(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
बॉलिवूड अभिनेता नवाझुद्दीन सिद्दिकी त्याच्या आगामी ‘मैं अॅक्टर नहीं हूँ’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. नवाझुद्दीन सिद्दिकीसोबत चित्रांगदा सतरूपा देखील या चित्रपटात आहे. टीझर पाहता, हा चित्रपट कमी आणि माहितीपट जास्त वाटतो.
निर्माता आदित्य कृपलानी यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनलवर चित्रपटाचा टीझर प्रदर्शित केला आणि इन्स्टाग्रामवरही एक पोस्ट शेअर केली. त्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “तुम्ही कधी अभिनेता बनण्याचे स्वप्न पाहिले आहे का? ‘मैं ॲक्टर नही हूँ’ या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे.” नवाझुद्दीन सिद्दिकी आणि चित्रांगदा सतरूपा यांनी यात मुख्य भूमिका साकारल्या आहेत. हा चित्रपट एका बँक कर्मचाऱ्याची कथा सांगतो, जो भारत आणि जर्मनी या दोन देशांमध्ये राहून एका अभिनेत्याकडून अभिनय शिकतो. या टीझरचे संपादन हृषिकेश पेटवे यांनी केले आहे.
चित्रपटाच्या टीझरसोबतच त्याच्या प्रदर्शनाच्या तारखेची माहितीही देण्यात आली आहे. ‘मैं ॲक्टर नही हूँ’ हा चित्रपट ८ मे २०२६ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत आहे. टीझरमध्ये नवाझुद्दीन चिंतेवरील उपचारांसाठी एका मानसशास्त्रज्ञाला भेट देताना दिसत आहे. तिथे त्याला अभिनयाची आवड असल्याचे लक्षात येते. त्याचे प्रशिक्षण सुरू होते.
चित्रपटाच्या टीझरवर नेटकऱ्यांकडून कमेंट्स पाऊस पडत आहे. नेटकऱ्यांना पार्श्वसंगीत आणि शूटिंगची जागा खूप आवडत आहे. एका वापरकर्त्याने लिहिले, “या चित्रपटासाठी उत्सुक आहे. याची आतुरतेने वाट पाहत आहे.” दुसऱ्या एका वापरकर्त्याने लिहिले, “व्वा, हे अप्रतिम दिसत आहे. यासाठी उत्सुक आहे.” या चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्य कृपलानी यांनी केले आहे.






