Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sohla Movie Trailer: सोनाली बेंद्रेची मराठी सिनेसृष्टीत एन्ट्री; हळुवार नात्यांची गोष्ट घेऊन येतोय ‘सोहळा’, ट्रेलरने वेधलं लक्ष

Sohla Movie Trailer: सोनाली बेंद्रे प्रस्तुत ‘सोहळा’ या मराठी चित्रपटाचा हृदयस्पर्शी ट्रेलर रिलीज झाला आहे. बालपण, कुटुंब आणि मैत्रीची संवेदनशील गोष्ट सांगणारा हा चित्रपट १६ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Oct 06, 2026 | 09:29 AM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Sohla Movie Trailer:  अभिनेत्री सोनाली बेंद्रेने बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची वेगळी ओळख निर्माण केली आहे. आता सोनाली बेंद्रे मराठी सिनेसृष्टीशी जोडली गेली असून, तिच्या प्रस्तुत ‘सोहळा’ या बहुप्रतिक्षित चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. हळुवार नातेसंबंध, बालपण आणि ग्रामीण जीवनातील भावविश्वाची झलक दाखवणाऱ्या या ट्रेलरने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. ‘सोहळा’ हा चित्रपट १६ ऑक्टोबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

बालपण आणि कुटुंबाची संवेदनशील गोष्ट

‘सोहळा’मध्ये एका गावात राहणाऱ्या लहान मुलाची आणि त्याच्या कुटुंबाची अत्यंत संवेदनशील आणि भावनिक गोष्ट पाहायला मिळणार आहे. ग्रामीण जीवनातील ऊब आणि आपुलकीच्या पार्श्वभूमीवर चित्रपटाची कथा घडते. बालपण, कुटुंब, मैत्री आणि मुलं आपल्या आजूबाजूचं जग हळूहळू समजून घेण्याच्या प्रक्रियेचा या चित्रपटातून शोध घेतला जातो.

मराठीत ‘सोहळा’ म्हणजे ‘उत्सव’. महाराष्ट्रातील कुटुंब आणि समुदायांमध्ये साजऱ्या होणाऱ्या पारंपरिक वयात येण्याच्या सोहळ्याच्या संकल्पनेवरून चित्रपटाचं नाव ठेवण्यात आलं आहे. त्यामुळे चित्रपटाच्या नावातच त्याच्या कथेशी जोडलेली एक खास भावना दडलेली आहे.

Jailer 2 Trailer: मुथुवेल पांडियन परतला! रजनीकांत यांच्या ‘जेलर 2’चा ट्रेलर रिलीज, नव्या मिशनसाठी सज्ज सुपरस्टार

‘सोहळा’शी लगेच जोडले गेले – सोनाली बेंद्रे

ट्रेलरबद्दल बोलताना सोनाली बेंद्रेने या चित्रपटाशी आपण लगेच जोडले गेल्याचं सांगितलं. ती म्हणाली, “या चित्रपटाशी मी लगेचच जोडले गेले. हे विश्व साधं आणि ओळखीचं आहे. यात असे काही छोटे-छोटे क्षण आहेत, जे कालांतराने आपल्याला कायमचे लक्षात राहतात.”

पुढे ती म्हणाली, “मला आशा आहे की, जेव्हा लोक हा ट्रेलर पाहतील, तेव्हा त्यांनाही तसंच काहीसं जाणवेल, जे मला ‘सोहळा’ पहिल्यांदा पाहताना जाणवलं होतं. कदाचित पश्याच्या कथेत त्यांना स्वतःच्याच आयुष्यातील एखादा अंशही सापडेल.”

 

सोनाली बेंद्रे पहिल्यांदाच मराठी चित्रपटाच्या प्रेझेंटर

बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे ‘सोहळा’च्या माध्यमातून पहिल्यांदाच मराठी चित्रपटाच्या प्रेझेंटर म्हणून काम करत आहे. त्यामुळे तिचं हे मराठी सिनेसृष्टीशी जोडले जाणं विशेष ठरत आहे. ट्रेलरमधून चित्रपटाच्या भावविश्वाची झलक पाहिल्यानंतर या वेगळ्या कथेसाठी प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे.

 Inshallah Movie: ‘इंशाल्लाहचं रखडलेलं स्वप्न पुन्हा साकारणार? आलिया भट्टसोबत भन्साळींच्या नव्या प्रोजेक्टची चर्चा

‘सोहळा’मध्ये दिसणार हे कलाकार

‘सोहळा’मध्ये प्रवीण डाळिंबकर, देवदत्त प्रशांत गोणे, वर्षा मालवडकर, वैष्णवी संजय घोडके आणि अलेस्सांड्रा व्हेलन मेरेडिझ यांच्या प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाचं दिग्दर्शन सैकत बागबान यांनी केलं आहे.

गोल्डी बहल आणि ‘कॅरीऑन फिल्म्स’च्या बॅनरखाली सचिन श्रीवास्तव, रत्ना श्रीवास्तव आणि कविता बागबान यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. आता ट्रेलरनंतर ‘सोहळा’मधून बालपण आणि नात्यांची ही हळुवार गोष्ट प्रेक्षकांना कशी भावते, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Web Title: Sohla movie trailer sonali bendre marathi movie ay

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 06, 2026 | 09:28 AM

Topics:  

  • Bollywood Actress
  • entertainment
  • marathi movie

संबंधित बातम्या

Jailer 2 Trailer: मुथुवेल पांडियन परतला! रजनीकांत यांच्या ‘जेलर 2’चा ट्रेलर रिलीज, नव्या मिशनसाठी सज्ज सुपरस्टार
1

Jailer 2 Trailer: मुथुवेल पांडियन परतला! रजनीकांत यांच्या ‘जेलर 2’चा ट्रेलर रिलीज, नव्या मिशनसाठी सज्ज सुपरस्टार

 Inshallah Movie: ‘इंशाल्लाहचं रखडलेलं स्वप्न पुन्हा साकारणार? आलिया भट्टसोबत भन्साळींच्या नव्या प्रोजेक्टची चर्चा
2

 Inshallah Movie: ‘इंशाल्लाहचं रखडलेलं स्वप्न पुन्हा साकारणार? आलिया भट्टसोबत भन्साळींच्या नव्या प्रोजेक्टची चर्चा

Talat Aziz House Fire: गायक तलत अजीज यांच्या घराला भीषण आग; बाथरूमच्या खिडकीतून पत्नीची केली सुटका, ५ जणांवर रुग्णालयात उपचर सुरू
3

Talat Aziz House Fire: गायक तलत अजीज यांच्या घराला भीषण आग; बाथरूमच्या खिडकीतून पत्नीची केली सुटका, ५ जणांवर रुग्णालयात उपचर सुरू

Sumeet Pathak: ‘बाजीगर’चा तो छोटा शाहरुख आठवतोय? सुमीत पाठकची बदलली दुनिया; उभं केलं कोट्यवधींचं साम्राज्य
4

Sumeet Pathak: ‘बाजीगर’चा तो छोटा शाहरुख आठवतोय? सुमीत पाठकची बदलली दुनिया; उभं केलं कोट्यवधींचं साम्राज्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.