
ऐश्वर्या नक्की कोणाशी बोलते कोणाला भेटते याचा शोध घेण्यासाठी सुमित्रा ऐश्वर्यावर नजर ठेवण्यासाठी तिच्या घरी राहायला जाते. मात्र ऐश्वर्या सुमित्राचे खूप हाल करते. सगळ सहन करणाऱ्या सुमित्राचा रागाचा पारा चढतो आणि ती ऐश्वर्याला धमकी देते.
मालिकेत आता नवा ट्विस्ट येणार आहे. याबाबतचा प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळतंय की, एका अडगळीच्या ठिकाणी जानकी, ऐश्वर्या आणि माया तिघी असतात. तेव्हा ऐश्वर्य़ा जानकीला म्हणते, मागे हो नाहीतर माया ऐवजी तुलाच गोळ्या घालेल. ऐश्वर्याच्या हातात पिस्तुल असतं आणि ती मायाला जीवे मारण्याची धमकी देत असते. तेव्हा झटापटीत ऐश्वर्याच्या हातातलं पिस्तुल खाली पडतं आणि जानकी हातात पिस्तुल घेते.
या झटापटीत गोळी ऐश्वर्याला लागते आणि ती जागीच बेशुद्ध पडते. माया जानकीला तिथून बाहेर जायला सांगते. जानकी त्या ठिकाणाहून बाहेर पडते. तेव्हा माया ऐश्वर्याला म्हणते की, याला म्हणतात एका दगडात दोन पक्षी मारणं. तू गेलीस आणि तिकडे ती जानकी देखील तुरुंगात जाणार. जानकी पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना तिला पोलीस अडवतात. हा भाग 31 जानेवारी आणि 1 फेब्रुवारी रात्री 10:30 वाजता प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
घरोघरी मातीच्या चुली मालिकेत नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहे. जानकीला ऐश्वर्याच्या खुनाच्य़ा प्रकरणात अडकवण्यात मायाला यश मिळेल का? जानकीसमोर आता कोणतं नवं आव्हान समोर येणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.