(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
मराठी मनोरंजनसृष्टीतील अनेक कलाकार विवाहबंधनात अडकत आहेत. सोहम बांदेकर, स्वानंद केतकर यांच्यापाठोपाठ आता आणखी एक अभिनेता लग्नबंधणात अडकणार आहे. सोशल मीडियावर रोमॅंटिक फोटो शेअर करत या अभिनेत्याने त्याच्या प्रेमाची कबुली दिली आहे. त्याने थोड्या हटके स्टाइलने त्याची वेडिंग डेट सर्वांसमोर रिव्हिल केली आहे. छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ खिरीड गर्लफ्रेंडसोबत लग्न करणार आहे.
मुलगी झाली हो, फ्रेशर्स, जाऊबाई जोरात, ह्दयी प्रीत जागते, मुरांबा अशा गाजलेल्या मालिकांमुळे अभिनेता सिद्धार्थ खिरीड घराघरांत पोहोचला आहे. सिद्धार्थ खिरीडने काही दिवसांपूर्वी ‘single अध्याय संपला’ अशी कॅप्शन देत प्रेमाची कबुली दिली होती. त्याची होणार पत्नी नेमकी आहे तरी कोण पाहुयात.
सिद्धार्थ खिरीड लवकरच डॉ मैथिली भोसेकर सोबत लग्न करणार आहे. गेल्या काही वर्षांपासून हे दोघं एकमेकांना ओळखतात. मैथिलीने परदेशात पार पडलेल्या सौंदर्य स्पर्धेत ‘मिस इंटरनॅशनल वर्ल्ड पेटिट २०२२-२०२३’ हा खिताब पटकावला होता. पॅरिस फॅशन वीकमध्ये सुद्धा मैथिली झळकली आहे. तिची पॅरिस फॅशन वीकसाठी सिग्नेचर मॉडेल म्हणून निवड झाली होती.
सोशल मीडियावर ‘लॉन्चिंग Soon’ असं म्हणत अभिनेत्याने काही फोटो शेअर केले आहेत. याच फोटोंमध्ये सिद्धार्थ-मैथिलीच्या लग्नाची तारीख दडलेली आहे. पहिल्या फोटोत मैथिली वृत्तपत्र वाचताना दिसेतय. यात त्यांच्या लग्नाची तारीख २३ जानेवारी २०२६ आहे असं नमूद केलं आहे.
सिद्धार्थच्या या पोस्टवर अनेक मराठी सेलिब्रिटींसह चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. प्री-वेडिंगसाठी त्यांनी खास वेस्टर्न लूक केला होता.






