Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dhaktya Sunbai Serial: गणेश गल्लीच्या मुंबईच्या राजाच्या चरणी ‘धाकट्या सुनबाई’चा शुभारंभ; २८ सप्टेंबरपासून मालिका

Dhaktya Sunbai Serial: झी मराठीवरील ‘धाकट्या सुनबाई’ मालिकेचा शुभारंभ गणेश गल्लीच्या मुंबईच्या राजाच्या चरणी करण्यात आला. चिन्मयी मोरे आणि मंदार जाधव मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

  • By अमृता यादव
Updated On: Sep 25, 2026 | 08:20 AM
(फोटो सौजन्य-सोशल मिडिया)

(फोटो सौजन्य-सोशल मिडिया)

Follow Us
Follow Us:

Dhaktya Sunbai Serial: गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने सुरू होणारी प्रत्येक नवी सुरुवात खास मानली जाते. याच भावनेतून झी मराठीवरील आगामी ‘धाकट्या सुनबाई’ या मालिकेचा शुभारंभ पारंपरिक प्रेस मीटऐवजी थेट गणरायाच्या चरणी करण्यात आला. गणेशोत्सवाच्या मंगलमय वातावरणात मुंबईतील प्रसिद्ध गणेश गल्लीच्या मुंबईच्या राजा गणपतीसमोर मालिकेची खास प्रेस मीट आयोजित करण्यात आली होती.

या वेळी मालिकेचे निर्माते महेश कोठारे, तसेच कलाकार मंदार जाधव, चिन्मयी मोरे आणि मुग्धा कर्णिक यांच्यासह मालिकेची संपूर्ण टीम उपस्थित होती. गणरायाचे दर्शन घेत मालिकेच्या नव्या प्रवासाला सुरुवात करण्यात आली.

राधिका आणि वेदांतची कहाणी

‘धाकट्या सुनबाई’ मालिकेत मंदार जाधव वेदांत पटवर्धन ही भूमिका साकारत आहे. वेदांत हा कुटुंबावर प्रेम करणारा, प्रत्येकाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणारा आणि अन्यायाविरोधात आवाज उठवणारा तरुण असल्याचे मालिकेत दाखवण्यात येणार आहे.

तर अभिनेत्री चिन्मयी मोरे राधिका या भूमिकेतून पहिल्यांदाच दैनंदिन मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मालिकेत दोन कुटुंबांची गोष्ट, त्यांचे वेगवेगळे विचार आणि नात्यांमधील गुंतागुंत पाहायला मिळणार आहे. आपल्या माणसांची साथ आणि नात्यांमधील विश्वास आयुष्याला कसा अर्थ देतो, हे राधिका आणि वेदांतच्या आयुष्यातून उलगडणार आहे.

“मुंबईच्या राजाच्या चरणी सुरुवात होतेय, यापेक्षा सुंदर काय असू शकतं?”

‘धाकट्या सुनबाई’च्या माध्यमातून पहिल्यांदाच दैनंदिन मालिकेत पदार्पण करणाऱ्या चिन्मयी मोरेने या नव्या प्रवासाबद्दल आनंद व्यक्त केला. ती म्हणाली, “माझ्यासाठी हा प्रवास खूप खास आहे आणि या सगळ्याची सुरुवात मुंबईच्या राजाच्या चरणी होत आहे, यापेक्षा सुंदर आणखी काय असू शकतं!”

पुढे ती म्हणाली की, पहिल्या मालिकेसाठी झी मराठीसारखं व्यासपीठ आणि महेश कोठारे यांच्या कोठारे व्हिजनसारखं प्रोडक्शन हाऊस मिळाल्याने ती आनंदी आहे. तसेच सहकलाकार आणि मालिकेच्या टीमसोबत काम करण्याबद्दलही तिने उत्साह व्यक्त केला.

“या सगळ्यासाठी मी बाप्पाचे मनापासून आभार मानते आणि ‘धाकट्या सुनबाई’ला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळावं, अशी बाप्पाकडे प्रार्थना करते,” असं चिन्मयीने म्हटलं.

Onkar Bhojane On Milind Kawde: ‘नक्कीच उत्तर देईन’; ‘अफरातफरी’च्या प्रमोशनवरून वाद, मिलिंद कवडेंच्या आरोपांवर ओंकार भोजनेचं उत्तर

“२८ सप्टेंबरची आतुरतेने वाट पाहतोय”

मंदार जाधवनेही मालिकेच्या या खास शुभारंभाबद्दल आनंद व्यक्त केला. तो म्हणाला, “‘धाकट्या सुनबाई’च्या प्रेस मीटची सुरुवात मुंबईच्या राजाच्या आशीर्वादाने होत आहे, यासाठी मी खूप आनंदी आणि स्वतःला खूप भाग्यवान समजतो.”

गणेशोत्सवासारख्या मंगलमय वातावरणात मालिकेचा प्रेस लॉन्च होणं ही टीमसाठी मोठी गोष्ट असल्याचेही त्याने सांगितले. यावेळी प्रेक्षकांना प्रत्यक्ष भेटून मालिकेबद्दल सांगता आल्याचा आनंदही त्याने व्यक्त केला.

मंदार पुढे म्हणाला, “बाप्पाचा आशीर्वाद या मालिकेला मिळाला आहे, अशी भावना मनात आहे. आता आम्ही २८ सप्टेंबरची आतुरतेने वाट पाहत आहोत.”

गणरायाच्या आशीर्वादाने सुरू झालेला ‘धाकट्या सुनबाई’ मालिकेचा हा नवा प्रवास आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. राधिका आणि वेदांतची ही नवी गोष्ट प्रेक्षकांना कितपत भावते, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

‘धाकट्या सुनबाई’ २८ सप्टेंबरपासून संध्याकाळी ६.३० वाजता, फक्त झी मराठीवर पाहता येणार आहे.

Zee Marathi Serial: मनोरंजनासोबत प्रबोधनही! ‘कृष्णाईच्या लेकी’मध्ये दारूबंदीचा लढा; गावासाठी एकवटणार महिला

Web Title: Dhaktya sunbai serial zee marathi mahesh kothare

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 25, 2026 | 08:20 AM

Topics:  

  • Entertainemnt News
  • Marathi Serial
  • New Marathi Serial

संबंधित बातम्या

Zee Marathi Serial: मनोरंजनासोबत प्रबोधनही! ‘कृष्णाईच्या लेकी’मध्ये दारूबंदीचा लढा; गावासाठी एकवटणार महिला
1

Zee Marathi Serial: मनोरंजनासोबत प्रबोधनही! ‘कृष्णाईच्या लेकी’मध्ये दारूबंदीचा लढा; गावासाठी एकवटणार महिला

Onkar Bhojane On Milind Kawde: ‘नक्कीच उत्तर देईन’; ‘अफरातफरी’च्या प्रमोशनवरून वाद, मिलिंद कवडेंच्या आरोपांवर ओंकार भोजनेचं उत्तर
2

Onkar Bhojane On Milind Kawde: ‘नक्कीच उत्तर देईन’; ‘अफरातफरी’च्या प्रमोशनवरून वाद, मिलिंद कवडेंच्या आरोपांवर ओंकार भोजनेचं उत्तर

Ishwar Thakur: ‘FIR’ फेम अभिनेता ईश्वर ठाकूरची मृत्यूशी झुंज; रुग्णालयात उपचार सुरू, कुटुंबीयांनी मागितली आर्थिक मदत
3

Ishwar Thakur: ‘FIR’ फेम अभिनेता ईश्वर ठाकूरची मृत्यूशी झुंज; रुग्णालयात उपचार सुरू, कुटुंबीयांनी मागितली आर्थिक मदत

Ravi Prakash: खाकी वर्दीत दिसणार तेलुगू अभिनेता रवी प्रकाश; ‘दशमी’मधील ACP आसिफ मुजावरची भूमिका चर्चेत
4

Ravi Prakash: खाकी वर्दीत दिसणार तेलुगू अभिनेता रवी प्रकाश; ‘दशमी’मधील ACP आसिफ मुजावरची भूमिका चर्चेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.