपिटॉलसमोर आंदोलकांचा जोरदार आवाज!
1

World News : ट्रम्प-शी भेटीला तिबेटचा ‘ट्विस्ट’; कॅपिटॉलसमोर आंदोलकांचा जोरदार आवाज!

Afghanistan News : तालिबान म्हणतं ‘संगीत बंद’ पण टॅक्सीमध्ये सुरूच! चेकपोस्ट दिसताच आवाज Off, पुढे गेल्यावर पुन्हा गाणं On ( Sched
2

Afghanistan News : तालिबान म्हणतं ‘संगीत बंद’ पण टॅक्सीमध्ये सुरूच! चेकपोस्ट दिसताच आवाज Off, पुढे गेल्यावर पुन्हा गाणं On ( Sched

Vanita Kharat Weight Loss: महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरातने घटवलं २४ किलो वजन; फिटनेस ट्रान्सफॉर्मेशनची जोरदार चर्चा
3

Vanita Kharat Weight Loss: महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरातने घटवलं २४ किलो वजन; फिटनेस ट्रान्सफॉर्मेशनची जोरदार चर्चा

Nagpur News : कोराडी उड्डाणपुलाला ‘ब्लॉक ‘चा ब्रेक
4

Nagpur News : कोराडी उड्डाणपुलाला ‘ब्लॉक ‘चा ब्रेक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.