Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘अनुपमा’मध्ये नवा ट्विस्ट; गोव्यात रुपाली गांगुलीची नवी सुरुवात; कॅफेच्या स्वप्नातून उभी करणार नवी ओळख

स्टार प्लसवरील लोकप्रिय मालिका ‘अनुपमा’ सध्या चर्चेत आहे. ‘अनुपमा’ आता लवकरच नव्या आयुष्याला सुरुवात करणार आहे, आणि स्वतःची नवी ओळख मिळणार आहे. मालिकेमधील हा ट्विस्ट काय आहे जाणून घेऊयात.

  • By सायली ससाणे
Updated On: Mar 26, 2026 | 02:41 PM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • ‘अनुपमा’ मालिकेमध्ये नवा ट्विस्ट
  • गोव्यात रुपाली गांगुलीची नवी सुरुवात
  • कॅफेच्या स्वप्नातून उभी करणार नवी ओळख
 

मालिका विश्वातील प्रसिद्ध चॅनल स्टार प्लसवरील लोकप्रिय मालिका ‘अनुपमा’ सध्या एका महत्त्वाच्या टप्प्यावर येऊन पोहोचली आहे. नेहमीप्रमाणेच नव्या ट्विस्ट्स आणि रंजक कथानकामुळे ही मालिका प्रेक्षकांना खिळवून ठेवत असून आता कथेत आणखी एक मोठं वळण पाहायला मिळणार आहे.

अनुपमा ही व्यक्तिरेखा सुरुवातीपासूनच तिच्या आयुष्यातील अनेक संकटांना सामोरे जात स्वतःची ओळख शोधण्याचा प्रयत्न करताना दिसली आहे. प्रत्येक अडचणीतून उभं राहत पुढे जाण्याची तिची जिद्द हीच या मालिकेची खासियत ठरली आहे. आता कथानकात लीपनंतर अनुपमा एका नव्या शहरात गोव्यात नव्यानं आयुष्य सुरू करताना दिसणार आहे.

किंग खानही पडेल फिका; ‘ठरलं तर मग’ मालिकेतील पुरुष कलाकरांनी तरुणींना लावले वेड, Dance असावा तर असा

या नव्या टप्प्याबद्दल बोलताना अभिनेत्री रुपाली गांगुली यांनी सांगितले की, “लीपनंतर अनुपमाच्या आयुष्यात मोठा बदल झाला आहे. ती आता पूर्णपणे नव्या वातावरणात स्वतःला सावरत आहे. जगणं आणि पुढे जाणं हेच तिच्यासाठी महत्त्वाचं आहे. त्यामुळे ती हॉटेलमध्ये काम करण्यापासून ते साफसफाईपर्यंत कोणतंही काम करण्यास मागे हटत नाही. इतकं सगळं सहन करूनही ती आशा सोडत नाही, हेच तिच्या व्यक्तिरेखेचं बळ आहे.”

पुढे त्या म्हणाल्या, “प्रेक्षकांना अनुपमाच्या संघर्षाची, तिच्या एकटेपणाची आणि तिच्या शांत ताकदीची झलक या टप्प्यात पाहायला मिळेल. ‘अनु की रसोई’सारख्या उपक्रमातून स्वतःची ओळख निर्माण करणारी अनुपमा आता गोव्यात कॅफे सुरू करण्याच्या स्वप्नातून पुन्हा एकदा नव्या उद्देशाच्या शोधात आहे.” या भूमिकेबद्दल बोलताना रुपाली म्हणाल्या की, “एक कलाकार म्हणून अनुपमाच्या या नाजूक पण आशावादी प्रवासाला साकार करणं माझ्यासाठी खूप खास आहे. प्रेक्षकांनी तिच्या या प्रवासात साथ द्यावी, हीच अपेक्षा आहे.” असे अभिनेत्रीचे म्हणणे आहे.

‘सालबर्डी’तील ‘मंजुळा’ गाण्यात सोनाली कुलकर्णीचा हटके अंदाज; जाणून घ्या कधी होणार प्रदर्शित?

दरम्यान, गोव्यात नव्याने आयुष्य उभारताना अनुपमा तिच्या संघर्षांवर कशी मात करणार, तिचं कॅफे सुरू करण्याचं स्वप्न पूर्ण होणार का? आणि तिच्या आयुष्यात आणखी कोणते ट्विस्ट येणार? याकडे आता प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे. ‘अनुपमा’चा हा नवा अध्याय प्रेक्षकांसाठी अधिक भावनिक, प्रेरणादायी आणि रंजक ठरणार आहे.

Web Title: Anupama will once again fulfill her dream of opening a restaurant in goa

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 26, 2026 | 02:41 PM

Topics:  

  • entertainment
  • Indian Television

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.