Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dwidha Marathi Movie : ‘द्विधा’ चित्रपटातून उलगडणार भाऊ-बहिणीच्या नात्यातील खास बॉन्डिंग ;’आदि-श्रावणी’ची केमिस्ट्री चर्चेत

Dwidha Marathi Movie : रक्षाबंधनाच्या निमित्ताने भाऊ-बहिणीच्या हळव्या आणि मिश्किल नात्याचा उत्सव साजरा करण्यासाठी ‘द्विधा’ हा मराठी चित्रपट सज्ज झाला आहे. अभिनेता निमिष कुलकर्णी आणि अभिनेत्री मानसी कुलकर्णी यांच्यातील ऑनस्क्रीन केमिस्ट्री सध्या प्रेक्षकांचं मन जिंकत आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Aug 26, 2026 | 06:15 PM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • ‘द्विधा’ चित्रपटातून उलगडणार नातं
  • भाऊ-बहिणीच्या नात्यातील खास बॉन्डिंग
  • ‘आदि-श्रावणी’ची केमिस्ट्री चर्चेत
Dwidha Marathi Movie :  भांडणं, मस्ती, एकमेकांची खेचणं आणि गरजेच्या वेळी खंबीर साथ… भाऊ-बहिणीचं नातं हे नेहमीच खूप खास असतं. लहानपणापासून हा बॉन्ड नेहमी खास असतो. रोजचा दंगा, खट्ट्याळपणा, एकमेकांसोबत भांडण आणि प्रसंगी एकमेकांसाठी ढाल बनून उभं राहणं… या नात्यात जेवढा हट्टीपणा असोत तितकीच त्याला भावनिक जोडही असते. रक्षाबंधनाच्या या पवित्र आणि सणाच्या काळात भाऊ-बहिणीच्या याच हळव्या आणि सुरेख नात्याचा जपणारा आणि त्यातील खट्ट्याळपणा उलगडणारा ‘द्विधा’ हा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या लवकरच भेटीला येणार आहे. ( Dwidha Marathi Movie ) 

Zee 5 ने Jio Studios अन् Golden Ratio Films च्या ‘घमासान’ चा ट्रेलर केला प्रदर्शित; प्रतीक गांधी-अर्शद वारसी मुख्य भूमिकेत

चित्रपटाच्या माध्यमातून उलगडणार

चित्रपटामध्ये अभिनेता निमिष कुलकर्णी अभिनेत्री मानसी कुलकर्णी मुख्य भूमिकेत असणार आहेत. निमिष हा ‘आदित्य’ आणि मानसी ‘श्रावणी’ ही व्यक्तिरेखा साकारली आहे. कथानकात दोघेही आत्येभाऊ-बहिणीच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. लहानपणापासून एकत्र वाढलेल्या या दोघांमधील जिव्हाळा, आपुलकीचं नातं, विश्वासाचे धागे आणि आठवणींची प्रसंग चित्रपटाच्या माध्यमातून उलगडणार आहे. त्यांच्यातील गोड खट्याळ नातं प्रेक्षकांना आपलंस करणार एवढं नक्की. त्यांचा संवाद, मजेशीर नोकझोक आणि संकटाच्या वेळी एकमेकांना मिळणारी खंबीर साथ थेट प्रेक्षकांच्या हृदयाला भिडणारी ठरणार आहे.

ऑन-ऑफस्क्रीन केमिस्ट्री

पडद्यावर दिसणारी ही केमिस्ट्री फक्त पडद्यापुरती मर्यादित राहिलेली नाही तर या दोन्ही कलाकारांनी ऑफस्क्रीनही तितकाच दंगा केलेला आहे. त्यांच्यातील हा सहज संवाद आणि मित्रत्वाचे नातं प्रेक्षकांना म्हणून आपलंस करणार आहे. त्यामुळे चित्रपटातील बरेच प्रसंग यातून अधिक जिवंत होणार आहेत.

कधी होणार प्रदर्शित

कौटुंबिक नात्यांमधील प्रेम, गोड आठवणी आणि भावनांची सुंदर गुंफण अनुभवण्यासाठी प्रेक्षकांना फार वाट पाहावी लागणार नाही. हा ‘द्विधा’ चित्रपट येत्या ४ सप्टेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत आहे. या रक्षाबंधनाला आपल्या लाडक्या भावंडांसोबत ‘आदि आणि श्रावणी’ची हा चित्रपट बघायला मिळणार आहे. त्यामुळे संपूर्ण कुटुंबाला घेऊन हा चित्रपट बघायला जाण्याची मज्जाच काही वेगळी असणार आहे. खास रक्षाबंधनाच्या काळात हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याने बहिण भावाचं नात उलघडण्यासाठी जा तुम्हाला तुमच्या नात्याची आठवण नक्की येईल.

Abhishek Bachchan ETPL: अभिषेक बच्चनने केला European T20 Premier League चा श्रीगणेशा; मैदानावरून शेअर केला खास फोटो

Web Title: Dwidha marathi movie raksha bandhan special nimish and mansi kulkarni details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 26, 2026 | 06:15 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • marathi movie
  • rakshabandhan

संबंधित बातम्या

Kapus Konda Movie Teaser: एका कुत्र्यामुळे उलगडणार नात्यांची गोष्ट; ‘कापूसकोंडा’चा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला
1

Kapus Konda Movie Teaser: एका कुत्र्यामुळे उलगडणार नात्यांची गोष्ट; ‘कापूसकोंडा’चा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला

Janak Marathi Movie : सत्यासाठी पेटणार स्वाभिमानाची लढाई; ‘जनक’च्या मोशन पोस्टरने वेधलं लक्ष
2

Janak Marathi Movie : सत्यासाठी पेटणार स्वाभिमानाची लढाई; ‘जनक’च्या मोशन पोस्टरने वेधलं लक्ष

Dharau Marathi Movie: ग्रामीण मातीचा सुगंध अन् गाईसोबतचं हळवं नातं; ‘धाराऊ’चा पोस्टर पाहिलात का?
3

Dharau Marathi Movie: ग्रामीण मातीचा सुगंध अन् गाईसोबतचं हळवं नातं; ‘धाराऊ’चा पोस्टर पाहिलात का?

Sohla Movie Trailer: सोनाली बेंद्रेची मराठी सिनेसृष्टीत एन्ट्री; हळुवार नात्यांची गोष्ट घेऊन येतोय ‘सोहळा’, ट्रेलरने वेधलं लक्ष
4

Sohla Movie Trailer: सोनाली बेंद्रेची मराठी सिनेसृष्टीत एन्ट्री; हळुवार नात्यांची गोष्ट घेऊन येतोय ‘सोहळा’, ट्रेलरने वेधलं लक्ष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.