Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 2 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Amitabh Bachchan: बुलेटप्रूफ काचेच्या आडून बिग बींचा चाहत्यांना नमस्कार, वडिलांच्या सुरक्षेसाठी अभिषेक बच्चनही ‘जलसा’बाहेर

Amitabh Bachchan: अमिताभ बच्चन १ नोव्हेंबरला ‘जलसा’बाहेर बुलेटप्रूफ असल्याचे सांगितल्या जाणाऱ्या काचेच्या सुरक्षा केबिनमधून चाहत्यांना भेटले. वडिलांच्या सुरक्षेसाठी अभिषेक बच्चनही उपस्थित होता.

  • By अमृता यादव
Updated On: Nov 02, 2026 | 10:22 AM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Amitabh Bachchan: बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन दर रविवारी आपल्या चाहत्यांची भेट घेतात. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी ही परंपरा कायम ठेवली आहे. दर रविवारी बिग बींची एक झलक पाहण्यासाठी त्यांच्या मुंबईतील ‘जलसा’ या निवासस्थानाबाहेर चाहत्यांची मोठी गर्दी जमते. मात्र, १ नोव्हेंबरच्या रविवारी चाहत्यांना अमिताभ बच्चन एका वेगळ्याच अंदाजात पाहायला मिळाले. यावेळी ते बुलेटप्रूफ असल्याचे सांगितल्या जाणाऱ्या पारदर्शक काचेच्या सुरक्षा केबिनमधून चाहत्यांना अभिवादन करताना दिसले. विशेष म्हणजे, वडिलांच्या सुरक्षेसाठी मुलगा अभिषेक बच्चनही ‘जलसा’बाहेर उपस्थित होता.

बुलेटप्रूफ काचेच्या केबिनमधून बिग बींचं चाहत्यांना अभिवादन

सुरक्षेच्या कारणास्तव अमिताभ बच्चन यावेळी मोकळ्या जागेत उभे राहण्याऐवजी पारदर्शक काचेच्या सुरक्षा कवचामागे उभे राहिले. या केबिनमधून त्यांनी आपल्या खास शैलीत हात जोडून चाहत्यांना नमस्कार केला आणि त्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार केला. बिग बींचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहे.

वडिलांच्या सुरक्षेसाठी अभिषेक बच्चनही ‘जलसा’बाहेर

अमिताभ बच्चन चाहत्यांना अभिवादन करत असताना अभिषेक बच्चनही तिथे उपस्थित होता. व्हिडीओमध्ये अभिषेक चाहत्यांना नमस्कार करतानाच आजूबाजूच्या परिसरावर लक्ष ठेवताना दिसत आहे. तसेच ‘जलसा’बाहेर तैनात असलेले सुरक्षा कर्मचारी गर्दीवर नियंत्रण ठेवताना दिसले.

Zee Marathi Awards 2026: ‘सनई चौघडे’ मालिकेने मारली बाजी! झी मराठी पुरस्कार २०२६ मध्ये कोण ठरलं सर्वोत्कृष्ट? वाचा संपूर्ण यादी

अमिताभ बच्चन यांच्या सुरक्षेत वाढ; ‘जलसा’वर हल्ल्याची धमकी

अमिताभ बच्चन यांनी अलीकडेच आपल्या आरोग्याशी संबंधित समस्यांबाबत भाष्य केले होते. त्यातच त्यांच्या ‘जलसा’ या निवासस्थानाला बॉम्ब हल्ल्याची धमकी मिळाल्याची माहिती समोर आली होती. टायगर श्रॉफवरील कथित हल्ल्याच्या घटनेनंतर आलेल्या एका धमकीच्या ईमेलमध्ये मुंबई महापौर कार्यालय, एका शाळेसह अमिताभ बच्चन यांच्या वांद्रे येथील ‘जलसा’ निवासस्थानावर ३१ ऑक्टोबर रोजी ग्रेनेड हल्ला करण्याची धमकी देण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता.

या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर बिग बींच्या सुरक्षेत वाढ करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. मात्र, या परिस्थितीतही त्यांनी चाहत्यांना भेटण्याची आपली परंपरा कायम ठेवली आहे. गेल्या रविवारी ते कोणत्याही काचेच्या सुरक्षा केबिनशिवाय चाहत्यांना भेटले होते. पण यावेळी अधिक सुरक्षा व्यवस्थेतून त्यांनी चाहत्यांना अभिवादन केले. त्यामुळे अमिताभ बच्चन यांच्या सुरक्षेची आणि अभिषेक बच्चनच्या उपस्थितीची सध्या चर्चा रंगली आहे.

Shah Rukh Khan Birthday: शाहरुख खानच्या ६१व्या वाढदिवसाची जोरदार तयारी! ‘मन्नत’मध्ये ग्रँड सेलिब्रेशन; चाहत्यांसाठी खास प्लॅनिंग?

Web Title: Amitabh bachchan security bulletproof glass cabin sunday darshan jalsa ay

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 02, 2026 | 10:22 AM

Topics:  

  • abhishek bachchan
  • amitabh bachchan
  • entertainment

संबंधित बातम्या

King Movie Song: शाहरुख खान-दीपिकाची जोडी पुन्हा चर्चेत! ‘किंग’मधील पहिलं ‘कही जो तू मिल जाए’ गाणं प्रदर्शित
1

King Movie Song: शाहरुख खान-दीपिकाची जोडी पुन्हा चर्चेत! ‘किंग’मधील पहिलं ‘कही जो तू मिल जाए’ गाणं प्रदर्शित

Shah Rukh Khan Birthday: शाहरुख खानच्या ६१व्या वाढदिवसाची जोरदार तयारी! ‘मन्नत’मध्ये ग्रँड सेलिब्रेशन; चाहत्यांसाठी खास प्लॅनिंग?
2

Shah Rukh Khan Birthday: शाहरुख खानच्या ६१व्या वाढदिवसाची जोरदार तयारी! ‘मन्नत’मध्ये ग्रँड सेलिब्रेशन; चाहत्यांसाठी खास प्लॅनिंग?

Zee Marathi Awards 2026: ‘सनई चौघडे’ मालिकेने मारली बाजी! झी मराठी पुरस्कार २०२६ मध्ये कोण ठरलं सर्वोत्कृष्ट? वाचा संपूर्ण यादी
3

Zee Marathi Awards 2026: ‘सनई चौघडे’ मालिकेने मारली बाजी! झी मराठी पुरस्कार २०२६ मध्ये कोण ठरलं सर्वोत्कृष्ट? वाचा संपूर्ण यादी

Honey Singh: रॅपर हनी सिंगवर कोसळला दुःखाचा डोंगर; कार अपघातात कुटुंबातील सदस्याचा मृत्यू, सोशल मीडियावर शेअर केली दुःखद बातमी
4

Honey Singh: रॅपर हनी सिंगवर कोसळला दुःखाचा डोंगर; कार अपघातात कुटुंबातील सदस्याचा मृत्यू, सोशल मीडियावर शेअर केली दुःखद बातमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.