
फोटो सौजन्य सोशल मीडिया
११ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या नवरात्रोत्सवापूर्वी काम पूर्ण करण्याचे दावे झाले असले तरी प्रत्यक्षात कामाची गती पाहता ते शक्य दिसत नाही. यंदा विशेष आकर्षणांमुळे गर्दीत आणखी भर पडण्याची शक्यता आहे. त्यातच उड्डाणपुलाचे बांधकाम सुरू असल्याने कोराडी रोडचा बराच भाग अरुंद झाला आहे. त्यामुळे उत्सवाच्या दिवसांत वाहनांची संख्या वाढो न वाढो.. मार्गावर मोठी वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे.
कोराडी नाका चौक आधीच अपघातप्रवण ठिकाण म्हणून निश्चित केला आहे. त्यातच नवरात्रीच्या काळात वाढणारी वाहतूक या परिसरातील धोका वाढवू शकते. बोखारा रेल्वे लेव्हल क्रॉसिंगवरील प्रस्तावित उड्डाणपुलाचा अतिरिक्त भागही अद्याप सुरू झालेला नाही. मुख्य उड्डाणपूल आणि आरओबीचे काम एकाचवेळी पूर्ण करण्याचे सुरुवातीचे नियोजन होते. मात्र, रेल्वेच्या परवानग्या मिळण्यास झालेल्या विलंबामुळे दोन्ही कामे स्वतंत्रपणे करावी लागत आहेत.
Nagpur News : आता चेहरा ओळखताच उघडणार विमानतळाचे गेट
उड्डाणपूल वेळेत पूर्ण न झाल्यास उत्सवाच्या काळात कोराडी रोडवर वाहनांचा मोठा ताण निर्माण होऊ शकतो. त्यामुळे मंदिराकडे जाणारे भाविक, स्थानिक नागरिक आणि नियमित वाहनचालकांना दीर्घकाळ वाहतूक कोंडीत अडकण्याची शक्यता आहे.
Nagpur News : ओसीविना ३ हजार इमारती; बिल्डरांना नोटिसांचा दणका
सुमारे ४५ कोटींच्या खर्चातून उभारण्यात येत असलेल्या चारपदरी उड्डाणपुलाचे काम हाय-टेंशन वीजवाहिनीमुळे अडले होते. वीजवाहिनीची उंची वाढविण्यासाठी आवश्यक ‘मोनोपोल’ उभारल्याचे एनएचएआयकडून सांगण्यात आले. मात्र, पुढील कामासाठी रेल्वेचा ‘ब्लॉक’ आवश्यक आहे. हा ब्लॉक मिळण्यास विलंब होत असल्याने कामाची गती पुन्हा मंदावली आहे.
दीड महिन्यापासून रेल्वेकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात येत असल्याचे एनएचएआयचे म्हणणे आहे.
वीजवाहिनीचा प्रश्न मार्गी लागल्यानंतरही उड्डाणपुलाचे उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी एक महिन्यापेक्षा अधिक कालावधी लागण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.