Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Aai Tuljabhavani Serial: ‘आई तुळजाभवानी’मध्ये नवं वळण! बालतुळजा आणि हरीची पहिली भेट; बहीण-भावाच्या नात्याची रंगणार दिव्य लीला

Aai Tuljabhavani Serial: आई तुळजाभवानी’ मालिकेत बालतुळजा आणि हरीची पहिली भेट होणार आहे. बहीण-भावाच्या गोड खोड्या आणि दैवी लीला आगामी भागात पाहायला मिळणार आहेत.

  • By अमृता यादव
Updated On: Aug 25, 2026 | 02:45 PM
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Aai Tuljabhavani Serial: कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘आई तुळजाभवानी’मध्ये आता भक्ती, भावनिक क्षण आणि रंजक घडामोडींचा सुंदर संगम पाहायला मिळणार आहे. ब्रह्मास्त्राच्या संकटापासून रक्षण करण्यासाठी देवी तुळजाने बालिकेचे रूप धारण केले आहे. त्याचवेळी वैकुंठात श्रीहरींच्या आनंदाश्रूतून एका तेजस्वी बाळकाचा जन्म झाला असून, त्याचं नाव ‘हरी’ आहे.

आता नियतीच्या संकेताने बालतुळजा आणि हरी यांची महालात पहिली भेट होणार आहे. त्यामुळे मालिकेच्या आगामी भागांमध्ये बहीण-भावाचं हे दैवी नातं प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

बालतुळजा आणि हरीची गोड खोडी

तुळजा आणि हरी एकत्र आल्यानंतर वाड्यात आनंदाचं वातावरण निर्माण होणार आहे. मात्र, हरीच्या खोडकर लीला बालतुळजेची परीक्षा घेताना दिसतील. दोघांमधील गोड खोड्या, आव्हानं आणि भावंडांमधील नात्याचे खास क्षण आगामी भागांमध्ये पाहायला मिळणार आहेत.

हरी नक्की कोण आहे आणि त्याचा महालात येण्यामागे नेमकं काय कारण आहे, याचा शोध बालतुळजा कसा घेणार, याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.

Himanshi Khurana On Asim Riyaz: धर्मांतराच्या वादावरून असीम-हिमांशी आमनेसामने, ‘CCTV, रेकॉर्डिंग’चा उल्लेख करत अभिनेत्रीचा पलटवार

सखूच्या भक्तीने चेलप्पाचा डाव उधळला

दरम्यान, मालिकेत पाताळदेवीच्या आज्ञेने चेलप्पा आत्याचं रूप घेऊन देवीभक्त सखूला मानसिक त्रास देत आहे. मात्र, बालतुळजेने नागपंचमीची कथा सांगून सखूच्या मनात भक्ती आणि विश्वासाची नवी ज्योत निर्माण केली.

सखूच्या खऱ्या भक्तीने प्रसन्न होऊन नागराजांनी तिला साक्षात दर्शन दिलं. त्यामुळे चेलप्पाची मायावी शक्ती काही काळासाठी क्षीण झाली आहे.

Kangana Ranaut Abhijeet English: १२वी पास कंगना की अमेरिकेतून परतलेला अभिजीत दिपके? कोणाची इंग्रजी भारी? अभिनेत्रीने दिला पुरावा

ब्रह्मास्त्रही बालतुळजेपुढे निष्प्रभ

दुसरीकडे, शुंभाने सोडलेलं ब्रह्मास्त्र बालिकेच्या रूपातील तुळजेवर निष्प्रभ ठरलं आहे. त्यामुळे शुंभाचा डाव फसला. आता तुळजा आणि हरीच्या भेटीमुळे मालिकेच्या कथानकाला नवं वळण मिळणार आहे.

बालतुळजा आणि बाळ हरी यांच्या आगमनाने ‘आई तुळजाभवानी’मध्ये भक्ती आणि मनोरंजनाचा अनोखा संगम पाहायला मिळणार आहे.

Web Title: Aai tuljabhavani serial new twist bal tulja hari first meeting

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 25, 2026 | 02:45 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • Marathi Serial

संबंधित बातम्या

Mohini Serial: ‘मोहिनी’मध्ये रंगणार तलवारबाजीचा थरार; समीर परांजपे आणि अनघा ठाकूरने घेतली विशेष मेहनत
1

Mohini Serial: ‘मोहिनी’मध्ये रंगणार तलवारबाजीचा थरार; समीर परांजपे आणि अनघा ठाकूरने घेतली विशेष मेहनत

Colors Marathi Serial: ‘मी जिंकून घेईन सारं’चे २०० भाग पूर्ण; बर्फावर अनवाणी उभी राहिली जान्हवी तांबट, सांगितला खडतर अनुभव
2

Colors Marathi Serial: ‘मी जिंकून घेईन सारं’चे २०० भाग पूर्ण; बर्फावर अनवाणी उभी राहिली जान्हवी तांबट, सांगितला खडतर अनुभव

Sanai Chaughade: अखेर शरुच्या मनात प्रेमाची चाहूल! जय-रावीची ट्रिप ठरली कारण? मॅकसमोर शरुने दिली प्रेमाची हिंट
3

Sanai Chaughade: अखेर शरुच्या मनात प्रेमाची चाहूल! जय-रावीची ट्रिप ठरली कारण? मॅकसमोर शरुने दिली प्रेमाची हिंट

Veen Doghantali Hi Tutena : समर-स्वानंदीच्या आयुष्यात येणार नवा बहर; फुलणार सुखी संसार, मालिकेत पाहायला मिळणार नवा ट्विस्ट!
4

Veen Doghantali Hi Tutena : समर-स्वानंदीच्या आयुष्यात येणार नवा बहर; फुलणार सुखी संसार, मालिकेत पाहायला मिळणार नवा ट्विस्ट!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.