सोशल मीडियावर कोणती गोष्ट कशी व्हायरल होईल काही सांगता येत नाही . शाहरुख खानचा येस बॉस हा सिनेमा येऊन 28 वर्ष उलटून गेली मात्र तरी देखील अगर तुम कहो हे गाणं आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. याच गाण्यावर ठरलं तर मग मालिकेतील अर्जुन, सचिन , अश्विन आणि प्रताप सुभेदार यांची पावलं थिरकली आहे. मालिकेतील अर्जुन व्यक्तिरेखा साकारणारा अभिनेचा अमित भानुशालीने या गाण्यावर रिल शेअर केला आहे.
मालिकेतील कलाकार शुटींग दरम्यानच्या मोकळ्या वेळेत काही ना रिल्स बनवता चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. या भन्नाट रिलना नेटकऱ्यांनी चांगलंच डोक्यावर घेतलं. पारंपरिक लुकमधल्या या डान्सने चाहत्यांना वेड लावलं. ठरलं तर मग मालिकेबाबत सांगायच तर टीआरपीच्या शर्यतीत ही मालिका कायमच अग्रेसर राहिली आहे. मालिका प्रसारित झाल्यापासून ते आतापर्यंत या मालिकेने प्रेक्षकांनी मनं जिंकून घेतली.
मालिकेबाबत सांगायचं तर अस्मिताला सचिनचं सत्य कळतं आणि आता पुन्हा एकदा अस्मिता प्रियाच्या जाळ्यात अडकत जात असल्याचं दिसत आहे. तर दुसरीकडे सायली आणि अर्जुन खऱ्या तन्वीचा शोध घेत असतानाच प्रिया तन्वी किल्लेदार नसून बबली लोखंडे असल्याचे पुरावे गोळा करत आहेत. आता सगळं प्रकरण काय वळण घेतंय, प्रियाचं सत्य सगळ्यांना कळेल का ? तसंच सायली हीच खरी तन्वी किल्लेदार आहे याचा शोध लागल्यावर काय होणार याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. आता मलिका काय नवं वळण घेतेय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. जसजसा आता प्रिया तन्वी नसल्याच्या सत्यापर्यंत सायली अर्जुन जात आहेत त्यामुळे प्रत्येक आठवड्याच्या टीआरपीमध्ये मालिकेला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.






