Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sanai Chaughade: अखेर शरुच्या मनात प्रेमाची चाहूल! जय-रावीची ट्रिप ठरली कारण? मॅकसमोर शरुने दिली प्रेमाची हिंट

Sanai Chaughade: झी मराठीवरील ‘सनई चौघडे’ मालिकेत शर्वरी आणि जय खानोलकर यांच्या नात्याला नवं वळण मिळणार आहे. कोकणातील गणपतीच्या प्रवासानंतर जयला शर्वरीबद्दलच्या प्रेमाची जाणीव झाली होती. मात्र शर्वरीला दोघे फक्त चांगले मित्र असल्याचे वाटत होते.

  • By Riddhi Vanne
Updated On: Oct 06, 2026 | 04:15 PM
Sanai Chaughade: अखेर शरुच्या मनात (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Sanai Chaughade: अखेर शरुच्या मनात (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • कोकणातील प्रवासानंतर जयला शर्वरीवरील प्रेमाची जाणीव झाली.
  • जय आणि रावी कामासाठी दुबईला गेल्यानंतर शर्वरीला वाईट वाटते.
  • जयने आपल्याला न सांगता दुबईला गेल्याने शर्वरी नाराज होते.
सध्या मराठी मालिकांमध्ये जोरदार स्पर्धा सुरु आहे. प्रत्येक चॅनल आपली मालिका टॉपला कशी येईल यासाठी प्रयत्न करतंय. यात झी मराठीच्या मालिका नेहमीच पुढे असतात. झी मराठीवरील ‘सनई चौघडे’ ही मालिका तर कमी वेळातच लोकांच्या मनात घर करून गेली आहे. शर्वरी आणि जय खानोलकर या दोघांची जोडी तर प्रेक्षकांना खूप आवडते. दोघांची मस्ती, भांडणं आणि त्यांची मैत्री हे सगळं लोकांना पाहायला मजा येते. आता या मालिकेत एक मोठं वळण येणार आहे.

कोकणात गेला आणि प्रेमात पडला

काही दिवसांपूर्वी गणपतीसाठी परब आणि खानोलकर कुटुंब कोकणात गेलं होतं. तिथे जयला शर्वरीचं एक वेगळंच रूप पाहायला मिळालं. तेव्हापासून त्याला वाटू लागलं की आपण शरूच्या प्रेमात पडतोय. पण शर्वरीला मात्र अजूनही वाटत होतं की आपण फक्त चांगले मित्र आहोत. तिला अजून प्रेमाची जाणीव झाली नव्हती. पण आता गोष्ट बदलणार आहे. आता शर्वरीला पण कळणार आहे की आपल्याला जय आवडू लागला आहे. Sanai Chaughade

जय दुबईला गेला आणि शरूचा चेहरा पडला

झालं असं की कामासाठी जय आणि रावी दुबईला निघाले. वरवर बघता ते दोघं प्रेमाचं नाटक करत आहेत, ते पण शर्वरीनेच त्यांना सांगितलं आहे. तरी पण जय दुबईला जातोय म्हटल्यावर शर्वरीला आतून वाईट वाटलं. एकदा खानोलकर कुटुंब परबांच्या घरी बसलेलं असताना जयची आई अचानक म्हणाली की “तुम्हाला दुबईला जायला उशीर होतोय, आवरा लवकर”. हे ऐकताच शर्वरीचा चेहरा एकदम पडला. जयने आपल्याला काहीच सांगितलं नाही म्हणून तिला खूप वाईट वाटलं. जय पण तिला न सांगता जातोय म्हणून थोडा नाराज होता.

Marathi TV Serial: ‘दीपज्योती’, ‘कमळी’ आणि ‘तारिणी’मध्ये मोठे ट्विस्ट; या आठवड्यात काय घडणार? प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला

मॅकने पकडलं शर्वरीच्या मनातलं

आता एक नवीन प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या प्रोमोमध्ये शर्वरी मॅक सोबत बसलेली असते आणि रागा-रागात ती जय आणि रावीचे फोटो डिलीट करत असते. ते बघून मॅक तिला विचारतो की काय झालं, का डिलीट करते आहेस फोटो? त्यावर शर्वरी म्हणते, “मला न सांगता तो दुबईला कसा गेला?” तिच्या या बोलण्याचा मॅकला शंका येते.

तो थेट तिला विचारतो, “ते तुला का सांगतील? तू त्याच्या प्रेमात पडली आहेस का काय?” मॅकच्या या प्रश्नाने शर्वरी एकदम गोंधळून जाते. तिच्या डोळ्यासमोर जय सोबतचे सगळे चांगले क्षण येऊ लागतात. ती लगेच म्हणते, “मी वेडी आहे का त्याच्या प्रेमात पडायला?” पण लगेच पुढे म्हणते, “पण त्याने मला विसरलेलं मला अजिबात आवडणार नाही.” तिच्या याच वाक्यावरून मॅकला कळतं की शर्वरीच्या मनात जयबद्दल नक्की काही तरी आहे.

Umesh Kamat Priya Bapat Anniversary: उमेश -प्रिया यांच्या लग्नाला १५ वर्षे पूर्ण; रोमँटिक फोटो शेअर करत केलं प्रेम व्यक्त

आता पुढे काय होणार?

मॅक हा शर्वरीचा सगळ्यात जवळचा मित्र आहे. त्यामुळे आता तो या दोघांना एकत्र आणण्यासाठी नक्की मदत करणार असं वाटतंय. प्रेक्षक पण आता आतुरतेने वाट बघत आहेत की कधी एकदा जय आणि शर्वरी एकमेकांना I Love You म्हणतात .हा सगळा धमाका 8 ऑक्टोबरच्या भागात पाहायला मिळणार आहे. त्यामुळे झी मराठीवर सनई चौघडे बघायला विसरू नका. शर्वरीला झालेली प्रेमाची जाणीव आता मालिकेला एका नव्या वळणावर घेऊन जाणार आहे.

Web Title: Sanai chaughade sharvari realizes love for jay dubai trip rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 06, 2026 | 04:15 PM

Topics:  

  • Entertainement News
  • Marathi Serial
  • zee marathi

संबंधित बातम्या

Ishqa Ishqa Trailer:  प्रेम की झपाटलेपण की काळोखी दुनिया! ‘इश्का इश्का’चा थरारक ट्रेलर रिलीज
1

Ishqa Ishqa Trailer: प्रेम की झपाटलेपण की काळोखी दुनिया! ‘इश्का इश्का’चा थरारक ट्रेलर रिलीज

Veen Doghantali Hi Tutena : समर-स्वानंदीच्या आयुष्यात येणार नवा बहर; फुलणार सुखी संसार, मालिकेत पाहायला मिळणार नवा ट्विस्ट!
2

Veen Doghantali Hi Tutena : समर-स्वानंदीच्या आयुष्यात येणार नवा बहर; फुलणार सुखी संसार, मालिकेत पाहायला मिळणार नवा ट्विस्ट!

Aarti Solanki On Balancing Devi: बॅलन्सिंग देवीच्या मूर्तीवर आरती सोळंकीचा संताप; ‘कला’च्या नावाखालील प्रकारावर भडकली
3

Aarti Solanki On Balancing Devi: बॅलन्सिंग देवीच्या मूर्तीवर आरती सोळंकीचा संताप; ‘कला’च्या नावाखालील प्रकारावर भडकली

Star Pravah Serial: प्रेक्षकांच्या लाडक्या मालिकेचा अखेर निरोप; वकिलाची भूमिका साकारताना अभिनेत्याला मिळाला खास अनुभव
4

Star Pravah Serial: प्रेक्षकांच्या लाडक्या मालिकेचा अखेर निरोप; वकिलाची भूमिका साकारताना अभिनेत्याला मिळाला खास अनुभव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.