Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 31 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mi Jinkun Ghein Saara: छवीच्या आयुष्याला मिळणार नवी दिशा; ‘मी जिंकून घेईन सारं’मध्ये सुयश टिळकची दमदार भूमिका

Mi Jinkun Ghein Saara: कलर्स मराठीवरील ‘मी जिंकून घेईन सारं’ या मालिकेत लोकप्रिय अभिनेता सुयश टिळकची एन्ट्री होणार आहे. तो मालिकेत ललित मोकाशी या हुशार आणि गूढ स्वभावाच्या वकिलाची भूमिका साकारणार आहे. त्याच्या येण्याने छवीच्या आयुष्यात कोणते बदल घडणार, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Oct 31, 2026 | 06:48 PM
छवीच्या आयुष्याला मिळणार नवी दिशा; ‘मी जिंकून घेईन सारं’मध्ये सुयश टिळकची दमदार भूमिका

छवीच्या आयुष्याला मिळणार नवी दिशा; ‘मी जिंकून घेईन सारं’मध्ये सुयश टिळकची दमदार भूमिका

Follow Us
Follow Us:
  • ‘मी जिंकून घेईन सारं’ मालिकेत सुयश टिळकची एन्ट्री
  • साकारणार वकील ललित मोकाशी
  • छवीच्या आयुष्याला मिळणार नवी दिशा
Mi Jinkun Ghein Saara: कलर्स मराठीवरील ‘मी जिंकून घेईन सारं’ या मालिकेत आता लोकप्रिय अभिनेता सुयश टिळकची एन्ट्री होणार आहे. या मालिकेत सुयश टिळक ललित मोकाशी या वकिलाच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हुशार, आत्मविश्वासू, मिश्किल आणि काहीसा अहंकारी असलेला ललित आपल्या वेगळ्या स्वभावामुळे मालिकेच्या कथानकात नवे वळण आणणार आहे.(Mi Jinkun Ghein Saara)

ललित हा केवळ कायद्याची जाण असलेला वकील नाही, तर माणसांना बारकाईने न्याहाळणारा आणि त्यांच्या स्वभावाचा अचूक अंदाज घेणारा व्यक्ती आहे. त्याच्या बोलण्यातला उपरोध, विनोदाची अनोखी शैली आणि समोरच्या व्यक्तीची बुद्धिमत्ता तपासण्याची वृत्ती त्याला इतरांपेक्षा वेगळे ठरवते. वरकरणी कडक आणि बेफिकीर वाटणारा ललित न्यायासाठी ठामपणे उभा राहतो. शिकवण्यापेक्षा प्रश्न विचारून समोरच्याला विचार करायला भाग पाडणे, ही त्याची खासियत आहे.

Bandhu Marathi Movie: प्रेम, जिव्हाळा आणि त्यागाची कहाणी; ‘बंधू’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर प्रदर्शित

छवीच्या आयुष्यात कोणते बदल होणार?

छवी ललितकडून काही गोष्टी शिकण्याचा निर्णय घेते. त्यामुळे या दोघांची भेट आणि त्यांच्यातील संवाद मालिकेच्या कथानकाला नवी दिशा देणार आहेत. ललितच्या मार्गदर्शनातून छवीला काय शिकायला मिळणार, त्याच्या गूढ व्यक्तिमत्त्वाचे कोणते पैलू समोर येणार, याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे.

व्यक्तिरेखेला माणूस म्हणून समजून घेण्याचा प्रयत्न

आपल्या भूमिकेबद्दल बोलताना सुयश टिळक म्हणाला की, कलर्स मराठीसोबत पुन्हा काम करण्याची संधी मिळाल्याचा आनंद आहे. ललित मोकाशी ही गूढ व्यक्तिरेखा असून प्रत्येकाला ती आपापल्या दृष्टिकोनातून वेगळी वाटू शकते. प्रत्येक व्यक्तिरेखेत काहीतरी नवीन शोधणे आपल्यासाठी महत्त्वाचे असल्याचे त्याने सांगितले.

एखादी भूमिका साकारताना केवळ त्या व्यक्तीचा व्यवसाय समजून घेणे पुरेसे नसते, तर त्याची विचार करण्याची पद्धत, दृष्टिकोन आणि इतरांशी असलेले नाते समजून घेणेही महत्त्वाचे असते, असे सुयशने स्पष्ट केले. ललित वकील असल्यामुळे त्याचे निरीक्षण, विचार करण्याची पद्धत आणि वेगवेगळ्या परिस्थितींकडे पाहण्याचा दृष्टिकोन समजून घेण्याचा प्रयत्न केल्याचेही त्याने सांगितले.

रंगीबेरंगी चष्म्यांच्या फ्रेम्समागे काय रहस्य?

सुयशने आपल्या मुलाखतीत चष्म्याच्या रंगीबेरंगी फ्रेम्सचाही उल्लेख केला. रंगांचा व्यक्तिमत्त्व, मनःस्थिती आणि एखाद्या गोष्टीकडे पाहण्याच्या दृष्टिकोनावर परिणाम होत असतो. त्यामुळे चष्म्याच्या फ्रेम्सच्या माध्यमातून व्यक्तिरेखेचे आणि तिच्या विचारविश्वाचे वेगवेगळे पैलू मांडण्याचा प्रयत्न मनोरंजक ठरू शकतो, असे तो म्हणाला. मात्र, या रंगांमागचा नेमका विचार आणि मालिकेच्या कथेशी त्यांचा काय संबंध आहे, हे प्रेक्षकांना मालिका पाहताना समजेल.

ललितच्या येण्याने छवीच्या आयुष्यात काय बदल घडणार आणि त्याच्या गूढ व्यक्तिमत्त्वाचे कोणते नवे पैलू उलगडणार, हे पाहणे रंजक ठरणार आहे. ‘मी जिंकून घेईन सारं’ ही मालिका दररोज संध्याकाळी ७ वाजता कलर्स मराठीवर पाहता येणार असून, आवडत्या मालिकांचा आनंद JioHotstar वरही घेता येईल.

‘पंजाबी लोकांना लढायला शिकवू नका’; CJP आंदोलनावरून दिलजीत दोसांझ चर्चेत! समाजाबद्दलच्या वक्तव्यावर अभिजीत दिपके काय म्हणाले?

💡

Frequently Asked Questions

  • Que: ‘मी जिंकून घेईन सारं’ मालिकेत कोणत्या अभिनेत्याची एन्ट्री होणार आहे?

    Ans: या मालिकेत लोकप्रिय अभिनेता सुयश टिळक याची एन्ट्री होणार आहे.

  • Que: सुयश टिळक मालिकेत कोणती भूमिका साकारणार आहे?

    Ans: सुयश टिळक ललित मोकाशी या हुशार, आत्मविश्वासू आणि काहीशा अहंकारी वकिलाची भूमिका साकारणार आहे.

  • Que: ‘मी जिंकून घेईन सारं’ ही मालिका कुठे आणि किती वाजता पाहता येईल?

    Ans: ही मालिका दररोज संध्याकाळी ७ वाजता कलर्स मराठीवर पाहता येईल. तसेच JioHotstar वरही ती उपलब्ध आहे.

Web Title: Suyash tilak entry mi jinkun ghein saaran colors marathi sz

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 31, 2026 | 06:48 PM

Topics:  

  • colors marathi
  • Marathi Serial

संबंधित बातम्या

Veen Doghatli Hi Tutena: स्वानंदी आणि समर आई-बाबा होणार? ‘वीण दोघांतली ही तुटेना’ मालिकेत मोठा ट्विस्ट; पाहा नवा प्रोमो!
1

Veen Doghatli Hi Tutena: स्वानंदी आणि समर आई-बाबा होणार? ‘वीण दोघांतली ही तुटेना’ मालिकेत मोठा ट्विस्ट; पाहा नवा प्रोमो!

Raj Hanchanale: कन्यारत्न! ‘सनई चौघडे’ फेम अभिनेता राज हंचनाळे झाला बाबा; पत्नीच्या वेदना पाहून म्हणाला, ‘तिच्या जागी मी…’
2

Raj Hanchanale: कन्यारत्न! ‘सनई चौघडे’ फेम अभिनेता राज हंचनाळे झाला बाबा; पत्नीच्या वेदना पाहून म्हणाला, ‘तिच्या जागी मी…’

Zee Marathi Serials: कुठे प्रेम, कुठे रहस्यांचा उलगडा; झी मराठीच्या मालिकांमध्ये रंगणार नाट्यमय घडामोडी!
3

Zee Marathi Serials: कुठे प्रेम, कुठे रहस्यांचा उलगडा; झी मराठीच्या मालिकांमध्ये रंगणार नाट्यमय घडामोडी!

Kamli ZEE Marathi Serial: अखेर कमळी आणि अन्नपूर्णा आजी येणार आमनेसामने! मालिकेत रंगणार नवा अध्याय
4

Kamli ZEE Marathi Serial: अखेर कमळी आणि अन्नपूर्णा आजी येणार आमनेसामने! मालिकेत रंगणार नवा अध्याय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.