Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Exclusive: ‘आई तुळजाभवानी’च्या अलौकिक विवाहाचा हा अनुभव खूपच अद्भुत – पूजा काळे

महादेव आणि तुळजाभवानीच्या अलौकिक विवाहाचा अद्भुत महिना आता प्रेक्षकांसमोर येत आहे. याच निमित्ताने तुळजाभवानीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री पूजा काळेने तिचा अनुभव सांगितला आहे

  • By दिपाली नाफडे
Updated On: Apr 29, 2026 | 11:49 AM
पूजा काळेने शेअर केला खास अनुभव

पूजा काळेने शेअर केला खास अनुभव

Follow Us
Close
Follow Us:

आई तुळजाभवानी या मालिकेत सध्या २० एप्रिलपासून संपूर्ण महिनाभर एक अद्भुत आजवर कधीही न पाहिलेला अलौकिक विवाहसोहळा प्रेक्षकांना अनुभवता येतोय. या अलौकिक विवाहादरम्यान पंचदेवींतर्फे ओवाळणी, मायेचे केळवण, सौभाग्याचा चुडा, पंचमहाभूतांतर्फे  देवक, प्रकाश-ऊर्जेचा दैवी मांडव, शक्तिरूपाची तेजस्वी हळद, महादेवांचे अद्भुत वऱ्हाड आणि अलौकिक लग्न विधी रंगणार आहेत आणि प्रेक्षकांमध्ये जितकी उत्सुकता आहे तितकीच उत्सुकता आणि भावूकपणा हा तुळजाभवानीची भूमिका साकारणाऱ्या पूजामध्ये आहे. पूजाने तिच्या मनातील गोष्टी नवराष्ट्रसह खास शेअर केल्या. 

हा विवाहसोहळा शूट करतानाचा तुझा अनुभव कसा आहे? असं विचारल्यावर पूजा म्हणाली की, ‘मी खूपच उत्साही आहे आणि आता या विवाहाच्या निमित्ताने माझे वेगवेगळे लुक्स समोर येणार आहेत आणि ते प्रेक्षकांना खूपच आवडतील. कारण या विधींमध्ये माझ्यासोबत असणाऱ्या सर्व देवी सहभागी होणार आहेत आणि मुळात माणसांचे विवाह आपण पाहतो पण देवाचा विवाह कसा असू शकतो याची केवळ कल्पनाच नाही तर तो अनुभव घेताना खूपच भारी वाटत आहे.’

‘तुळजाभवानीचा आशिर्वाद म्हणूनच ही भूमिका मिळाली’, देवीच्या भक्तीत लीन पूजा काळे

असुरी शक्तींचा नाश आणि महिषासुराचा नायनाट या एकमेव ध्येयाने प्रेरित आई तुळजाभवानीच्या आयुष्यातले हे नाजूक भावनिक क्षण आणि महादेवांशी असलेला तिचा हळवा बंध कसे उलगडत जातात, तुळजाभवानी या लग्नाला कशी तयार होते हे दाखविण्यात आलं आहे तर या सीन्सची तयारी कशी केलीस? यावर पूजा पटकन म्हणाली की, ‘प्रत्येक मुलीची लग्नाची हौसमौज असते आणि यामध्ये मला ज्या पद्धतीने सजविण्यात येत आहे आणि सेटवर असणारी धामधूम पाहून असं वाटतंय की माझीच लग्नघटिका समीप आली आहे. सध्या प्रोमो आलाय आणि आता वेगवेगळे पुढील विधी शूट होतील पण एक वेगळीच भावना मनात आहे. असं वाटतंय की, अगदी खरंच माझं लग्न होतंय. पण हे विधी पहायला प्रेक्षकांना नक्कीच आवडेल’

स्वप्नील राजशेखर, सोनाली पाटील यांंसारख्या मोठ्या सहकलाकारांबरोबर काम करताना तुझा अनुभव शेअर करशील का? यावर पूजा अगदी भारावून म्हणाली की, ‘मालिकेत इतक्या गोष्टी घडतात आणि खूप मोठे कलाकार काम करतात आणि माझ्या पहिल्याच मालिकेत मला हा अनुभव मिळतोय हे मला शब्दात मांडताही येणार नाही. प्रत्येकाकडून मी काही ना काही वेगळं शिकत आहे. त्यांच्याकडून शिकून घेत मी माझ्याकडून त्यात काही अधिक देता येतं का हेच पाहते आणि त्यामुळे काम अधिक चांगलं होतं. मी स्वतःला फार नशीबवान समजते की मला हे सर्व पहिल्याच मालिकेमधून मिळतंय. आई तुळजाभवानीचाच आशीर्वाद आहे.’

Tuljapur Devi: काय आहे तुळजापूरच्या तुळजाभवानीचा महिमा, तुळजापूरच्या देवीची अद्भुत कथा जाणून घ्या

प्रेक्षकांसह तुझा एखादा किस्सा सांगशील का? यावर पूजा म्हणाली, ‘सतत काही ना काही होतच असतं आणि मी खूपच भारावून जाते. कारण काही प्रेक्षक इतके साधेभोळे आहेत की, ते मला पाहिल्यावर मीच तुळजाभवानी आहे समजून पाया पडतात. त्यांच्या साधेपणामुळे आणि माझ्यावर जीव लावल्याने मला फारच वेगळं वाटतं, अनेक कार्यक्रमांमध्ये तर माझ्या कामाबाबत आवर्जून प्रेक्षक बोलतात आणि मी खरंच ऋणी आहे की त्यांना माझं काम आवडतंय. प्रेक्षकांच्या प्रेमामुळेच मी इथपर्यंत पोहचले आहे.’ सध्या ही मालिका प्रेक्षकांना खूपच आवडत आहे आणि संंपूर्ण महिनाभर प्रेक्षकांना आई तुळजाभवानीच्या विवाहसोहळ्याचा अनुभव घेता येणार आहे हे मात्र नक्की! 

Web Title: Actress pooja kale shared experience about aai tuljabhavani wedding rituals shooting exclusively

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 29, 2026 | 11:49 AM

Topics:  

  • colors marathi
  • marathi serial news

संबंधित बातम्या

Marathi Serial: ‘मी जिंकून घेईन सारं’ वेगळ्याच वळणावर, छवीसमोर उभं ठाकणार ‘शांभवी’ नावाचं मोठं आव्हान!
1

Marathi Serial: ‘मी जिंकून घेईन सारं’ वेगळ्याच वळणावर, छवीसमोर उभं ठाकणार ‘शांभवी’ नावाचं मोठं आव्हान!

भक्ताला करायचंय विठूरायाशी लग्न, स्वामी कसं करतील पूर्ण? ‘जय जय स्वामी समर्थ’ मालिकेत इंट्रस्टिंग वळण
2

भक्ताला करायचंय विठूरायाशी लग्न, स्वामी कसं करतील पूर्ण? ‘जय जय स्वामी समर्थ’ मालिकेत इंट्रस्टिंग वळण

पहिल्यांदाच रोमँटिक भूमिकेत झळकणार स्नेहल शिदम, ‘इन्स्पेक्टर मंजू’च्या नव्या प्रोमोला प्रेक्षकांची पसंती; कथेत नवा ट्विस्ट
3

पहिल्यांदाच रोमँटिक भूमिकेत झळकणार स्नेहल शिदम, ‘इन्स्पेक्टर मंजू’च्या नव्या प्रोमोला प्रेक्षकांची पसंती; कथेत नवा ट्विस्ट

‘इन्स्पेक्टर मंजू’मध्ये स्नेहल शिदमची दमदार एन्ट्री, रोमँटिक सणवारमध्ये सत्या-मंजू आणि धैर्य-सावीच्या प्रेमकहाणीला नवे वळण
4

‘इन्स्पेक्टर मंजू’मध्ये स्नेहल शिदमची दमदार एन्ट्री, रोमँटिक सणवारमध्ये सत्या-मंजू आणि धैर्य-सावीच्या प्रेमकहाणीला नवे वळण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.