(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
बिग बॉस मराठीचा सीझन ६ शेवटच्या टप्प्यात आला आहे. सहाव्या सीझनमध्ये सध्या सतत भांडण, राडे पाहायला मिळत आहेत. याच आठवड्यात राकेश आणि विशालमध्ये मोठे भांडण झाल्याचे पाहायला मिळाले. या दोघांचे भांडण इतके वाढले की हे दोघेही एकमेकांच्या अंगावर धावून गेले होते. यानंतर बिग बॉसने या दोघांनाही शिक्षाही सुनावली. या दोघांमध्ये कोण बरोबर आहे यावर प्रेक्षकांनी त्यांची मते मांडली होती. या सगळ्यात नुकताच कलर्स मराठीने एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोत दिसत आहे की घरात आणखी एक मोठे भांडण होणार आहे. यात राखी सावंत आणि राकेश बापटचे कडाक्याचे भांडण होत असल्याचे दिसत आहे.
या प्रोमोच्या सुरूवातीला पाहायला मिळत आहे की राकेश मोठ्याने ओरडतो. फालतुगिरी आहे. असेही म्हणताना दिसतो. यावेळी राखीला तन्वीला म्हणते, ” यांनी मला जबरदस्ती आणलं.” त्यावर राकेश बापट म्हणतो, ” तू बाळ आहेस का, जबरदस्तीने आणायला.”
प्रोमोमध्ये दिसतं की, वादाच्या भरात राकेश राखीला “मूर्ख बाई” असे म्हणतो. त्यावर राखीही शांत न राहता त्याला “बधिर” असे प्रत्युत्तर देते. यानंतर राकेश “हे सगळं तुझं नाटक आहे” असे म्हणत तिथून निघून जाण्याचा प्रयत्न करतो.
मात्र, त्याच वेळी राखी “मुलींना हत्यार बनवतोस” अशी टीका करताच राकेशचा संताप अनावर होतो. त्यानंतर दोघांमध्ये पुन्हा एकदा जोरदार भांडण पेटताना दिसते. एवढंच नाही, तर राकेश “तुझ्या जिभेला हाड नाही का गं?” असेही संतापून म्हणताना ऐकायला मिळते.
या सगळ्या प्रकारामुळे घरातील वातावरण पूर्णपणे तापले असून, इतर सदस्यही या वादामुळे हादरलेले दिसत आहेत. आता या भांडणाचा पुढे काय परिणाम होणार, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.
Nawazuddin Siddiqui यांच्या ‘मैं एक्टर नहीं हूं’चा टीझर रिलीज; चित्रपट ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित
या प्रोमोवर प्रेक्षकांनी कमेंट्स केल्या आहेत. ” सगळेजण मिळून राकेशला टार्गेट करत आहेत, राखीला बाहरे काढा. हिचं असंच असतं. ” मग आता बिग बॉस राकेशला बाहेर काढणार का?” तर एकाने लिहिले राखी अती करते,” ” राकेशला सगळे टार्गेट करू नका. तो म्हणेल मला बाहेर काढा. कारण तो एक चांगला माणूस आहे.” अशा अनेक कमेंट्स नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.






