Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 7 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Colors Marathi Serial: ‘मी जिंकून घेईन सारं’चे २०० भाग पूर्ण; बर्फावर अनवाणी उभी राहिली जान्हवी तांबट, सांगितला खडतर अनुभव

Colors Marathi Serial: ‘मी जिंकून घेईन सारं’ मालिकेने २०० भागांचा टप्पा पूर्ण केला. जान्हवी तांबटने बर्फाच्या लादीवर तासन्‌तास अनवाणी उभं राहून शूट केलेल्या सीनचा खडतर अनुभव सांगितला.

  • By अमृता यादव
Updated On: Oct 07, 2026 | 04:30 PM
(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Colors Marathi Serial: कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘मी जिंकून घेईन सारं’ने नुकताच महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. मालिकेचे २०० भाग पूर्ण झाले असून, या प्रवासात अभिनेत्री जान्हवी तांबटने साकारलेली छवीची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. मालिकेत छवीला सातत्याने वेगवेगळ्या संकटांचा सामना करताना पाहायला मिळतं. मात्र, प्रत्येक संकटावर मात करताना तिला तिच्या जवळच्या व्यक्तींची साथ मिळताना दिसते.

मालिकेतील काही प्रसंग कथानकाच्या दृष्टीने जितके महत्त्वाचे असतात, तितकेच ते कलाकारांसाठी पडद्यामागे आव्हानात्मक असतात. असाच एक सीन नुकताच मालिकेत पाहायला मिळाला. तात्यांकडून छवीची फेक सही घेण्यासाठी तिला चक्क बर्फाच्या लादीवर उभं करण्यात आलं होतं. पडद्यावर हा प्रसंग पाहताना प्रेक्षकांना तो कठीण वाटला असेल; मात्र हा सीन शूट करणं त्याहून अधिक आव्हानात्मक असल्याचं जान्हवी तांबटने सांगितलं.

६ ते ७ तास बर्फावर अनवाणी उभी राहिली जान्हवी

छवीची भूमिका साकारणाऱ्या जान्हवी तांबटने या अनुभवाबद्दल सांगताना शूटिंगदरम्यान आलेल्या अडचणींचा खुलासा केला. ती म्हणाली, “बर्फावर उभं राहून शूटिंग करणं माझ्यासाठी एक अत्यंत कठीण आणि आव्हानात्मक अनुभव होता. आधीपासूनच मनात थोडं दडपण होतं, कारण मला कोणतीही चप्पल न घालता अनवाणी सलग ६ ते ७ तास बर्फावर उभी राहून तो सीन करायचा होता.”

या सीनदरम्यान मध्ये-मध्ये २० मिनिटांची विश्रांती देण्यात आली होती. मात्र, एवढ्या वेळासाठी बर्फावर उभं राहिल्यानंतर मिळणारी ही विश्रांती पुरेशी वाटत नसल्याचंही तिने सांगितलं. विशेष म्हणजे, या सीनमध्ये तिचे हातही बांधलेले होते, त्यामुळे शारीरिक त्रास आणखी वाढला होता.

प्रेक्षकांना खरा त्रास जाणवावा म्हणून सुविधा नाकारल्या

जान्हवीच्या सुरक्षिततेची काळजी घेत प्रॉडक्शन हाऊसने आवश्यक ती व्यवस्था केली होती. तिच्या पायांसाठी सिलिकॉन सोलचीही व्यवस्था करण्यात आली होती. मात्र, या प्रसंगातील थंडी आणि त्रास प्रेक्षकांना खऱ्या अर्थाने जाणवावा, यासाठी जान्हवीने या सुविधांचा आवर्जून वापर केला नाही.

ती म्हणाली, “प्रॉडक्शन हाऊसने पायासाठी सिलिकॉन सोल आणि काळजी घेण्यासाठी सर्व व्यवस्था केली होती. पण प्रेक्षकांना थंडी आणि त्रासाची खरी जाणीव व्हावी म्हणून मी आवर्जून त्या सुविधा वापरल्या नाहीत.”

‘ॲक्शन’ म्हटलं की वेदना आणि भीती विसरून जाते

कलाकार म्हणून कॅमेऱ्यासमोर काम करताना मनाची भूमिका किती महत्त्वाची असते, हेही जान्हवीने सांगितलं. तिच्या मते, कॅमेरासमोर ‘ॲक्शन’ म्हटलं की शारीरिक वेदना किंवा भीती बाजूला पडते आणि कलाकार पूर्णपणे आपल्या भूमिकेत शिरतो.

“जेव्हा कॅमेरासमोर ‘ॲक्शन’ ऐकू येते, तेव्हा शारीरिक वेदना किंवा भीती सगळं काही विसरून आपण पूर्णपणे कामात आणि त्या भूमिकेत झोकून देतो,” असं जान्हवीने म्हटलं.

सहकलाकारांनी प्रयत्न केला अन् काही मिनिटांतच थांबावं लागलं

या सीनच्या शूटिंगदरम्यान सेटवर उपस्थित असलेल्या इतर कलाकारांनीही बर्फावर उभं राहण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना काही मिनिटांतच थांबावं लागलं. त्यानंतर जान्हवी सलग इतका वेळ बर्फावर कशी उभी राहिली, याची त्यांना कल्पना आली.

जान्हवी म्हणाली, “सेटवर जेव्हा इतर सहकलाकारांनी बर्फावर उभी राहण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांना काही मिनिटांतच थांबवावं लागलं. तेव्हा त्यांना समजलं की मी सलग एवढा वेळ तिथे कशी उभी राहिले.”

Vidyadhar Joshi: ‘तेव्हापासूनच गणेशोत्सवाची माती..’; गणेशोत्सवातील बदलांवर विद्याधर जोशींचं परखड भाष्य, राजकारण्यांचा केला उल्लेख

कुटुंबापासून कलाकारांपर्यंत सर्वांनी केलं कौतुक

या कठीण प्रसंगानंतर जान्हवीचं सेटवर भरभरून कौतुक करण्यात आलं. तिच्या आई-वडिलांपासून ते सेटवरील सहकलाकारांपर्यंत सर्वांनी तिचं कौतुक करत टाळ्या वाजवल्या. या कौतुकामुळे तिचा आत्मविश्वास आणखी वाढल्याचं तिने सांगितलं.

“आई-वडिलांपासून ते सेटवरील सर्व कलाकारांपर्यंत सर्वांनी माझी खूप स्तुती केली आणि टाळ्या वाजवून कौतुक केलं,” असं ती म्हणाली.

‘९९ टक्के गेम हा आपल्या माईंडसेटचा असतो’

या संपूर्ण अनुभवातून मिळालेल्या शिकवणीबद्दल बोलताना जान्हवीने सकारात्मक विचारांचं महत्त्व अधोरेखित केलं. “९९ टक्के गेम हा आपल्या माईंडसेटचा असतो. जेव्हा तुम्ही तुमच्या कामावर आणि पॉझिटिव्हिटीवर प्रेम करता, तेव्हा प्रत्येक आव्हान दुय्यम ठरतं,” असं तिने सांगितलं.

बर्फावर अनवाणी उभं राहून केलेल्या या खडतर शूटिंगच्या अनुभवाने आणि त्यानंतर मिळालेल्या कौतुकाने एक कलाकार म्हणून तिचा आत्मविश्वास अधिक दृढ झाला आहे. तसेच अभिनयाप्रती असलेलं तिचं समर्पणही आणखी वाढलं असल्याचं जान्हवीने म्हटलं आहे.

‘मी जिंकून घेईन सारं’चे २०० भाग पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मालिकेतील कलाकार आणि संपूर्ण टीमचा हा प्रवास एका महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचला आहे. छवीसमोर पुढे कोणती आव्हानं येणार आणि ती त्यांचा सामना कशी करणार, याकडे आता प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.

Aarti Solanki On Sai Tamhankar: ‘अभिनयाचा अ ही माहीत नाही तरी सुपरस्टार!’ सई ताम्हणकरसाठी आरती सोलंकीची परखड पोस्ट, नेमकं काय घडल?

Web Title: Colors marathi serial mi jinkun ghein saar 200 episodes jahnavi tambat ay

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 07, 2026 | 04:30 PM

Topics:  

  • Colours Marathi
  • entertainment
  • Marathi Serial

संबंधित बातम्या

Janak Marathi Movie : सत्यासाठी पेटणार स्वाभिमानाची लढाई; ‘जनक’च्या मोशन पोस्टरने वेधलं लक्ष
1

Janak Marathi Movie : सत्यासाठी पेटणार स्वाभिमानाची लढाई; ‘जनक’च्या मोशन पोस्टरने वेधलं लक्ष

Pehla Pyaar Doosri Baar: नवे चेहरे, नवी प्रेमकहाणी अन् लव रंजन; ‘पहला प्यार दूसरी बार’ची रिलीजआधीच चर्चा
2

Pehla Pyaar Doosri Baar: नवे चेहरे, नवी प्रेमकहाणी अन् लव रंजन; ‘पहला प्यार दूसरी बार’ची रिलीजआधीच चर्चा

Sanju Rathod Nakhre Song: ‘नखरे’चा मराठी फ्लेवर अन् ईशा-गुरमीतची एनर्जी; संजू राठोडचं नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला
3

Sanju Rathod Nakhre Song: ‘नखरे’चा मराठी फ्लेवर अन् ईशा-गुरमीतची एनर्जी; संजू राठोडचं नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

Arun Govil Ramayana:  प्रभू रामानंतर आता राजा दशरथ! अरुण गोविल यांचा ‘रामायण’मधील नवा लूक समोर
4

Arun Govil Ramayana: प्रभू रामानंतर आता राजा दशरथ! अरुण गोविल यांचा ‘रामायण’मधील नवा लूक समोर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.