Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 23 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Aadesh Bandekar : आदेश बांदेकरांचं कुटुंब वारीच्या वाटेवर! सासऱ्यांचा ‘तो’ प्रश्न ऐकून लाजली पूजा बिरारी, VIDEO व्हायरल

आदेश बांदेकर मुलगा सोहम बांदेकर आणि सुन पूजा बिरारीसोबत आषाढी वारीत सहभागी होणार आहेत. वारीपूर्वीचा VIDEO शेअर करत त्यांनी पूजासोबतचा खास संवादही सांगितला.

  • By अमृता यादव
Updated On: Jul 09, 2026 | 12:05 PM
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

दरवर्षी आषाढी वारीत लाखो वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी पायी पंढरपूरकडे प्रस्थान करतात. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून दिंड्या, टाळ-मृदंगाचा गजर आणि हरिनामाच्या जयघोषात वारीची परंपरा जपली जाते. यंदाच्या आषाढी वारीला ७ जुलैपासून सुरुवात झाली असून, संत तुकाराम महाराजांची पालखी देहूहून पंढरपूरकडे मार्गस्थ झाली आहे. ही पालखी २५ जुलै रोजी पंढरपूरमध्ये दाखल होणार आहे. या पवित्र सोहळ्यात सर्वसामान्य वारकऱ्यांसह अनेक मराठी कलाकारही दरवर्षी सहभागी होत असतात.

यंदाही अभिनेते आणि लोकप्रिय सूत्रसंचालक आदेश बांदेकर यांनी कुटुंबासह पंढरीच्या वारीला प्रस्थान केले आहे. त्यांच्या सोबत मुलगा सोहम बांदेकर आणि नुकतीच कुटुंबात आलेली सुन पूजा बिरारी देखील वारीत सहभागी झाली आहे. वारीला रवाना होण्यापूर्वीचा एक खास व्हिडिओ आदेश बांदेकर यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनेलवर पोस्ट केला आहे.त्यामध्ये कुटुंबातील भक्तिभाव आणि आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.

हा खास व्हिडिओ त्यांनी युट्यूब चॅनेलवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये घरातून निघतानाचा प्रवास दाखवण्यात आला आहे. या प्रवासात त्यांच्यासोबत मुलगा सोहम, सूनबाई पूजा बिरारी हे तिघंही वारीत सहभागी होण्यासाठी निघाले आहेत. व्हिडिओमध्ये आदेश बांदेकर वारीच्या प्रवासाबद्दल सांगताना म्हणतात, “आता आम्ही देहूला जाणार आहोत आणि तिथून देहू ते पंढरी हा प्रवास सुरू होणार आहे.” त्यांच्या या शब्दांतून विठ्ठलभेटीची ओढ आणि वारीबद्दलचा उत्साह स्पष्टपणे दिसून येतो.

यानंतर त्यांनी सुन पूजा बिरारीचे कौतुक करत एक भावनिक आठवणही सांगितली. ते म्हणाले, “पूजा, गेल्या वर्षी तू पंढरीच्या वारीमध्ये सहभागी झाली होतीस. त्यावेळी खरं तर तू लक्ष्मीच्या पाऊलांनी आमच्या घरात येणार हे जणू काही ठरलं तर मग झालेलंच होतं… फक्त ते घरोघरी पोहोचलं नव्हतं. पण, तू जेव्हा आमच्या कुटुंबात आलीस, तेव्हा आनंदाचं एक नवीन पर्व सुरू झालं.”

 

Ranveer Singh–Arjun Kapoor Dance: अंशुला कपूरच्या रिसेप्शनमध्ये रणवीर-अर्जुनची जुगलबंदी; ‘तूने मारी एंट्रियां’वर केला भन्नाट डान्स

यानंतर पूजा बिरारीनेही वारीचा अनुभव शेअर केला. ती म्हणाली, “गेल्यावर्षी खूपच सुंदर अनुभव आला होता. पांडुरंगाच्या कृपेने यावर्षी सुद्धा मला वारी अनुभवता येईल. पण, काम असल्यामुळे मला प्रत्यक्ष जास्त दिवस सहभागी होता येणार नाही. बाबांच्या युट्यूब चॅनेलवरून मी या वारीचा भाग होणार आहे.”

यानंतर आदेश बांदेकरांनी पूजाला एक खास आणि मजेशीर प्रश्न विचारला. ते म्हणाले, “गेल्यावर्षी संपूर्ण युनिट होतं… पण तू आणि सोहमने तुमच्याबद्दल कोणालाच कळू दिलं नाहीत, हे कसं शक्य झालं?”

‘माझ्या बापाला वाचवायचं आहे…’; वडिलांसाठी ढसाढसा रडला ‘सैराट’चा सल्या, पहाटे ४ वाजता VIDEO पोस्ट; नेमकं काय घडलं?

Web Title: Aadesh bandekar leaves for pandharpur wari with family special video featuring daughter in law pooja birari goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 09, 2026 | 12:05 PM

Topics:  

  • Ashadhi Wari 2026
  • pooja birari
  • soham bandekar

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.